बदलापुरातील ठाणेकर पलासियो प्रकल्पाच्या मनमानी कारभारामुळे रहिवाशी हैराण

Date:

-सकाळी 6 वाजल्यापासुन ध्वनी प्रदुषणामुळे बिल्डर विरोधात पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी

-ठाणेकर पलासियो प्रकल्प वादाच्या भोवर्यात

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगपरिषद हद्दीतील बदलापुर पुर्व शिरगाव याठिकाणी ठाणेकर ग्रुप या बांधकाम व्यवसायिकेचे ठाणेकर पलासियो नावाचे गृहनिर्माण प्रकल्प आहे. याच ठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम जोमाने सुरु आहे व पुर्ण झालेल्या इमारतीत रहिवाशी देखील वास्तव्यास आहेत. अश्यात दररोज सकाळी वाजल्यापासुन इमारतीच्या बांधकामासाठी ज्याप्रकारे ध्वनीप्रदुषण केला जातो त्यामुळे शेकडो रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एका रहिवाश्याने आपले नाव न छापण्याच्या अटीवर बदलापुर विकासला प्रतिक्रिया दिली कि, मागील अनेक महिन्यांपासुन दररोज सकाळी 6 वाजल्यापासुन बांधकाम करणारे कामगार जोरदार आवाज करतात ज्यामुळे सर्वच रहिवाश्यांची सकाळ सकाळी झोप खराब होते. त्यातच बांधकाम व्यवसायिक एका स्थानिक आमदाराच्या जवळचा असल्यामुळे पोलीस देखील तक्रार केल्यानंतर कारवाई करत नाही त्यामुळे ह्या मानसिक त्रासाला उपाय तरी कोण शोधुन देणार असा प्रश्न आता रहिवाश्यांना पडला आहे.

सुप्रिम कोर्टाच्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनी प्रदुषणावर अनेकदा पीआयएल दाखल झाल्यानंतर महत्वाचे निर्णय देण्यात आले. त्यामुळे बदलापुरात सकाळ सकाळी जर बांधकाम व्यवसायिक नियमांची परवा न करता आपले प्रोजेक्ट तातडीने उभे राहावे म्हणुन रहिवाश्यांना मानसिक त्रास देत असेल तर कायदेशीर गुन्ह्याची कायद्यात तरतुद आहे. त्यामुळे ठाणेकर ग्रुप बिल्डरकडून ज्याप्रकारचे कारस्थान सुरु आहे हे जर तातडीने थांबले नाही तर संतापलेले नागरिक मात्र जमाव घेऊन पोलीस ठाण्यात दाखल होणार असे सुत्रांकडून समजते.

रहिवाश्यांच्या समस्येनंतर बदलापुर विकास मिडियाने देखील स्थानिक बदलापुर पुर्ल पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करत पुन्हा जर ठाणेकर पलासियो याठिकाणी सकाळी बांधकाम व्यवसायीकाच्या आदेशावरुन कामगारांनी तमाशा सुरु केला तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
एकुणच बदलापुरात राजकिय नेत्यांना हाताशी धरुन सामान्य नागरिकांची पिळवणुक जागोजागी होतांना दिसुन येते. मग तो गावगुंड असो, व्यवसायिक असो किंवा बिल्डर असो राजकिय वदरहस्त मिळाल्यानंतर नियमांची पायमल्ली व मनमानी कारभार सर्वत्र सुरु आहे ज्यामुळे बदलापुरकर त्रस्त झाल्याचे समजते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...