बदलापुर पोलीसांची पुन्हा एकदा नाचक्की
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- अल्पवयीन मुलीचे बलात्कार करणारा अक्षय शिंदे उर्फ काठीवाला दादा ह्याने आज उल्हासनगर कोर्टातुन बाहेर येतांना पोलीसांच्या ताब्यातील पिस्तुलीने स्वतःवर तीन राऊंड फायर करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती समोर येत आहे. ह्यामुळे पुन्हा एकदा बदलापुर पोलीसांच्या कार्यपद्धतीची नाचक्की होतांना दिसत आहे.
बदलापुर येथे भाजप पक्षातील पदाधिकार्यांंकडून चालवण्यात येणार्या आदर्श विद्यामंदिराचा सफाई कर्मचारी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरण घडल्यानंतर संपुर्ण बदलापुरात नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाले व नागरिकांना उद्रेक आंदोलनात दिसुन आले. बदलापुरच्या आंदोलनाची तसेच महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार घटनेची चर्चा संपुर्ण देशात होत असतांना स्थानिक पातळीवर पोलीसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केले. त्यानंतर गुन्ह्याचा तपासासाठी एस.आय.टी. कडे सोपविण्यात आले. विशेष म्हणजे एस.आय.टी. च्या पथकाने सुद्धा विशेष काही तपास केले नाही हे देखील मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सांगितले होते त्यामुळे महाराष्ट्र पोलीस खात्याच्या कार्यप्रमाणीवर सुरुवातीपासुनच प्रश्न चिन्ह उपस्थित होते.
आज 23 सप्टेंबर 2024 रोजी कोर्टात नेतांंना जो प्रकार घडला जेथे पोलीसांच्या ताब्यातून शस्त्रातून आरोपी स्वतःवर गोळीबारचा प्रकार घडतो व पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीसांची नाचक्की झाल्याचे दिसुन येते. नागरिकांना आता थेट हे खरोखरचे पोलीस की नाटकातले पोलीस असा सवाल विचारत आहेत. तसेच आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला कि यामागे देखील पोलीसांची काहीतरी खेळी आहे असा प्रश्न आता जागृक नागरिकांकडून होत आहे.
अर्थातच पोलीसांकडून अश्या प्रकारची चुक कशी होऊ शकते जेथे आरोपी पोलीसांकडून शस्त्र हिस्काऊन घेतो आणि तीन राऊंड फायरिंग सुद्धा करतो. मुळात जेव्हा अतिरेका हल्ला होतो किंवा एखाद्याकडून दहशतवादी कृत होतं तेव्हा मात्र याच पोलीसांच्या पिस्तुल आणि रायफल वेळेवर चालत नाही. टेक्लिकल हे शस्त्र जेव्हा पोलीस आपल्या कमरेला लावतात त्यावेळी लॉक केलेले असते व सफाई कामगाराची तो लॉक उघडायचे कसे हे सहजासहजी कळत नाही त्यामुळे पोलीस कोठडीत आरोपीला काय काय ट्रेनिंग देण्यात आली हे आता तपास करणे गरजेचे आहे असे देखील जागृक नागरिकांनी मागणी केली आहे. एकुणच पोलीसांकडून जो काही प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना वेढ्यात काढण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचे दिसुन येते.
एका शास्त्रज्ञाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आरोपीला मदत होण्यासाठी देखील अश्या प्रकारचे कृत्य होण्यास भाग पाडू शकतात कारण त्यामुळे आरोपीची मानसिक स्थिती योग्य नाही हे कोर्टात दर्शवुन जन्मठेपेची शिक्षा कमी करण्यासाठी भविष्यात मदत मिळते.
एका अनुभवी वकिलाने देखील नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडीत किती वेळेसाठी ठेवण्यात आले व कोठडीतून बाहेर म्हणजेच पोलीसांच्या कॅबिनमध्ये किती वेळ ठेवण्यात आले हे देखील तपासणी गरजेचे आहे कारण त्यामुळे बरेच काही उघड होण्यास मदत मिळेल. मुळात बलात्कार करणारा आरोपी पोलीस कोठडीत पोलीसांकडून मारहाण झाल्यानंतर कोर्टात नेतांना कोर्टाबाहेर स्वतःहुन पोलीसांच्या ताब्यातील बंदुक घेऊन फायरिंग एखाद्याच्या मार्गदर्शनाशिवाय करणार हे काही पटण्यासारखी घटना नाही. त्यामुळे तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.
या सगळ्या घटनानंतर आता अक्षय शिंदेला कोर्टात नेेणार्या त्या सर्व पोलीसंना तात्काळ निलंबन करण्याची मागणी जोर धरत आहे. एके ठिकाणी पोलीसांविषयी बातमी प्रकाशित केल्यास किंवा पोलीसांना त्यांच्या जबाबदारी बाबत सांगितल्यास सामान्य नागरिकांवर आणि पत्रकारांवर महाराष्ट्रातील पोलीस राग व्यक्त करतात त्यातच दुसर्या ठिकाणी पोलीसांचे कारस्थान पाहिल्यावर अश्या पोलीसांना शिव्या आणि जोड्या नाही तर काय नारळ देऊन सत्कार करायचं का? असे मत बदलापुरकर व्यक्त करत आहेत.
बातमी प्रकाशित करतांना माहिती मिळते कि अक्षय शिंदे याचा रुग्णालयात मृत्यु झाला आहे. बातमीसाठी क्लिक करा