पोलीसांकडून एन्काऊंटर फक्त गरिब घरातील आरोपींसाठीच का?
भाजप पक्षातील बलात्कार्याला पोलीसांकडून स्पेशल ट्रिटमेंट???
महाराष्ट्र पोलीसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह
कल्याण (महाराष्ट्र विकास मिडिया)- कल्याण डोंबिवली महापालिकेचे भाजप लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांनी काही वर्षांपुर्वी 27 वर्षीय महिलेचं बलात्कार केलं होत. बलात्काराची घटना झाल्यानंतर पिडीत महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी पोलीसांची ज्याप्रकारे संपुर्ण घटनेचा तपास करण्यास रस दाखविले नाही त्यामुळे नुकताच झालेल्या एन्काऊंटरच्या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीसांच्या भाजप आरोपी विषयी सॉफ्ट कॉर्नर बाबत जोरदार चर्चा ऐकायला येत आहे.
दया गायकवाड यांनी एका महिलेसोबत प्रेम संबंध ठेवल तिचा शारिरीक वासनेसाठी तिचा दुरुपयोग करुन घेतला. घटना 2017 साली घडली जेव्हा दया गायकवाड हे भाजप पक्षाचे कल्याणचे लोकप्रतिनिधी होते. साहजिकच आहे त्यावेळी स्थानिक खडकपाडा पोलीसांनी पिडीत महिलेची सुरुवातीला तक्रार सुद्धा घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी स्थानिक पत्रकार आणि समाजसेवकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मात्र पोलीसांनी दया गायकवाड विरोधात बलात्काराचा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यावेळी बलात्कारी गायकवाड सोबत काय घडलं हे सांगितल्यावर आज महाराष्ट्रातील त्या ठराविक नागरिकांना धक्का पोहोचणार हे आज अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणार्या पोलीसांची वाहवाही करतायेत.
दया गायकवाड विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी उलट पिडीत महिलेला दम देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अशी परिस्थिती पिडीत महिलेवर आणली कि तिला तिच्या नोकरीवरुन काढुन टाकण्यात आलं, समाजाक विविध ठिकाणाहुन धमकीचे फोन येऊ लागले तसेच घरात सुद्धा अनेकांना धमकी देण्यासाठी पाठविण्यात आले. खडकपाडा पोलीसांनी त्यावेळी भाजप नेत्यावरील गुन्हा तातडीने कसं सुटता येईल त्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले असा आरोप खुद्द पिडीतेने सोशल मिडियावर आपली व्यथा मांडत सांगितली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच पिडीतेला मानसिक त्रास दिल्यानंतर शेवटी पोलीसांनी दया गायकवाड सह संगनमत करत पिडीत महिलेला कोर्टाबाहेर समझौता करण्याचा सल्ला दिला. पोलीस कारवाई करत नाही तसेच आरोपी हा भाजप पक्षाचा असल्याने कोणीच मदतीला येत नाही हे पाहुन शेवटी आपल्याला भारतीय न्याय व्यवस्था न्याय देऊच शकत नाही याची खात्री झाल्यानंतर पिडीत महिलेने समझौता करण्याच्या हेतुने आर्थिक रुपी मदत करण्याची मागणी केली होती. तसेच गायकवाड या बलात्कार्याने त्याच्या कार्यालयात येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यापुर्वीच पिडीत महिलेकडून कोर्टातुन केस मागे घेण्यात आल्याचेही पुराव्यावरुन दिसुन येते.
पिडीत महिलेने गायकवाड सोबत ठरल्याप्रमाणे कार्यालयात जात पैसे मोजत सी.सी.टी.व्ही. समोर ते पैसे दाखवुन हे पैसे आणि आजपासुन गायकवाड सोबत विषय बंद असे सांगत असतांनाच एंटीकरप्शन ब्युरोच्या अधिकारी त्याठिकाणी येऊन तिला अटक करतात.
या घटनेत पैश्याची मागणी करणार्या त्या महिलेची मिडिया बाजु घेत नाही परंतु पोलीस ज्याप्रकारे त्या महिलेवर कारवाई करतांना दिसली त्याच पोलीसांकडून बलात्काराची चौकशी सुद्धा का केली जात नाही असा सवाल आता मानपाड्यातील जागृक नागरिक विचारत आहेत.
खडकपाडा पोलीसांनी पिडीतेच्या तक्रारीनंतर तातडीने दया गायकवाड ला अटक करत बलात्काराची चौकशी का केली नाही? चौकशी न करण्यासाठी पोलीसांना भाजप कडून आर्थिक मदत करण्यात आली होती का? आरोपीची चौकशी केली नाही म्हणुन पिडीतेला न्याय मिळणार नाही असा फास पोलीसांना पिडी महिलेला करुन द्यायचं होतं का? पोलीसांच्या कृत्यामुळेच शेवटी न्याय पालिका आणि पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवत पिडीत महिलेने स्वतःच्या गेलेल्या अब्रु आणि उध्वस्त झालेले आयुष्य सावरण्यासाठी बलात्कार्याकडून कंपन्सेशन म्हणुन पैसे घेतले होते कि काय? असे अनेक प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडले असुन अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर पुन्हा एकदा भाजप लोकप्रतिनिधी दया गायवाड बलात्कार प्रकरण उघडण्याची मागणी आता जोर धरत आहे.
विशेष म्हणजे पोलीसांकडून अश्या प्रकारचे भेदभाव फक्त मानपाड्यात नसुन संपुर्ण देशात जेथे कुठे भाजप पक्षाचे पदाधिकारी बलात्काराच्या गुन्ह्यात असतात त्यांना खास ट्रिटमेंट दिली जाते असा आरोप आजवर अनेकांनी केले आहे व तसा प्रकार पाहायला ही मिळाले आहे.