मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वाचा आदेश दिले आहे ज्यामुळे डांसबार वर काम करणार्या वेटर आणि कर्मचार्यांची पोलीसांकडून होणारी पिळवणुक थांबण्यास मदत होईल. सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे पुन्हा एकदा मुंबई पोलीसांच्या कारभारावर टीका होत आहे.
डांस बार, लेडिस बार व मद्यपान विक्री करणारे साधारण बार याठिकाणी अनेकदा पोलीस प्रशासनाकडून कारवाई होते व वेटर विरोधात अश्लिलता पसरविण्याबद्दल भादवि 294 प्रमाणे गुन्हा दाखल केला जातो. ह्यात बहुतांंश वेळी बार चालकाला नाहक त्रास देण्यासाठी पोलीसांकडून सिस्टमचा वापर केला जातो व त्यामुळेच अनेक बार नंतर पोलीसांना महिना हप्ता देण्यास सुरुवात करतात. त्यामुळे कलम 294 पोलीसांना अतिशय फायद्याचे असल्याचे आजवर दिसुन आले.
परंतु नुकताच एका वेटर ने पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितले असता न्यायमुर्ती ए.एस. गडकरी व निला गोखले यांनी निकाल दिले आहे. कोर्टाच्या असे निदर्शनास येते कि, डांस बार, लेडिब बार अश्या ठिकाणी काम करणारे जे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतात सर्विस देतात अश्यांवर अश्लिलतेचा गुन्हा दाखल होणे चुकीचे आहे. ते वेटर फक्त त्यांचा सर्विस देण्याचा काम करत आहेत, एंटरटेनमेंटची मजा घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना सेवा पुरवत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून अश्लिलता पसरविण्याचा कुठलेही संबंध येत नाही त्यामुळे अश्यांवर भादवि 294 प्रमाणे कारवाई योग्य नाही असे म्हणत वेटर विरोधातील गुन्हा तातडीने स्क्वैश करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता मुंबई पोलीसांसह महाराष्ट्र राज्यातील इतर शहर व ग्रामिण भागातील पोलीसांना देखील हा नियम त्रासदायक ठरणार असे दिसुन येते. कारण अनेकदा या कायद्याची भिती दाखवुनच बार चालकांना नाहक त्रास काही पोलीसांकडून दिला जातो व लाचेची उखळणी केली जाते परंतु आता ते कुठेतरी थांबण्यास मदत होईल.
प्रकरण 2016 साली 14 अप्रिल रोजी घडले होते ज्यामध्ये मुंबई पोलीसांच्या सामाजिक सेवा शाखेच्या वतीने न्यु पार्क साईड बार एण्ड रिस्टोरंट वर कारवाई केली होती ज्यामध्ये अनेकांना अटक करण्यात आले, त्यातीलच एक वेटर म्हणजे मालाड येथील रहिवाशी संतोष रोडरिगुस. कोर्टाने निकाल देतांना यापुर्वीच्या एका निकालाचाही उल्लेख केला ज्यामध्ये फक्त बार मध्ये कामाला आहे म्हणुन अश्लिलतेच्या कलमांचा आकर्षण चुकीचे आहे असे नमुद होते.