कर्नाटका उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती वेदव्यसाचार शिरीशानंदा यांची जीभ ढासळली
महिला वकिलाशी बोलतांना अपमानजनक शब्दांचा वापर
कर्नाटका (महाराष्ट्र विकास मिडिया)- भारतीय महिला व अल्पवयीन मुलींवर संपुर्ण भारत देशात विविध ठिकाणी बलात्कार, विनयभंग व अत्याचारच्या घटना दररोज वाढल्या आहेत. पिडीत महिलांना न्याय मिळणार कि नाही याची खात्री नाही परंतु आरोपीला मात्र अटकपुर्व जामिन व जामिन कोर्टातुन मिळुन जातो. आता थेट कर्नाटका हाई कोर्टाचे न्यायमुर्तींनीच एका महिला वकिलाशी अतिशय खालच्या पातळीवर संभाषण केल्याने हे न्यायधिश कि टपोरी असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.
नुकताच कर्नाटका उच्च न्यायालयाने न्यायाधिश वेदव्यसाचार शिरीशानंदा हे आपल्या कृत्यामुळे वादाच्या भोवर्यात साडपले आहे. नुकताच सुप्रिम कोर्टाने सुमोटी घेट एका प्रकरणात सदर न्यायाधिशाला नोटीस पाठविले असुन त्यांनी भारतातील एका ठिकाणाला पाकिस्तान असा उल्लेख केला होता. त्याबाबत महाराष्ट्र विकास मिडियाने सविस्तर बातमी प्रकाशित केली आहे. आता या न्यायाधिशाकडून अजुन एका महिला वकिलाला अतिशय खालच्या पातळीवर संभाषण ते देखील कोर्टात लाईव्ह कैमर्यासमोर केल्याचे दिसुन आल्याने पुन्हा एकदा न्यायाधिश शिरीशानंदवर जोरदार टिका होत आहे.
एका प्रकरणात न्यायाधिश शिरीशानंद वकिलाला सांगतात, कागद उपलब्ध आहे म्हणुन इथे बसुन अर्ज करु शकत नाही. हा (आरोपी) घरी जाणार, जेल मध्ये जाणार 3 वर्षांसाठी? कळतय का? यावर पुरुष वकिलाने होय समजले असे म्हटले. त्यानंतर शिरीशानंद म्हणतात, अकाऊंटचे बुक्स कुठे आहेत? हा इन्कम टैक्स असेसी आहे का? यावर महिला वकिलाने होय, हा इन्कम टैक्स असेसी आहे इतकीच म्हटल्यानंतर न्यायाधिश शिरीशानंद यांनी राजाच्या भरात थांब ग अम्मा, तु कशाला बोलतेस, तुला सगळच माहित आहे ह्याचं. उद्या सकाळी हा कोणत्या रंगाची अंडरवेअर घालणार हे सुद्धा सांगणार? असे अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केले.
विशेष म्हणजे न्यायाधिश शिरीशानंद यांचे हे भाष्य कोर्टात सुनावणी वेळी असल्याने लाईव्ह रेकॉर्डींग मध्ये दिसुन आले व सोशल मिडियावर हजारोच्या संख्येत नागरिकांनी टिका करण्यास सुरुवात केली. X अकाऊंट मध्ये @iJaising यांनी थेट शिरीशानंद यांचे संभाषण व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर कर्नाटका उच्च न्यायालयात महिला वकिलांसोबत न्यायधिश कशाप्रकारे वागणुक देतात हे जगभर दिसुन आले.
आधिच भारत देशाचा नाव महिला असुरक्षित असल्या कारणाने जगभरात खराब आहे, युरोप आणि अमेरिकेतील महिला भारतात टुरिस्ट म्हणुन येण्यास ही दोन वेळेस विचार करतात आणि बलात्काराच्या घटनेमुळे घाबरतात. त्यात स्थानिक भारतीय महिलांना विशेष म्हणजे त्याच उच्च न्यायालयात युक्तीवाद करणार्या महिला वकिलाला ज्याप्रकारे अश्लिल टिप्पनी करत अपमान केले जाते हे आश्चजनक आहे तितकेच चिंतेचा विषय ही आहे. जेव्हा भारतातील एका राज्याचा उच्च न्यायालयाचा न्यायमुर्तीच अश्या प्रकारच्या खालच्या पातळीचे शब्द बोलणार असेल तर गुंडप्रवृत्तीची लोक महिलांना काय काय बोलणार याबाबत विचार ही करायला नको.
या घटनेनंतर अनेक वकिलांनी शिरीशानंद विरोधात बार काऊंसिल आणि सुप्रिम कोर्टात तक्रार केल्याचे समजते.