बदलापुर पोलिस ठाण्याचा भ्रष्ट कारभार सोशल मिडियामुळे उघड्यावर!

Date:

महाराष्ट्र पोलिस महासंचालक आईसीएस रश्मि शुक्ला लक्ष देणार?

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर शहर हद्दीतील भ्रष्ट पोलिस खात्याचा कारभार सध्या संपुर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. बदलापूर पुर्व पोलिसांचा कारस्थान नुकताच बदलापुर जनआक्रोश आंदोलन व विनयभंग प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत असतांना बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यातील अनैतिक धंदे आता सोशल मिडियामुळे उघड्यावर आल्याचे दिसुन येते.

नुकताच बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यातर्फे कार्यरत असलेल्या समर्थ चौकीत होणार्या भ्रष्ट आणि सेटलमेंट कारभाराबाबत बदलापुर विकास मिडियाने बातमी प्रकाशित केल्यानंतर हजारोंच्या संख्येत सोशल मिडियावर बदलापुरकरांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नमुद करत कशाप्रकारे बदलापुर पुर्व पोलिसांकडून अन्याय होत आहे हे व्यक्त केले.

सोसायटीचा मोटर चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडून मोटर जप्त केले व ते मुद्देमाल सोसायटीधारकांना देण्यासाठी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा एका नागरिकाने आरोप केला आहे. शेवटी पोलिस लाच घेतल्याशिवाय मोटर देत नाही म्हणुन 1500 रुपये लाच देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. दुसर्या नागरिकाने बश्चिम बाजार पेठेत जुगाराचा धंदा चालतो व तक्रार करणार्या जागृक नागरिकांचे नाव पोलिस गुंडांना सांगुन मारहाण करायला लावले असे आरोप करण्यात आले. एकाने असेही कमेटद्वारे म्हटले कि, तो भाजी विक्रीचा व्यवसाय करु लागले व त्याकडून एका गुंडाने खंडणी मागितली, खंडणी दिली नाही म्हणुन डोक्यात डगर मारुन जीव घेणा हल्ला करण्यात आला. बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता पैसे उसले घेतले म्हणुन मारहाण अशी तक्रार नोंद करण्यात आली असे त्यांचे म्हणणे आहे. एका ने असेही कमेंटद्वारे म्हटले आहे कि बदलापुर पोलिसांकडून मदतीची अपेक्षा करु करा ते मदत करण्याऐवजी तक्रारदारालाच अडकवण्यात बहाद्दर आहेत. अजुन एका जागृक नागरिकाने कमेंटद्वारे माहिती दिली कि,  बदलापुरात रिक्षा स्टैंडजवळ काही गरिब फळ विक्री करत होते त्यांंना गुंडांच्या मदतीने हटवण्यात आले व आता अनैतिक धंदा त्याठिकाणी चालतो, पोलिक मात्र काही करत नाही. एका तरुणाने अशी देखील विचारणा केला आहे कि, बदलापुर शहराचे पोलिस ठाण्यात इतक्या आत गावात कोणत्या कारणामुळे? 

विशेष म्हणजे अनेकांनी सत्ताधारी भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वर देखील जोरदार टिका करत अश्या भ्रष्ट पोलिसांना गृहमंत्री कारणीभूत असल्याचाही आरोप केला आहे. पोलिस रक्षक नाही भक्षक आहेत असेही अनेक जणांनी कमेंटद्वारे आपले मत व्यक्त केले.

त्यामुळे बदलापुर शहरातील पोलिस ठाण्याचा कारभार काही नियमाप्रमाणे दिसुन येत नसुन याच लाचखोरीत स्थानिक पासुन ते ठाणे पोलिस आयुक्त पर्यंत लिंक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आता महाराष्ट्र पोलिस महासंचालक आईपीएस रश्मि शुक्ला यांनीच जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याची जागृक बदलापुरकरांची मागणी आहे.

महाराष्ट्र पोलिस खात्यात आजही हजारो प्रामाणिक पोलिस कर्मचारी आणि अधिकारी काम करतात परंतु काही ठराविक भ्रष्ट अधिकार्यांमुळे संपुर्ण पोलिस खात्याचं नाव खराब होत असुन त्या समस्यावर तातडीने तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे व आईसीएस शुक्ला यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा आहेत.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...