राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेच्या महिलांनी पेढे वाटुन केला आनंद व्यक्त
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- आज दि. 23 सप्टेंबर रोजी कोर्टातून तुरुंगात नेतांना बलात्कारी आरोपी अक्षय शिंदे याचा एंकाऊंटर झाला. आरोपीने पोलीसांची बंदुक हिकसावत स्वतःवर व पोलीसांवर गोळीबार केल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणुन पोलीसांनी थेट डोक्यावर गोळी मारुन अक्षय शिंदेचा एंकाऊंटर केला. एंकाऊंटरची बातमी मिळताच बदलापुरात महायुतीच्या काही राजकारण्यांनी तसेच विशेष करुन असंख्य महिलांनी बदलापुरात जल्लोष केला.
अक्षय शिंदेच्या मृत्युच्या बातमीनंतर आम्ही अत्यंत खुश आहोत, पिडीत मुलीला न्याय मिळाले आता पोलीसांनी जो उदाहरण सेट करुन ठेवला आहे यामुळे भविष्यात मुलींची व महिलांची कोणी छेड काढणार नाही. आम्ही पेढे वाटुन आनंद साजरा करत आहोत असे प्रियंका दामले राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला पदाधिकारी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक कॅप्टन. आशिष दामले यांची पत्निंनी मिडियाजवळ आपली प्रतिक्रिया दिली.
त्याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदलापुर शहराध्यक्षा संगिता चेंदवणकर सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनी देखील प्रतिक्रियेत बदलापुर पोलीसांचे आभार मानत बदलापुर पोलीसांचे नाव संपुर्ण देशात जागत आहे अशी सांगत आनंद व्यक्त केले. पेढे वाटणार्या महिलांनी देखील आम्ही आज अत्यंत खुष आहोत आणि आजचा दिवस दिवाळी सारखा आम्ही साजरा करणार असे म्हटले.
बदलापुरात ठिकठिकाणी काही नागरिकांनी फटाक्यांचे आतिषबाज करुन अक्षय शिंदेचा एंकाऊंटर झाल्यामुळे बदलापुरात जल्लोष असल्याचे दाखवुन दिले.
बदलापुरात ही एक जल्लोषाचे चित्र एक ठिकाणी दिसत असले तरी त्या पिडीत मुलीला खरोखरच न्याय मिळाले का असा प्रश्न आजही सुज्ञ नागरिक विचारत आहेत.
अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा म्हणुन नागरिकांनी आंदोलन केले त्यातील अनेक निष्पाप आजही तुरुंगात जामिनासाठी वाट बघत आहेत. अनेक आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी मारहाण केले होते त्यांना आज ही तो मार पुन्हा पुन्हा पोलीस ब्रुटालिटीचे स्मरण करुन देत आहे. पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबियाची संपुर्ण माहिती शिवसेना शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे याने सोशल मिडियाद्वारे माहिती उघडकीस करत संपुर्ण समाजात मुलीचे अब्रु वेशीवर टांगुन ठेवले. पिडीतेच्या आईने पोलीसात तक्रार केल्यानंतर सुद्धा म्हात्रे व इतर साथीदारांना अटक झाले नाही. त्यामुळे नेमकं कोणत्या प्रकारे पिडीत मुलीला न्याय मिळाले हे अद्याप सुज्ञ नागरिकांना समजत नाहीये परंतु कदाचित पोलीसांच्या या प्रक्रियेमुळे भविष्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्कार थांबणार व महिलांची छेडछाड आणि बलात्कार प्रकरण होणार नाही अशी अपेक्षा करुयात.
वाचकांच्या माहितीसाठी अटक आरोपीला न्याय पालिकेकडून कठोर कारवाई न देता पोलीसांकडून फेक एंकाऊंटर करुन जीव ठार मारल्याच्या अनेक घटनांनंतर ही बदलापुरात अल्पवयीन मुलीवर त्या दिवशी बलात्कार झाला. त्यामुळे ठोकशाही आणि फेक एंकाऊंटर खरोखरच गुन्हेगारी थांबवणार का ? यावरच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
विशेष म्हणजे आज ज्या पोलीसांवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी प्रियंका दामले विश्वास दाखवत धन्यवाद देत आहेत त्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल होतांंना पोलीसांकडे गेल्या नव्हत्या, विशेष म्हणजे पोलीसांनी त्यांना फरार घोषीत केले होते. त्यामुळे बदलापुरात वातावरण कधी पलटी होईल हे कोणीच सांगु शकत नाही.
राष्ट्रवादी आणि मनसे प्रमाणे शिवसेनेच्या वतीने ही बदलापुर शहर पदाधिकार्यांनी फटाक्यांची माळ लावत अक्षय शिंदे नकरात गेला ची घोषणा करत आनंद व्यक्त केले. महिला पदाधिकारी सौ. सरुढकर यांनी पोलीस प्रशासनाचे व महाराष्ट्र सरकारचे आभार मानत एका महिन्यात न्याय मिळवुन दिल्याबद्दल आभार मानले.