अंबरनाथ येथील पाटा वरवंटा ढाबा चालकांकडून कामगारांची फसवणुक

Date:

– अद्याप पोलिसांनी केली नाही आरोपी विरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ (महाराष्ट्र विकास मिडिया)- अंबरनाथ फोरेस्ट नाका आरटीओ पोलिस चौकी जवळ पाटा वरवंटा नावाचा एक ढाबा आहे. त्या ढाबा चालकांकडून ढाब्यावर काम करणार्या अनेक कामगारांची फसवणुक केल्याची घटना समोर येत आहे. विशेष म्हणजे कामगारांची आर्थिक फसवणुक करुन ढाबा चालवणारे सध्या फरार झाल्याचे समजते.

रोहित कांबळे आणि प्रदीप काकडे या दोन व्यक्तिंकडून अंबरनाथ मधील पाटा वरवंटा हे ढाबा मागील काही महिन्यांपासुन सुरु होते. त्याढाब्यावर परिसरातील अनेक आदिवासी विभागातील नागरिकांनी काम केले परंतु त्यांना पगार मात्र ढाबा चालकांनी दिला नाही. त्यातीलच एका कामगाराने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सर्व पुराव्यासह महाराष्ट्र विकास मिडियाच्या प्रतिनिधीजवळ आपली व्यथा मांडत कशाप्रकारे पाटा वरवंटा कडून कामगारांची फसवणुक झाली आहे हे सांगितले.

70 वर्षीय आजिंपासुन ते अनेक तरुण कामगारांचे मागील अनेक महिन्यांचा पगार या ढाबा चालकाने दिलेले नाही. विशेष म्हणजे नुकताच 19 ऑगस्ट रोजी पगार देणार असे आश्वासन कामगारांंना देऊन थेट दोन्ही ढाबा चालक फरार झाल्याचे समजते. विशेष म्हणजे याबाबत जेव्हा पिडीतांनी रितसर तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यापासुन ते वरिष्ठ पोलिसांना केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी अद्याप योग्य ती कारवाई न केल्याने कामगारांना न्याय देणार तरी कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी एका पक्षाच्या अंबरनाथ पदाधिकार्यांनी देखील पिडीतेची तक्रार ऐकल्यानंतर ढाबा चालकाला संपर्क केले व याविषयी पोस्ट देखील सोशल मिडियावर टाकण्यात आली परंतु नंतर अचानक पोस्ट ही गायब आणि पदाधिकार्यांचा विषय ही गायब त्यामुळे कामगारांची पिळणुक करणार्या या पाटा वरवंटा मागे आहे तरी कोण असा प्रश्न देखील आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

आधिच अंबरनाथ व इतर शहरात रात्रंदिवस अनैतिक धंदे करण्यावरुन अनेक ढाबा पार बदनाम झाले आहेत परंतु पोलिस मात्र कारवाई करत नाही. त्यात आता ढाब्यावरील कामगारांंची देखील फसवणुक होत असल्याने स्थानिक पोलिस कारवाईसाठी कोणता मुहुर्त पाहत आहे असा प्रश्न आता नागरिकांसमोर पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...