बलात्कार पिडीतेचे नाव उघडकिस केल्याने वामन म्हात्रेवर बदलापुरकरांचा संताप
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- सत्तेचा माज आणि भ्रष्टाचारातुन कमविलेला पैश्यामुळे कायद्याची कोणत्याही प्रकारची भिती नाही हे पुन्हा पुन्हा शिंदा गटाचे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे दर्शवित आहेत. नुकताच महिला पत्रकाराचे विनयभंग प्रकरणात अटकपुर्व जामिनावर ज्या म्हात्रेची सुटका झाली होती त्याने शहरात पुन्हा एकदा निंदनिय कार्य केले आहे. बदलापुरातील त्या बलात्कार पिडीत अल्पवयीन मुलीचे व परिवाराची संपुर्ण माहिती असलेले पोलिस एफआयआर वामन म्हात्रे व त्याचा साथदार महेंद्र शेळके यांनी सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा आरोप पिडीतेच्या मातेने केले आहे.
बदलापुरातील ज्याप्रकारे नुकताच दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच बलात्काराची घटन घडली त्यामुळे संपुर्ण बदलापुर शहरात हळहळ पसरत संतापाची लाट उसळली होती. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून पिडीतेच्या मातेचे तक्रार घेण्यास टाळाटाळ, अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी वृत्तसंकलन करणार्या महिला पत्रकाराला दमदाटी व अपमानजनक शब्द अश्या अनेक घटना या काही दिवसात बदलापुरात पाहायला मिळाले. त्यामुळे सामान्य नागरिकामध्ये आक्रोश निर्माण होऊन हजारोच्या संख्येत नागरिकांनी आंदोलन केले. ह्या आंदोलनाची चर्चा फक्त शहरात किंवा राज्यात नाही तर संपुर्ण देशात झाल्याचे दिसुन आले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीमोटु करत तातडीने या विषयाची दखल घेत महाराष्ट्र पोलिस खात्याला संबंधीत गुन्ह्याचा एसआईटी कडून तपास कऱण्याचे आदेश देण्यात आले. तसेच त्याच घटनेत ज्या महिला पत्रकाराचा विनयभंग केला त्यावरही स्थानिक पोलिसांनी नागरिकांचा आक्रोश पाहुन अखेर गुन्हा दाखल केला, परंतु शिंदे गटाचा लोकप्रतिनिधी म्हणुन पोलिसांनी आरोपीला अटक मात्र केले नाही. विशेष म्हणजे त्या शाळेतील विश्वस्तमंडळांना पोलिसांनी अटक केले नाही ज्यामुळे आजही ते फरार घोषीत आहेत. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील मुंबई उच्च न्यायालयाने कानउघडणी केली होती. एवढं सगळ होत असतांना विनयभंगाचा आरोपीला कल्याण सत्र न्यायालयाने सुद्धा अटकपुर्व जामिन अर्ज फेटाळत पिडीत महिलेच्या बाजुने निकाल लावला होता. परंतु त्याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी वामन बारकु म्हात्रेचा अटकपुर्व जामिन मंजुर केला.
वामन म्हात्रे याला अटकपुर्व जामिन मंजुर झाल्यानंतर सर्वप्रथम बदलापुर विकास मिडियाने आरोपी बैल पुन्हा शहरात मोकाट ही बातमी प्रकाशित केली होती. त्यामध्ये अगदी स्पष्टपणे नमुद केले होते कि कायद्याची भिती ज्या आरोपीला नाही व गुन्हा करुन सुद्धा कोर्टातुन ज्याला अटकपुर्व जामिन मिळतो तो पुन्हा गुन्हा करतांना घाबरणार नाही. अगदी तेच बदलापुरात घडले आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे या नराधमाने बदलापुर बलात्कार प्रकरणातील पिडीत मुलीची एफआयआर ची कॉपी सोशल मिडियावर व्हायरल केली. म्हात्रेसह त्याचा साथिदार महेंद्र शेळके याने सुद्धा अल्पवयीन मुलीवर कशाप्रकारे बलात्कार झाले ह्या सेंसिटिव्ह विषय ज्या एफआयआर मध्ये आहे ते सोशल मिडियावर व्हायरल केल्याने बदलापुरात अश्या विकृतीविरोधात आता नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त केला आहे.
बलात्कार सारख्या गंभिर गुन्ह्यात पिडीत एक अल्पवयीन असल्यानंतर सुद्धा तिच्या भविष्याचा विचार न करता ज्याप्रकारे शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी म्हात्रे व साथीदार अशाप्रकारचे कृत्य करतांना दिसुन आल्याने हे असले कसले लोकप्रतिनिधी बदलापूरला लाभले आहे याबाबत नागरिक ही आता खेद व्यक्त करत आहेत. एफआयआर व्हायरल झाल्यामुळे अनेकजण व स्थानिक बदलापुरातील पत्रकार त्या पिडीत महिलेच्या घरी जाऊ अनेक प्रश्न विचारत असल्याने पिडीत अल्पवयीन मुलगा अत्यंत घाबरली आहे व त्याचवेळी तिच्या परिवाराला देखील म्हात्रेच्या कारस्थानामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पोक्सो अंतगर्त जेव्हा गुन्हा दाखल होतो अश्यात पिडीत मुलीला ज्या कोणाकडून त्रास होतो त्या प्रत्येकावर पोक्सो अंतगर्त गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतुद आहे त्यामुळेच शाळेतील व्यवस्थापक व शिक्षकांवर ही पोक्सो अंतगर्त गुन्हा दाखल झाला आहे. त्यात घटनेची पोलिस रिपोर्ट सोशल मिडियावर व्हायरल करणार्या वामन म्हात्रे व साथिदारावर ही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होण्याचे संकेत दिसुन येते. यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होते कि गुन्हेगार हा अटकपुर्व जामिन मिळाल्यानंतर सुद्धा विकृती करणे कधी सोडत नाही. वामन म्हात्रे या नराधमाने अगदी काही दिवसातच हे सिद्ध करुन दाखविले आहे.
विशेष म्हणजे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेची एफआयआर वामन म्हात्रे सारख्या राजकारण्याच्या हाती लागतेच कशी हा प्रश्न आता निर्माण होत असुन पुन्हा एकदा भ्रष्ट पोलिस खात्याच्या कारभाराबाबत चर्चा होत आहे. पोलिस एके ठिकाणी वामन बारकु म्हात्रे विरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची एफआयआर वेबसाईटवर पोस्ट करत नाही तर दुसर्या ठिकाणी एका गंभिर आणि संवेदनशील अल्पवयीन बलात्कार प्रकरणाची एफआयआर म्हात्रेला पुरवत असल्याच्या आरोपाने पुन्हा एकदा भ्रष्ट पोलिसांवर नागरिकांनी टिका करण्यास सुरुवात केली आहे.
अल्पवयीन मुलीच्या पिडीत मातेने बदलापुर पुर्व पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दाखल करत आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बदलापुर पुर्व पोलिस आता म्हात्रे विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करतात कि पुन्हा लाचारी करतात यावरच संपुर्ण बदलापुरकरांचे लक्ष लागलेले आहे.