अक्षय शिंदे प्रमाणे भाजपच्या आपटेवर ही एंकाऊंटर होणार का? -बदलापुरकरांचा सवाल
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- इंग्रजांनी ज्या्प्रकारे स्वांत्र्य मिळवण्यासाठी आवाज उठवणार्यांचे आवाज बंद करण्यासाठी एंकाऊंटरचा मार्ग अनेक वर्ष भारतीयांवर वापरले ते आज ही पोलीसांकडून शिंदे सरकारच्या काळात दिसुन येते. आज दि. 23 सप्टेंबर रोजी बलात्कारी अक्षय शिंदे यांचा झालेला एंकाऊंटर पोहिल्यावर महाराष्ट्र पोलीस खातं राज्यात मुगलशाही आणण्याचा पुरेपर प्रयत्न करत असल्याची राज्यभर चर्चा आहे.
भाजप पक्षाच्या पदाधिकार्यांकडून चालविण्यात येणार्या आदर्श विद्या मंदिरात एका खाजगी ठेकेदाराकडून सफाई कामगाराची नेमणुक करण्यात येते. पोलीसांकडून सफाई कामगाराची कोणत्याही प्रकारची पुर्व पार्श्वभुमीबाबत पडताळणी करण्यात येत नाही. शाळेतील शिक्षिका अल्पवयीन मुलींना लघवीला पुरुष सफाई कामगारासह पाठवते ह्या सगळ्या पराक्रमाला पाहिल्यानंतर बलात्कार करणारा अक्षय शिंदे एकमेव दोषी आहे कि संपुर्ण टोळी दोषी आहे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. शाळेचे व्यवस्थापक जनार्दन घोरपडे, आपटे व इतर पदाधिकारी तसेच शाळेतील शिक्षिकांना अद्याप अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले नाही परंतु अक्षय शिंदेला तुरुंगातून दुसर्या केस साठी ट्रान्सिट मध्ये आणण्याची गेम मात्र अगदी चोख पणे बजावली. महाराष्ट्र पोलीस प्रशासन एकमेव अशी पोलीस खातं असेल त्यांच्या पोलीसांची बंदुक हतकडी असलेला आरोपी हिस्काऊन घेतो आणि गोळीबार कुठे करतो तर पोलीसाच्या मांडीवर. पोलीस बचावासाठी गोळीबार कुठे करते तर थेट आरोपीच्या डोक्यावर. अद्याप सदर पोलीस कर्मचार्यांना निलंबित देखील करण्यात आले नाही जणु त्यांनी मोठा पराक्रमच केला आहे.
जागतिक पातळीवर विविध सामाजिक संस्था, मानवाधिकार संघटना व देशातील राजकिय नेते या कृत्याला भारतीय पोलीसांचा हलगर्जीपणा व फेक एंकाऊंटर असे नाव देत आहे परंतु भारतातीय बदलापुर शहरातील भोळी जनता मात्र पिडीतेला न्याय मिळाला म्हणत पेढे वाटत आहे. पिडील अल्पवयीन मुलगी जिच्या संपुर्ण आयुष्याची या घटनेमुळे वाट लागली तिला एका एंकाऊंटरने न्याय कसा मिळाला असा प्रश्न विचारले तर आनंद साजरा करणार्यांना उत्तर सापडणार नाही.
भारतात स्वातंत्र्यापुर्वी इंंग्रज सरकार अगदी अश्याचप्रकारे ठराविकांना गोळ्या झाडून प्रकरण दाबण्याचं प्रयत्न करत होते व अनेक वर्ष इंग्रज यात यशस्वी ही झाले. इंग्रजच काय तर मुगल काळात ही प्रश्न विचारणार्यांची हत्या करणे व राजाच्या मनाविरुद्ध वागल्यास मृत्युची शिक्षा देणे हे कायदाच करुन ठेवला होता. परंतु मुगलशाहीच्या काळात कायदा प्रत्येकाला सारखा तरी होता परंतु आजच्या स्वातंत्र्य भारतात गरिबावरच कठोर शासन केले जाते, राजकिय नेते आणि श्रीमंत आरोपींना मात्र न्यायालयातून न्याय मागण्याची संधी दिली जाते.
बदलापुरचे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार, जनआक्रोश आंदोलन, महिला पत्रकाराचे विनयभंग, नेत्याकडून अल्पवयीन मुलीची बदनामी व बलात्कारीचा एंकाऊंटर हे एक उत्तम उदाहरण आहे समजुन घेण्यासाठी कशाप्रकारे आज ही भारतीय मानसिकता गुलामगिरीतुन जगतांना संकोच करत नाही. पुर्वी इंग्रजांकडे जे भारतीय नागरिक गुलाम होते ते आज आपल्याच भारतीय भ्रष्ट राजकारण्यांच्या आणि त्यांच्या सत्तेत गुलाम म्हणुन जगत आहोत. विशेष म्हणजे त्यावेळी आपल्याला स्वातंत्र्याची जाणिव तरी होती परंतु आजच्या बेरोजगारी, महागाई, सोशल मिडिया, प्रसिद्धी आणि रिलच्या जमान्यात स्वातंत्र्य तर तोडा स्वाभिमान काय हे देखील अनेक भारतीयांना माहित नाही. त्यात त्यांना दोष देऊन ही काही फायदा नाही कारण मतदानाच्या दिवशी त्याला एक दिवसाचा राजा म्हणुन पार्टी दिली जाते त्यांचा शेफारले जाते व निवडणुक जिंगल्यानंतर त्याच शेफारलेल्या मतदाराला बळीचा बकरा केला जातो.
