बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी माध्यमांशी बोलतांना राष्ट्रवादीतर्फे शैलेश वडनेरे आमदारकी साठी परफेक्ट उमेदवार अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर मुरबाड, बदलापूर ग्रामिण व शहरी भागात तसेच मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्रातील इतर ग्रामिण भागात शैलेश वडनेरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
मुरबाड विधानसभा क्षेत्रात ज्याप्रमाणे झपाट्याने लोकसंख्या वाढली त्या प्रमाणे रहिवाश्यांना – मतदारांना हवं तसं विकास कामे होतांना या काळी वर्षात दिसलेले नाही त्यामुळे मतदारांना फक्त निराशाच हाती आले. वार्षिक गावजेवण आणि वाढदिवस ह्या व्यतिरिक्त अनेक महत्वाचे विकास कामे आज ही बदलापुर शहरासह मुरबाड विधानसभा क्षेत्रातील ग्रामिण भागात प्रलंबित आहेत. या सगळ्या कारणांमुळे मतदारांमध्ये सत्ताधार्यांबद्दल नाराजी आहे व नव्या चेहर्याला आमदार करण्यासाठी यंदा मुरबाड मतदान संघातील मतदार इच्छुक आहेत. त्यातच शिवसेना तर्फे सुभाष पवार यांचे नाव चर्चेत असतांना राष्ट्रवादी तर्फे शैलेश वडनेरे यांचे नाव देखील आघाडीवर आहे.
मुरबाड मतदार संघातील मतदारांच्या अनेक स्वप्व आहेत व त्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी नव्या चेहर्याची आणि सत्तापालटची आज खर्या अर्थाने गरज असतांना शैलेश वडनेरे यांनी राष्ट्रवादी तर्फे आमदारकी ची निवडणुकीसाठी आपली तैय्यारी दाखवली आहे.
राष्ट्रवादी बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, आजवर जे आले गेले सत्तेतील आमदारांनी आपले स्वप्व पुर्ण केले, आमचे देखील स्वप्व आहेत आणि आमचे स्वप्व हे मतदारांच्या स्वप्नाप्रमाणेच असल्याने यंदा मतदारांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार पदाची निवडणुक लढवण्यास तैय्यार आहे असे सांगत वरिष्ठांच्या आर्शिर्वादाने व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यंदा बदलापूर आणि मुरबाडच्या मतदारांना त्यांची स्वप्व पुर्ण करणारा आमदार मिळणार असे सांगितले.
मागील अनेक वर्षांपासुन मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भाजपचे किसन कथोरे आहेत. मागील अनेक वर्षांपासुन किसन कथोरे हे नाव म्हटल्यावर बदलापुर गांवचं वाढदिवसाचं कार्यक्रम आणि गावजेवण हेच पाठवते. आमदारांनी आजवर कोट्यावधी रुपयांंची निधी शासनाकडून आणली परंतु त्या निधीतून करण्यात आलेले कॉक्रीट रस्त्यांची अवस्था दैयनिय असल्याने विकास कामांच्या नावावर काही शिल्लक नसल्यामुळे दर वर्षी गावजेवणाचा कार्यक्रम हमखास ठेवला जातो अशी शहरात चर्चा आहे. देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्य पातळीवर ज्याप्रकारे भाजप पक्षाने महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी व इतर महत्वाच्या प्रश्नांंवर अद्याप योग्य तो तोडगा काढलेला नाही तसेच पुन्हा पुन्हा धर्माच्या नावाने राजकारण आणि निवडणुक यामुळे आता जनता देखील भाजप पक्षाला कंटाळली आहे. त्यातच राज्य पातळीवर भाजप पक्षातील अनेक नेत्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह यामुळे जनता भाजप आणि नरेंद्र मोदीवर चांगलीच संतापली आहे. पुर्वी मोदींच्या लाटेचा सहारा घेऊन त्यांच्या नावाने आमदार आणि खासदार होण्याचा प्रयत्न करणारे आज मात्र मोदी पेक्षा स्थानिक पातळीवर इतर मुद्देंबाबत म्हणत मत मागतांना दिसत असुन मतदार यंदा जागृक झाल्याचे चित्र नुकताच खासदारकीच्या निवडणुकीनंतर दिसुन आले.
यातच विद्यमान आमदार यांच्यावरील प्रलंबित गुन्हे आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा स्थानिक पातळीवर मतदारांना न्याय मिळत नसल्याने त्या मुद्यावरुन ही कथोरे यांच्यावर मतदारांची जोरदार नाराजी दिसुन येते.
त्यामुळे राष्ट्रवादी तर्फे यंदा शैलेश वडनेरे यांना चालुन संधी आल्याने मतदारांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्यांना सहकार्य मिळेल कि नाही यावरच आता मतदार क्षेत्रात चर्चा आहे.