-बदलापुर आंदोलन प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी पत्रकारांवर दाखल केला होता गुन्हा
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात स्थानिक पोलिस प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत नसल्यामुळे संतापलेल्या बदलापुरच्या जनतेले जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनाचे वार्तांकरण करणार्या काही स्थानिक पत्रकारांवर स्थानिक बदलापुर पुर्व पोलिस ठाणे व भिवंडी गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करत आंंदोलनकर्तांप्रमाणे पत्रकारांना ही नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केले. याबाबत बदलापुर विकास मिडियाने थेट महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग आणि पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. विशेष म्हणजे बदलापुर विकास मिडियाच्या वार्ताहरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले नाही परंतु इतर पत्रकारावर सदर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या बाजुने बदलापुर विकास मिडियाने तक्रार अर्ज वरिष्ठांकडे दाखळ केले.
सदर तक्रार अर्जाची दखल घेत आता ठाणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध1) श्री. शेखर बागडे यांच्यामार्फत चौकशी सुरु करण्यात आल्याचे समजते. दि. 20 सप्टेंबर रोजी बदलापुर विकास मिडियाला याबाबत ठाणे शहर गुन्हे शाखेने लेखी स्वरुपात माहिती देखील दिली आहे.
सध्या बदलापुर सह संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आणि भारत देशात प्रामाणिकपणे पत्रकारिता करणार्यांवर सत्ताधार्यांकडून दबावतंत्र, हल्ला होणे हा प्रकार वाढला आहे त्यातच पोलिस देखील विनाकारण पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याने या कृत्याला कुठेतरी लगाम लागली पाहिजे या अनुषंगाने ब्रिटेन येथील महाराष्ट्र विकास न्युज मिडिया लि. सध्या कार्यरत आहे. आपल्याही शहरात जर एखाद्या पत्रकारावर किंवा सामान्य नागरिकावर पोलिसांनी अन्याय केल्यास badlapurvikas@gmail.com या ईमेल वर माहिती पाठवावी मदत नक्की मिळेल.