बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- आज दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापुर पश्चिम येथील सुमन मेडिकल परिसरातील पथदिवा कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा कुळगांव बदलापुर नगपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.
कुळगांव बदलापूर नगरपरिषद संपुर्ण शहरात व प्रत्येक वार्डात कोट्यावधी रुपये विकास कामात खर्च करते व ठराविक ठेकेदारांना ठेका दिला जातो परंतु ठेकेदार ते काम प्रामाणिकपणे करतात की चुना लावतात हे आजवर पालिका प्रशासनातर्फे निरीक्षण करण्यात आलेले नाही. असाच प्रकार आज सुमन मेडिकल परिसरात घडल्यानंतर पथदिवा बसविलेल्या ठेकेदाराला किती रुपयांचा ठेका देण्यात आला होता व त्या कामाच्या आदेशात काय नियम दिले होते याबाबत जागृक नागरिक प्रश्न विचारत आहेत. पथदिवेची अवस्था पाहिल्यावर अत्यंत जंग लागल्याने धोकादायक अवस्थेत मागील अनेक महिन्यापासुन असल्याचा अंदाज लावता येतो मग ठेकेदाराची आणि पालिस प्रशासनाची जबाबदार नव्हती का ? पथदिव्याचा खांब तातडीने बनलण्याची? सदर अपघातात एखाद्या बदलापुरकराचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आता जागृक नागरिक विचारत आहेत.
नुकताच पालिकेत नविन मुख्याधिकारी आले आहे व सदर खांब कोसळल्याची घटनेनंतर पुन्हा एकदा पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जगजाहिर होत असल्याने नव्या मुख्याधिकारीने तातडीने या विषयाची दखल घेत संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी व तातडीने अश्या ठेकेदाराला ब्लैक लिस्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.