कैंसरच्या 3 डोस वाटपात ही आता भाजपकडून चमकोगिरीचे राजकारण
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात प्रत्येक गोष्टीत केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप पक्षातर्फे राजकारण केले जाते हे आजवर अनेकांनी पाहिले परंतु मुरबाड विधानसभा क्षेत्रात आता कैंसरच्या डोसच्या नावाखाली सुद्धा भाजपचे चमकोगिरीचे राजकारण होत असुन कैंसरच्या नावाचाही भाजप कशाप्रकारे मतदानासाठी उपयोगात आणणार हे बदलापुरात दिसुन आले.
जागतिक आरोग्य संघटने च्या शिफार्शिनंतर भारतीय आरोग्य मंत्रालयातर्फे संपुर्ण भारतात 9 ते 14 वयोगटातील मुलींमध्ये कर्करोग होऊ नये म्हणुन 3 डोस वाटपाचे उपक्रम सध्या सुरु आहे. ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एपचजीव्ही) हा विषाणूचा एक प्रकार महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर कर्करोग होण्याचे कारण ठरु शकत असल्याने तसे होऊ नये म्हणुन अमेरिकेतील एफडीए आणि भारतातील डीसीजीआई द्वारा प्रमाणित एचपीव्ही लस दिल्याने कर्करोग पासुन रक्षण होते. उपक्रम जरी योग्य असले तरी हे उपक्रम संपुर्ण भारतातील प्रत्येक सरकारी रुग्णालयातर्फे देण्यात येत आहे. परंतु ह्या उपक्रमात ही राजकारण आणि प्रसिद्धी पाहणार्या भाजपचे थेट मुरबाड विधानसभा मतदार संघात चमकोगिरीचे काम केले आहे.
आमदार किसन कथोरे व त्यांचे कार्यकर्ते जागोजागी ह्या एंटी कैंसर लसीकरण मोहिमचे पोस्टर लाऊन मतदारांना डोस घेण्यासाठी आवाहन करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या चमकोगिरीच्या राजकारणामुळे पुन्हा एकदा मतदारांकडून जोरदार टिका होत आहे.
मुरबाड विधानसभा मतदार संघात महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवर बलात्कार ह्या घटनांमध्ये वाढ झाली. नुकताच बदलापुरात अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर सुद्धा पोलीसांनी तातडीने दखल घेतले नाही तेव्हा आमदार कथोरे आणि कार्यकर्ते गायब झाले होते. आंदोलनकर्त्यांना किंवा पिडितांना मदत करतांना किंवा पोलीसांना जाब विचारतांना हेच आमदार कथोरे आजिबात दिसले नाही. त्यावेळी सामान्य बदलापुरकरांनी पुढाकार घेऊन पिडीत अल्पवयीन मुलीला व तिच्या परिवाराला न्याय मिळणेसाठी आंदोलन केले व स्वतःवर गुन्हे दाखल करुन घेतले.
आता विधानसभेची निवडणुक तोंडावर आल्यानंतर मात्र हेच आमदार मुलींच्या आणि महिलांच्या आरोग्य विषयी चिंता दाखवुन कर्करोग होऊ नये म्हणुन लसीकरणाच्या मोहिमेची जोरदार जाहिरात करतांना दिसुन आले. विशेष म्हणजे जे काम खाजगी आणि शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आहे ते देखील आता राजकारणी करत असुन प्रत्येक ठिकाणी राजकारण घुसवण्याची ही ट्रेंड कधी बदलणार असा सवाल आता जागृक नागरिकांकडून होत आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या कार्यकीर्दीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले, त्यांनी जो निथी शासनाकडून कुळगांव बदलापुर नगरपरिषदेला दिले त्यात ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले परंतु त्याविरोधात आमदार कथोरे यांनी एक शब्द सुद्धा कधी बोलत नसल्याने भ्रष्टाचार्यांवर त्यांचा ही वरदहस्त आहे कि काय असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे.
त्यातच आमदार कथोरे यांच्या पदानुसार त्यांनी ते त्यांचे काम आहे म्हणजेच खराब रस्ते, पाण्याची समस्या व इतर कामे त्यावर बोलण्याऐवजी कर्करोगाच्या लसीकरणाच्या मोहिमेबाबत हिरहिरीने त्यांचा सहभाग पाहुन अजुन किती काळ नागरिकांची दिशाभुल करुन भावनिक मुद्यांच्या आधारे आमदार होण्यासाठी मत मागणार असा सवाल आता जागृक बदलापुरकरांकडून होत आहे.
शासकिय रुग्णालयात काम करणार्या एका नर्सने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आमदार कथोरे व त्यांचे कार्यकर्ते ज्याप्रकारे लसीकरणाबाबत चमकोगिरी करत आहे त्यापेक्षा त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील रुग्णालयाची दैयनिय अवस्था सुधरवण्यासाठी काही तरी योग्य केल्यास नागरिकांसाठी सोयीचे ठरेल.
आमदार कथोरेंच्या नेतृत्वाखाली कुळगांव बदलापुर नगरपरिषदेत नगरसेवक म्हणुन निवडुन आलेले अनेकांच्या वार्डाती मागील अनेक वर्षांपासनची अवस्था पाहिल्यावर विकास कमी आणि भ्रष्टाचार जास्त हेच दिसुन येते. परंतु वार्डातील नागरिकांच्या त्या समस्येवर कधी आमदार एक शब्द सुद्धा बोलतांना दिसलेले नाही.



