बलात्कार्याला आज ही भारतात न्याय पालिका शिक्षा देण्यास असमर्थ
भारतातील खोट्या एंकाऊंटर ने होणारी हत्या कधी थांबणार?
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतीय न्याय व्यवस्थाची संपुर्ण भारत देशात दैयनिय अवस्था झाली आहे हे नुकताच बलात्कारी अक्षय शिंदेच्या गोळीबार आणि मृत्यु प्रकरणातुन दिसुन येते. भारत ज्या देशाला भविष्यातले महाशक्तीशाली होणारे देश म्हणुन सध्या भारतीय संबोधत असतात त्या भारत देशात न्याय व्यवस्थेतून एका बलात्कारीला योग्य शिक्षा देता येत नाही हे आज 23 सप्टेंबर 2024 रोजी दिसुन आले.
आज बदलापुर पोलीसांकडून बलात्कारी आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टात नेतांना कोर्टाबाहेर अक्षय शिंदेकडून गोळीबारचा प्रकार घडला. ज्यामध्ये अक्षय शिंदेने पोलीसांच्या ताब्यातील बंदुक हिस्काऊन गोळीबार केला व त्याला प्रतिउत्तर म्हणुन पोलीसांनी देखील गोळीबार करत अक्षय शिंदेला जखमी केले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. बलात्कारीचा मृत्यु झाला म्हणुन अनेक जण खुष झाले असतील परंतु काय खरोखरच त्या पिडीत मुलीला न्याय मिळेला का ? हा विचार मात्र ठराविक लोकांना सतावत आहे.
भारतीय न्याय व्यवस्था आज एखाद्याने बलात्कार केल्यानंतर शिक्षा देऊ शकत नाही व कायद्याला बगल देत पोलीसांच्या खेळीनंतर खोटे एंकाउंटर करत आरोपीला शिक्षा दिली जाते असा आरोप आता नागरिकांकडून पोलीसांवर होत आहे. पोलीस ज्यांच्या ताब्यात असलेली बंदु आरोपी अक्षय शिंदे हिसकावतो हे एका चित्रपटाच्या सिनप्रमाणे आहे. नेटफ्लिक्स मधील काही एपिसोड पाहिल्यावर अगदी चांगल्या प्रकारे कळुन येईल कशाप्रकारे भारतीय पोलीस खोट्या एंकाऊंटरमुळे जागतिक पातळीवर बदनाम आहे. आज झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा भारतातीय पोलीसांकडून खोट्या एंकाऊंटरचे सत्र सुरुच असल्याचे पुन्हा एकदा बोलले जात आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर न्याय पालिका शिक्षा देऊ शकत नाही म्हणुन पोलीसांनी शिक्षा दिली असे म्हणुन जर काही मुर्ख भारतीय नागरिक पोलीसांचे कौतुक करत असतील तर त्यांना देखील माहित नाही भविष्यात हेच पोलीस त्या मुर्खांना देखील खोट्या एंकाऊंटर करतांना मागे पुढे पाहणार नाही. मुळात कायद्याप्रमाणे एखाद्याला शिक्षा देण्यात भारतीय न्याय व्यवस्था असमर्थ आहे हे पुन्हा एकदा आजच्या फेक एंकाऊंटरमुळे दिसुन आले.
या घटनेनंतर आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडून भारतीय पोलीसांच्या कार्यप्रमाणीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मृत अक्षय शिंदे याची तातडीने पोस्टमॉर्टम करण्यात यावी तसेच पोस्टमॉर्टम करणार्या डॉक्टरांवर राजकिय आणि पोलीस दबाव होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मागणी आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसाार पोलीसांनी मागील अनेक दिवस बलात्कारी आरोपीला 10-10 तास मारहाण करत 23 सप्टेंबर रोजी कशाप्रकारे पोलीसाकडून बंदुक हिस्कावणे आहे याबाबत ट्रेनिंग दिले असा पोलीसांवर आता आरोप होत आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टम मधून आरोपीला पोलीस कोठडीत कशाप्रकारे मारहाण झाली तसेच गोळीबार झालेल्या ठिकाणी देखील फॉरेन्सिक रिपोर्ट तातडीने तपास करणे गरजेचे आहे कारण ह्या शिवाय खरं काय घडलं हे सांगताच येणार नाही. मुळात आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळीबार करण्यासाठी त्याला कोणी दबाव दिले हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
यापुर्वी हैदराबाद याठिकाणी सुद्धा पोलीसांनी अश्याच प्रकारे काही तरुणांना ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप होता त्यांना तपासासाठी घटनेस्थळी शेतीवर नेह त्याठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करत फेक एंकाउंटर केले होते. याबाबत जागतिक पातळीवर तसेच भारतीय मानवाधिकार संघटनेने पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे फेक एंकाउंटर करुन संपुर्ण विषयाला दाबण्यासाठी भारतात विविध ठिकाणी अनेक प्रकार पोलीसांकडून आजवर प्रयत्न झाल्याचे तपासात आणि कोर्टाच्या निकालातून दिसुन येते. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या काळातुन महाराष्ट्र पोलीस खात्याने उल्हासनगरात काय कारस्थान केले हे सामान्य जनतेला माहित असणे गरजेचे आहे.