बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतातीय राजकारण पाहिल्यावर हसावं कि रडावं हेच कळत नाही. विनयभंगाचा आरोपी बदलापुर शहराचा गावगुंड शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी आता बदलापुर शहरातील 10 हजार नागरिकांना आवाहन करत आहे धर्मवीर 2 चित्रपट मोफत पाहण्यासाठी तिकीट सुद्धा पुरवत आहे. परंतु ह्याच म्हात्रेने धर्मवीर आनंद दिघेजींचे कार्य पाहुन आत्मचिंतन करणे गरजेचे आहे अशी नागरिकांची जोरदार टिका होत आहे.
वामन बारकु म्हात्रे जे कुळगांव बदलापुर नगरपरिषदेत नगराध्यक्ष होते व अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत. बदलापुर शिवसेना शहरप्रमुख म्हणुन ही कार्यरत आहे परंतु राजकिय शक्तीचा त्यांनी आजवर जो काही दुरुप्योग केला हे जगजाहिर आहे. पालिका प्रशासनात टीडीआर घोटाळा, रस्त्याच्या कामात घोटाळा, सफाई कामगारांच्या पगारात घोटाळा ह्या अनेक मुद्द्यांवर आजवर म्हात्रेंवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले व त्यांच्यावर गुन्हा ही दाखल आहे. नुकताच त्यांनी एका महिला पत्रकाराचा अपमान सुद्धा केले होते तसेच एवढेच नाही तर अटकपुर्व जामिनावर शहरात वावरत असतांना अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारच्या घटनेची एफआयआर कॉपी देखील सोशल मिडियावर त्यांनी व्हायरल करत त्यांची विकृती बदलापुरकरांसमोर दाखवुन दिली. त्यानंतर बदलापुर शहरात वामन म्हात्रे विरोधात जोरदार संताप नागरिकांकडून दिसुन आला.
नागरिकांचा संताप पाहिल्यावर भविष्यातील राजकिय खेळी चुकु नये म्हणुन वामन म्हात्रे आता 10 हजार बदलापुरकरांना धर्मवीर 2 चित्रपट पाहण्यासाठी वैशाली टॉकीजला जाण्यासाठी आवाहन करत मोफट तिकीट वाटप करत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या उपक्रमानंतर सुद्धा नागरिकांकडून मात्र टिकाच होत आहे. ठाण्याचे धर्मविर आनंद दिघे साहेब हे एक चांगलं उदाहरण देणारे व समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे शिवसैनिक नेते म्हणुन राज्यभर ओळख आहे. त्यांचे कार्य आणि महिलांप्रती आदर हे सर्वांनाच माहित आहे, परंतु आजकालची शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून जो काही तमाशा सुरु आहे त्यामुळे धर्मवीर 2 चित्रपट पाहण्याची खरी गरज कोणाला आहे हे ? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहे. ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते अनाथांवर नोटं उधळतात तर बदलापुरात शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी महिलंचं विनयभंग करात आणि अल्पवयीम मुलीची अब्रु काढण्याचा सोशल मिडियाद्वारे पुरेपुर प्रयत्न करतात. त्यामुळे 10 हजार नागरिकांना धर्मवीर 2 चित्रपट पाहण्याचा सल्ला देण्याऐवजी वामन बारकु म्हात्रे यांनी स्वतः 10 वेळेस चित्रपट पाहुन धर्मवीर 2 चित्रपटातून थोडं संस्कार घेतले पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे हे तिकीट सुद्धा मिळवण्यासाठी बदलापुरकरांना पुन्हा राजकारण्याच्या कार्यकर्त्यांकडे हात पसरवावेच लागणार असुन बदलापुर ही आता 100-200 रुपयांच्या चित्रपटाच्या तिकीटासाठी लाचार नाही ते स्वतः पैसे खर्च करुन जातील चित्रपट बघायला, मोफत तिकीटासाठी घरच्या महिलांना राजकिय कार्यकर्त्यांकडे पाठवुन भविष्यात त्याच नेते-कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा प्रकार घडण्यापेक्षा स्वतः तिकीट खरेदी करणे कधीही चांगलेच असे अनेकांनी बदलापुर विकास मिडियाशी बोलतांना सांगितले.