शिवसेना नेते सुभाष पवार यांची मुरबाड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी जोरदार तैयारी सुरु

Date:

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- मुरबाड विधानसभेचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे सुपुत्र व शिवसेना नेते सुभाष पवार यंदा मुरबाड विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी जोरदार तैयारी सुरु केल्याचे समजते. खापरी ग्रामपंचायतीतील भाजपच्या शेकडो सदस्य आणि पदाधिकार्यांना शिवसेनेत प्रवेश देत पवार यांनी आपल्या विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे अशी चर्चा आहे.

सुभाष पवार जे मुरबाड शहरात तसेच विधानसभा क्षेत्रातील विविध ग्रामिण भागात अत्यंत लोकप्रिय नेते म्हणुन ओळखले जातात त्यांनी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आमदार म्हणुन सरकारकडे नेतृत्व करण्यासाठी तैय्यारी दाखवली आहे. विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासुन त्यांच्या सातत्याने होणार्या समाजकार्यामुळे ग्रामिण आणि शहरी भागातील हजारो कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसुन येते.

सध्या भारत देशात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता शेअर मार्केटच्या मंदीप्रमाणे घसरण पाहायला मिळत असतांना त्याचसह मोदी लाट ही नसल्यामुळे मुरबाड विधानसभा क्षेत्रात यावेळी सत्तापालट होणार याचे संकेत आधिपासुनच दिसत होते त्यातच पवार यांचा सुरु असलेला जनसम्पर्क पाहता यंदा मुरबाड, बदलापुर सह अनेक ग्रामिण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काचा माणुस आमदार म्हणुन मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

मुरबाड विधानसभा मतदार संघाचे वर्तमान आमदार किसन कथोरे यांच्यावर मागील अनेक वर्षांपासुन विविध मुद्द्यांवर स्थानिक पातळीवर जोरदार टिका होतांना दिसुन आली, त्यातच बदलापुर शहरात नुकताच झालेल्या आक्रमण आंदोलनात आमदारांची चुप्पीमुळे स्थानिक बदलापुरकरांनीही दबक्या आवाजात कथोरे विषयी नाराजी व्यक्त केली होती. देशात आणि राज्यात ज्याप्रकारे नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाबद्दल नागरिक अतिशय संतापलेले असल्याने बदलापुर शहरासह संपुर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्रात आता मतदारांना सत्तापालट करण्याची इच्छा आहे हे चित्र स्पष्टपणे दिसुन येते.

सुभाष पवार यांचे कार्यकर्ते मुरबाड ते थेट बदलापुरात प्रचारकार्यात सक्रीय असुन नुकताच गणेशोत्सवानिमित्ताने शुभेच्छा फलक बदलापुरपर्यंत झळकले आहेत. नागरिकांकडून देखील त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...