पंढरपुरातील भक्तांची मागणी
महाराष्ट्र पोलीसांचे कारस्तान अपवित्र असल्याचा भक्तांचा आरोप
पंढरपुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस खात्याकडून ज्याप्रकारे एका आरोपीचे एन्काऊंटर करण्यात आले त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्र आणि देशभरात महाराष्ट्र पोलीस खात्याविषयी जोरदार टिका सुरु आहे. विशेष म्हणजे आता पंढरपुरातुन विठ्ठल भक्तांनी देखील पोलीसांवर नाराजी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र पोलीसांनी यापुढे स्वतःचे व्हिडीओ, पोलीसांचे व्हिडीओ आणि पोलीसी जाहिरात विठ्ठल विठ्ठल असे म्हणत आमच्या पवित्र असे विठ्ठल रुकुमाईंचे नाव खराब करु नये अशी मागणी भक्तांकडून होत आहे.
महाराष्ट्र पोलीस माहील काही वर्षांपासुन आपल्या सोशल मिडियावर पोलीसांची जाहिरात करतांना जनतेत भावनीक होण्यासाठी तसेच जनतेला भावनिक दृष्ट्या आकर्षण करण्यासठी पोलीसांच्या चित्राच्या बैगराऊंडमध्ये विठ्ठल रुकमाईंचे गाणे चालवतात. जणु हे महाराष्ट्र खात्यातील पोलीस विठ्ठलाच्या रुपाने पिडीतेच्या मदतीसाठी आले असा दाखवुन देण्याचा अनेकदा महाराष्ट्र पोलीस खात्याकडून सोशल मिडियाद्वारे प्रयत्न केला जातो. परंतु नुकताच ज्याप्रकारे महाराष्ट्र पोलीस खात्याकडून मोठा कांड आणि त्या कांड मधून अल्पवयीन मुलींवरील होणारे अत्याचार हा तपास पुर्ण होण्याआधिच आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करुन त्याला संपविल्याने महाराष्ट्र पोलीस खात्यावर सर्वच स्तरातुन जोरदार टिका होत आहे. विठ्ठल रुकमाई हे आपल्या पवित्रामुळे त्या देवी देवतांची ओळख आहे. त्यांना माननारा वर्ग प्रामाणिकपणे व अहिंसक आहे परंतु सध्याची महाराष्ट्र पोलीस खात्याचे कारस्थान हे अप्रामाणिक व हिंसक असल्याने विठ्ठल रुकमाईला आता तरी बदनाम करणे बंद करा अशी मागणी होतांना दिसुन येते.
बदलापुर बलात्कारी अक्षय शिंदे याचा ज्याप्रकारे नाट्यमय एन्काऊंटर मुंंब्रा बाईपास हायवे याठिकाणी पोलीसांच्या व्हॅनमध्ये करण्यात आला त्यामुळे पोलीस प्रशासनाला कायद्याची आणि न्याय पालिकेची कोणतीच भिती नाही हे दिसुन आले. पोलीसांच्या ताब्यातुन बंदुकितुन आरोपी पिस्तुल हिसकाऊन पोलीसांच्या मांडीवर गोळी झाडतो आणि पोलीस आरोपीच्या डोक्यावर गोळी मारते हे न पचण्यासारखा विषय आहे. त्यामुळे हे एन्काऊंटर कि फेक एन्काऊंटर असेही बोलले जाते. मुळात आरोपी अक्षय शिंदे सह इतर आरोपी देखील या गुन्ह्यात संबंधीत असुन अनेक आरोपी हे भाजप पदाधिकारी असल्याने त्यांना वाचवण्यासाठी पोलीसांने मुख्य आरोपीला संपविले असा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस खातं आता चांगलंच बदनाम झालय.
आधिच महाराष्ट्र आणि भारतातील मानवाधिकार संघटनेचं जगभर नाव खराब आहे व आता या घटनेमुळे मानवाधिकारी संघटना पोलीसांवर कारवाईसाठी कोणते पाऊल उचलते यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.