मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- प्रत्येक वाईटातुन ही चांगलं घडलं ह्या म्हणी प्रमाणे आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्यातील बदलापुरात झालेल्या एंकाऊंटर घटनेची निंदा करतांना महाराष्ट्र आणि भारतात प्रत्येक कार्यरत पोलीसाच्या छातीवर कॅमरे बसविण्याची मागणी जोर धरत आहे. मुळात जर पोलीसांनी हाईटेकप्रमाणे कॅमरे छातीवर बसवले तर भविष्यात नागरिकांसोबत पोलीसांकडून चुकीचे काम होणार नाही तसेच पोलीसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील सुटणार.
अमेरिका, कॅनडा, युरोप येथील जर्मनी व इतर देशात पोलीसांना कार्यरत असतांना छातीवर कॅमरा सुरु ठेवणे अनिवार्य असते. यामुळे अनेक प्रोटोकॉलचे पालन पोलीस करतात का हे तपास करतांना सोयीचे ठरते. फेक इंकाऊंटर, लाचखोरी, खोट्या गुन्ह्यात अडकवणे, पोलीस कोठडीत मारहाण करणे या व अश्या अनेक कारणांना फुल स्टॉप लागण्यासाठी छातीवर कॅमरे लााववे अतिशय योग्य निर्णय ठरणार आहे. कल्याण येथील समाजसेवक ईर्शाद शेख यांनी ही मागणी केली आहे.
ईर्शाद शेख यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, पोलीसांवर जो आज हल्ला झाला त्यात पोलीस जखमी झाले. एका बलात्कार्याच्या कृत्यामुळे पोलीसाला जीव गमावण्याची वेळ येणार होती. देवाच्या कृपेने पोलीसाच्या मांडीवरच गोळी लागती व ते जखमी झाले. पोलीस हे दिवस रात्र नागरिकांनी संरक्षण करतात व शहरात दहशत निर्माण करणार्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात त्यामुळे अश्या पोलीसांचे संरक्षण ही झाले पाहिजे म्हणुन अमेरिकेप्रमाणे भारतातील प्रत्येक पोलीसांना छातीवर कॅमरे लावण्यासाठी शासनाने व केंद्र शासनाने तातडीने कॅमरे पुरवावे अशी आम्ही मागणी करत आहोत.
शेख पुढे असेही म्हणतात कि, बदलापुरच्या पोलीसांनी आपल्या जीवाची बाजु लावत हा प्रकरण हाताळले आहे. जर त्या बलात्कार्याचा नेम दुसर्या ठिकाणी लागलं असतं तर आज पोलीसाला आपला जीव गमवावा लागला असता. पोलीसासह त्याच्या परिवारालाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने तसेच भारतीय केंद्र शासनाने केंद्र व राज्यातील प्रत्येक कार्यरत पोलीसांना छातीवर कॅमरे पुरवावे जेणेकरुन भविष्यात अश्या प्रकारची घटना घडणार नाही. मुळात अश्या घटनांमध्ये जेव्हा कॅमरे असतील तर भारतीय पोलीसांवर कोणी बिनबुडाचे फेक एंकाऊंटरचे आरोप देखील करणार नाही.
काही ठरावित भ्रष्ट पोलीसांमुळे संपुर्ण महाराष्ट्र पोलीस खात्याचं नाव खराब होतो. एक पोलीसवाला चुकीचा आहे त्यावर शिक्षा होण्याऐवजी आपण सगळ्यांना पोलीस भ्रष्टाचारी असे म्हणुन त्यांच्या मानसिक दृष्ट्या त्यांना दुखी करतो. ते सर्व सहन करुन सुद्धा पोलीस मात्र पुन्हा ड्युटीवर येतात व नागरिकांची सुरक्षेसाठी कार्यरत असतात. त्यामुळे आता राजकिय नेत्यांनी या पोलीसांच्या सुरक्षिततेचा ही विचार करणे गरजेचे आहे असेही शेवटी समाजसेवक शेख यांनी म्हटले असुन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे केंद्र गृहमंत्री अमित शहा यांनी छातीवरील कॅमरेबाबत मागणी पत्र दिले आहे.
समाजसेवक ईर्शाद शेख यांच्या या मागणी नंतर महाराष्ट्रात इतर ही ठिकाणी आर.टी.आय. कार्यकर्ते व समाजसेवक पोलीसांनी छातीवर कॅमरे बसविल्यास अनेक समस्या सुटतील असे मत व्यक्त केले.
जर्मनी, अमेरिका किंवा कॅनडा याठिकाणी जेव्हा पोलीस प्रशासन आपल्या पोलीस ठाण्यात काम करतात तेव्हा प्रोटोकॉल प्रमाणे छातीवर कॅमरा लावण्यात येते. तसेच संपुर्ण रेकॉर्डिंग सर्वस मध्ये सेव होते. नागरिकंच्या मागणीनंतर त्या फुटेजला पुराव्यासाठी दिले ही जाते त्यामुळे कोर्टात ही खटला लढतांना वकिलांनी फुटेज सोयीचे ठरते. अतिशय ऑर्गनाईस्ड पद्धतीने प्रोटोकल मांडण्यात येते ज्यामुले पोलीस ड्युटीवर असतांना छातीवरील कॅमरा उपयुक्त ठरते.
परदेशात रस्त्यावर जेव्हा पोलीस गाड्यांना थांबवते, एखाद्या गुन्हेगाराला पकडण्याचा प्रयत्न करते किंवा धोकादायक अवस्थेत एंकाऊंटर करते त्या सर्वच वेळी पोलीसांच्या छातीवर कॅमरा असल्याने नेमकं काय झालं हे दिसुन येते त्यामुळे कोणा साक्षीदाराची गरज लागत नाही. तसेच जर तक्रारदारांनी पोलीसांवर खोटे आरोप लावल्यास ते देखील कॅमर्यामुळे सिद्ध होत असल्याने अमेरिकेप्रमाणे भारतात ही आता भारतीय पोलीसांनी छातीवर कॅमरा लावण्याच्या प्रकल्पाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे समजते.