अक्षय शिंदे या बलात्कार्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे आमचेही हेच मत आहे परंतु शिंदे एकट्यावरच कायद्याची तलवार का? शिक्षक, शाळेतील पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, स्थानिक भ्रष्ट पोलीस आणि त्यांना पाठींबा देणारे सत्तेतील दलाल ही गुन्हेगार नाही का? नागरिकांच्या मताप्रमाणे जर पिडीतेला न्याय आरोपीला गोळी झाडूनच मिळणार असेल तर पिडीत महिला पत्रकाराचा शाब्दिक विनयभंग करणार्या वामन बारकु म्हात्रेला एंकाऊंटरची शिक्षा म्हटल्यावर बाईईई हा कसला प्रकार म्हणारे नागरिक हिपोक्रिटीक नाही का? अल्पवयीन मुलीची व तिच्या परिवाराची माहिती सोशल मिडियावर उघडकीस करणार्या वामन म्हात्रे व इतर साथीदारांचे पोलीसांनी एंकाऊंटर करायला नको का? भाजपचा पदाधिकारी आपटे, घोरपड व इतर विश्वसमंडळ व शिक्षिका ज्यांच्या दुर्लक्षामुळे हे सर्व कांड घडले त्यांना ही एंकाऊंटर नको का? म्हणजे बलात्कारी गरिब आहे तर त्याला मारा गोळ्या आणि श्रीमंतांसाठी आम्ही लाटू पोळ्या ही बदलापुरच्या काही नागरिकांनी मानसिकता आहे की काय? मुळात कोणत्याही व्यक्तिचे जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही त्यामुळे जीव न घेता देखील कठोर कारवाई करता येत नाही का यावर कोणीही भारतीय विचार का करत नाही.
परदेशात कॅनडा, अमेरिका व इतर देशात महिलांवर अश्या प्रकारे अत्याचार भारताप्रमाणे तर आजिबात होत नाही, त्याठिकाणी अश्या गोष्टीतून एंकाऊंटर शुन्य आहे. पण त्यानंतर सुद्धा बलात्कार्यांची हिम्मत ही होत नाही त्याचे कारण भारतीयांना शोधायला हवं. विशेष म्हणजे भारतात ज्याप्रकारे काही भारतीय पुरुष महिलांसोबत चुकीचे वागतात त्याप्रकारे परदेशात करत नाहीत कारण त्यांना माहित आहे हे भारत नाही आणि इथे भारतीय ढिम्म कायदा नाही सुटायला.
बलात्कार करणारा नराधमाविरोधात जो नागरिकांमध्ये आक्रोश होता त्यावर खर्या अर्थाने जर न्याय पालिकेने तातडीने सर्वच आरोपींना अटक केले असते व शिक्षा सुनावली असता तर कदाचित भविष्यात असले प्रकार घडणार नाही अशी शाश्वती व्यक्त करता आली असती पण फक्त गरिब कुटुंबाचा आहे आरोपी म्हणुन घाला गोळ्या भविष्यात त्याचा कुटुंब चौकशीसाठी आवाज करणार नाही ही भारतीय पोलीसांची जी मानसिकता आहे तीच आपल्या भारताला मुगलशाही कडे नेणार असे म्हटल्यास वागवे ठरु नये.
नुकताच भाजपच्या काही पदाधिकार्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी बलात्कार, विनयभंग, गाडी चालवतांना अपघातात निष्पापांचे बळी घेतले. त्यांना पोलीस ठाण्यात बर्गर आणि पिझ्झा खाण्यात महाराष्ट्र पोलीस खात्यातील अधिकारी देतात आणि जनतेच्या भावनांचा राजकिय फायदा घेण्यासाठी गरिब घरातील बलात्कार्याला खोट्या एंकाऊंटर मध्ये ठार केले जाते. ह्या अश्या कृत्याने भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचणार नाही.
सध्या महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या जो काही कारभार सुरु आहे आणि पोलीसांचा मनमानी सुरु आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील मतदारांना वार्डातील समस्या, कचर्याची समस्या, लाचखोर पोलीसांकडून होणारे त्रास, शासकाकडून होणारी फसवणुक, गुंडशाही या सगळ्या विषयात बोलतांना दहा वेळा विचार करावा लागणार कारण चौकशीसाठी ज्याप्रकारे शिंदेला ट्रान्झिट मधून नेतांना पोलीसाची बंदुक हिंसकाविल्याने मतदाारावर एंकाटऊंटरची घटना होऊ नये म्हणजे झालं.
एकुणच बदलापुर प्रमाणे महाराष्ट्रात विविध ठिकाणी तसेच संपुर्ण भारत देशात श्रीमंत आणि राजकिय ताकद असलेल्या बलात्कारी आरोपींसाठी एक शिक्षा आणि गरिब कुटुंबातील बलात्कार्यासाठी एंकाऊंटरची शिक्षा हेच दिसुन येते. मुळात अश्यांना जर प्रोत्साहन दिले तर उद्या मतदान करणार्या राजालाही लोकप्रतिनिधी किंवा पोलीसाशी जाब विचारणा करतांना कोण कशाप्रकारे गेम वाजवणार आणि एंकाऊंटर झाल्यावर परिसरातील लोक पेढे वाटणार हा एक चिंतेचा विषय आहे.