बदलापुरात चेन स्नैचिंगच्या गुन्ह्यात वाढ ; महिलांमध्ये भितीचे वातावरण

Date:

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच बदलापुर येथील मोहन ग्रिन वुड फेज 2 येथील महिला रहिवाशीच्या गळ्यातील चेन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्ती ने घेऊन पळ काढल्याने पुन्हा एकदा बदलापुरात चेन स्नैचिंगच्या घटने वाढ होतांना दिसुन येते.

पिडीत महिलेचे नाव मानसी हेमकांत सोनावणे असुन त्या दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास आपल्या घरी जातांना सोसायटी आवारातच अज्ञात चोरट्यांनी पिडीतेच्या गळ्यातील चेन हिस्काऊन तेथून पळ काढला. याबाबत पिडीतेच्या पतिने सोसायटीच्या सेक्रेटरीकडे सी.सी.टी.व्ही. फुटेजची मागणी केली व स्थानिक पोलीस ठाण्यात चेन स्नैचिंगच्या घटनेची माहिती दिली आहे.

तक्रारदाराच्या जबाबानंतर बदलापुर पश्चिम पोलीसांनी तातडीने फुटेज घेऊन गुन्ह्याचा तपास करत असुन लवकरच गुन्हेगाराला अटक करण्याचे पोलीसांनी आश्वासन दिले आहे.

सध्या ज्याप्रकारे सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे व त्यातच बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे चेन स्नैचिंगच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसुन येते. पोलीस प्रशासन देखील या चेन स्नैचिंगच्या टोळीला अटक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर कार्यरत असल्याचे सुत्रांकडून समजते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...