महाराष्ट्र पोलीस खात्याने केलेल्या फेक एन्काऊंटरमागचं रहस्य आता होणार उघडकीस?
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आजवर अनेक गुन्हेगारांनी गंभिर स्वरुपाचे गुन्हे केले परंतु पोलीसांनी जनतेचं ऐकुन फेक एंकाऊंटर सहजासहजी केले नाही. परंतु अक्षय शिंदे या बलात्कारीच्या आरोपीला काल दि. 23 सप्टेंबर रोजी पोलीसांनी एन्काऊंटर करत संपविल्याने महाराष्ट्रातील जनतेला मोठे आश्चर्य झाले. अक्षय शिंदे जो अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या गुन्ह्याचा मुख्य आरोपी आहे त्याच्यासह अनेक भाजप पदाधिकारी देखील गुन्हेगारीच्या यादीत असले तरी अद्याप कोणाला ही अटक झाली नाही फक्त अक्षय शिंदेला अटक झाले व संपुर्ण घटनेचा तपास लागण्यापुर्वी तसेच न्यायालयीन न्यायप्रक्रियेपुर्वी पोलीसांनी त्याचा काटा काढल्याने हे एन्काऊंटर मागचं रहस्य काय असा सवाल अनेकांना पडला होता.
आज आर.टी.आय. कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केल्यानंतर अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाला दुसरे वळण लागल्याचे दिसुन येते. बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर ज्याठिकाणी अल्पवयीन मुलींवर प्रकार घडला त्याठिकाणी मानवी तस्करी व चाईल्ड प्रोर्नोग्राफीचा प्रकार घडल्याचा उल्लेख जनहित याचिकेत करण्यात आल्याने न्यायालयीन समितीकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे. यामुळे आता शाळा विश्वस्त मंडळातील आपटे, घोरपडे व इतर भाजप पदाधिकार्यांची समस्या काय सम्पलेली नाहे हे दिसुन येते.
अक्षय शिंदे याने पोलीसांकडे मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इ्च्छा व्यक्त केली होती असेही जनहित याचिकेत उल्लेख करण्यात आल्याने हा प्रकरण मोठमोठ्या नेत्यांना व पदाधिकार्यांना गुन्ह्याच्या कचाटीत अडकणार म्हणुनच त्याआधिच पोलीसांनी काही ठराविक गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आरोपी शिंदेचा फेक एन्काऊंटर केला कि काय ? असा संशय आता नागरिकांमध्ये व्यक्त होते.
एकुणच या सगळ्या प्रकारातुन महाराष्ट्रातील पोलीस खात्यावर राजकिय सत्ताधार्यांचा कंट्रोल आणि पोलीसांचा मनमर्जी कारभार हे पुन्हा एकदा दिसुन आले.