कॅलिफोर्निया (महाराष्ट्र विकास मिडिया)- भारतातील वाढत्या राजकीय असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, कॅलिफोर्नियातील न्यूआर्क शहरात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना करण्यात आली. मंदिरावर भारतविरोधी गॅफिटी काढण्यात आले असून, यामुळे परदेशातील भारतीय समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यामुळे भारतीय राजकीय परिस्थितीचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाच्या भारतातील कारस्थानमुळे परदेशात होत असलेल्या घटनांवर कसा प्रभाव पडतो याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
न्यूआर्क पोलीस विभागाला शुक्रवारी सकाळी मंदिरावर ग्राफिटी काढल्याची तक्रार मिळाली. पोलीस अधिकाऱ्यांनी सकाळी 8:35 च्या सुमारास घटनास्थळी जाऊन मंदिरातील नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी ही विटंबना धमकावण्यासाठी केलेली आहे असे स्पष्ट केले. पोलिसांनी या घटनेची संभाव्य द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास सुरू केला आहे.
ग्राफिटीमध्ये ‘खालिस्तान’ शब्दाचा वापर करण्यात आला असून, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरील भूमिकेमुळे निर्माण झालेल्या तणावाचे प्रतीक आहे. मोदी सरकारने खालिस्तान चळवळीविरोधातील आपली कठोर भूमिका जाहीर केल्यामुळे परदेशातील शीख समाजामध्ये प्रचंड संताप उसळला आहे. परिणामी, अमेरिका, कॅनडा, आणि युकेसारख्या देशांमध्ये भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत.
सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आम्ही न्यूआर्क, कॅलिफोर्नियातील एसएमव्हीएस श्री स्वामीनारायण मंदिरावर करण्यात आलेल्या भारतविरोधी विटंबनेचा तीव्र निषेध करतो,” दूतावासाने X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट केले. या कृतीमुळे परदेशातील भारतीय समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे त्यांनी सांगितले आणि अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.
ही घटना भारतविरोधी कारवायांच्या वाढत्या यादीत भर घालणारी आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशांतर्गत असंतोष वाढत असून, त्याचे पडसाद परदेशातही उमटत आहेत. कॅनडास्थित खालिस्तान टायगर फोर्सचे (केटीएफ) प्रमुख हरदीप सिंग निज्जर यांच्या मृत्यूनंतर खालिस्तान समर्थकांच्या भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारतातील सरकारी अधिकार्यांच्या मदतीने हरदीप सिंग निज्जर यांची हत्या केल्याचा दावा खलिस्तान सदस्यांकडून होत आहे.
न्यूआर्क पोलीस या प्रकरणाला प्राधान्य देत असून, पुरावे गोळा करण्यासाठी आणि दोषींना शोधून काढण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस विभागाने समुदायातील सदस्यांना पुढे येऊन तपासाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्धचे तणाव परदेशातही तीव्र होत आहेत. यापूर्वी, जुलै महिन्यात खालिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावर हल्ला करून तेथे आग लावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनांमुळे भाजपच्या धोरणांविरोधात परदेशातील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये वाढती नाराजी निर्माण झाली आहे.
न्यूआर्कमधील ही तोडफोड अमेरिकेत शीख वेगळावादी नेते गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या हत्या कटात भारतीय अधिकाऱ्यांच्या संलग्नतेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. या घटनांमुळे राजनैतिक तणाव वाढला असून, शीख समुदाय आपल्या नाराज्या अधिक स्पष्टपणे व्यक्त करत आहे.
विटंबनेची घटना ही काय पहिल्यांदाच झाले असे नाही तर यापुर्वी 12 ऑगस्ट 2023 रोजी, कॅनडाच्या सुरे येथील लक्ष्मी नारायण मंदिरावर खालिस्तान समर्थकांनी ग्राफिटी काढून विटंबना केली होती. या दोन्ही घटना मोदी सरकारच्या धोरणांबद्दल वाढत्या नाराजीकडे निर्देश करतात, ज्याचा परिणाम परदेशातील भारतविरोधी हिंसक प्रतिक्रिया आणि विटंबनेद्वारे दिसून येतो.
मंदिराची विटंबनाबाबत अमेरिकेतील नागरिकांना माहिती मिळताच तातडीने स्थानिकांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त करत बोर्डावरील ग्राफिटी पुसण्याचे काम केले. त्यावेळी परदेशी नागरिक ग्राफिटी मिटवुन सहानुभुती दाखवत असतांना काही भारतीय मात्र त्याचा ही सेल्फी काढून उगाचच सोशल मिडियावर टाकुन आपलाच गवगवा करतांना दिसुन आले. या घटनेनंतर खलिस्थान समाजाचे काही बैनर देखील काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याचे समजते.
मंदिराची विटंबनाबाबत अमेरिकेतील नागरिकांना माहिती मिळताच तातडीने स्थानिकांनी एकत्रित येऊन निषेध व्यक्त करत बोर्डावरील ग्राफिटी पुसण्याचे काम केले, त्यात सिख समाजातील नागरिकांचा ही समावेश होता. त्यावेळी परदेशी नागरिक ग्राफिटी मिटवुन सहानुभुती दाखवत असतांना काही हिंदु भारतीय मात्र त्याचा ही सेल्फी काढून उगाचच सोशल मिडियावर टाकुन आपलाच गवगवा करतांना दिसुन आले. या घटनेनंतर खलिस्थान समाजाचे काही बैनर देखील काही समाजकंटकांकडून फाडण्यात आल्याचे समजते.
विशेष म्हणजे ज्याप्रकारे परदेशात हिंदुंच्या मंदिरांची विटंबनाचा प्रकार होत आहे अगदी त्याचप्रमाणे भारतात सुद्धा मुस्लिम, ख्रिस्त व इतर धर्माच्या प्राथर्नाास्थळावर हिंदुंचे रक्षक म्हणवणार्या काही समाजकंटकांकडून गैरप्रकार होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा मशिदी आणि चर्चची विटंबना केली जाते तेव्हा ह्याच भाजप पक्षातील स्थानिक नेते त्या कार्यकर्त्यांचा हारतुरे देऊन स्वागत करतात आणि भडकाऊ भाषण देऊन असंख्य तरुणांच्या मनात विष कालवताना दिसुन आले. तीच मंडळी आज अमेरिका व इतर देशात भारतातील हिंदु मंदिरांची विटंबना होण्याची बातमी ऐकल्यावर खदखद आणि नाराजी व्यक्त करत असुन भारतात ही कशाप्रकारची हिपोक्रिसी सुरु आहे याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. मुळात कोणत्याही धर्मावर हल्ला होता कामा नये. मंदिर असो किंवा मशिदी – चर्च कोणत्याही प्रार्थना स्थळाची विटंबना होऊ नये ज्यामुळे त्या धर्माचा आणि नागरिकांच्या भावनेला दुख होईल.