ढाबा चालकांकडून अनेक नियमांची पायमल्ली पण स्थानिक पोलिस मात्र मुकबधिर
अंबरनाथ (महाराष्ट्र विकास मिडिया)- मागील काही वर्षांपासुन ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कायद्याची कोणतीही भिती न बाळगता अनैतिक धंद्यांत सुळसुळात असल्याची शहरात चर्चा आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चुकीच्या ठिकाणी आणि अनैैतिक धंद्यांमध्ये अंबरनाथ शहरातील दोन्ही पोलिस ठाण्याचे लिंक दिसुन येत असल्याने अंबरनाथ मध्ये अनैतिक धंदा करणार्या ढाबा चालकांवर पोलिसांचा वरदहस्त आहे कि काय असा प्रश्न आता सामान्य अंबरनाथकर विचारत आहेत.
अंबरनाथ ग्रामिण व शहरी भागात मैत्री कट्टा, रावचा बावचा ढाबा, रॉयल किंग, पाटा वरवंटा, फ्रेंडशिप ढाबा, जय मल्हार ढाबा, भोज किंग ढाबा अश्या अनेक ढाबा चालतात. त्या ढाब्यावर अनधिकृत्तपणे मद्यपान करणे तसेच काही ढाब्यांवर थेट मद्यपान विक्री होत असल्याचे सुत्रांकडून समजते. विशेष म्हणजे रात्री नियमाप्रमाणे ठरलेल्या वेळी ढाबा बंद करण्याऐवजी रात्री अपरात्री पर्यंत ढाबे चालतात. या सगळ्यांमुळे रहदारीला त्रास तर होतोच परंतु त्याचसह गुन्हेगारी वाढण्यास ही मदत मिळते.
ढाबा चालवणार्या ढाबा चालकांनी जर नियमाप्रमाणे फक्त खाद्य पदार्थाची विक्री केली तर त्यात हरकत नाही परंतु ग्राहकांना आकर्षण म्हणुन काही कलाकार ढाबेवाला जेव्हा त्याठिकाणी अधिक सर्विसच्या नावाखाली दारुविक्री करतात, जुगार खेळण्यासाठी सुविधा करतात, हुक्का पार्लर सुरु करतात त्याचा खरंतर सामान्य नागरिकांना संताप आहे व विरोध ही आहे. विशेष म्हणजे हे सर्व अनधिकृत्त धंदे सुरु असतांना अंबरनाथ शहरातील दोन्ही पोलिस ठाण्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने विविध प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ शहर पोलिस ठाण्यातील एक ड्रायव्हर पोलिसवाला आणि दुसरा अधिकारी असे दोन्ही दर महिन्याला प्रत्येक ढाबा चालकाकडून 10-15 हजार पासुन ते 50 हजार पर्यंत हफ्ते वसुली करतात. हा हप्ता स्थानिक पोलिसांना मैनेज करण्यापुर्तीच मर्यादीत न राहता अंबरनाथ सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 आणि ठाणे आयुक्त कार्यालयात ही दलालांमार्फत जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अश्या ढाबा चालकांवर पोलिसांमार्फत कारवाई होत नाही कि काय अशी शंका आता अंबरनाथकरांना व्हायला लागल्याचे समजते.
विशेष म्हणजे एका गोपनिय सुत्राने थेट व्हिडीओ शुट करुन महाराष्ट्र विकास कार्यालयात क्लिप पाठविले असुन ते देखील आम्ही पोस्ट करत आहोत ज्यामध्ये दिसुन येते कशाप्रकारे रात्री अपरात्री ढाबा चालतात आणि पोलिस प्रशासन हप्ता घेण्यासाठी पोलिसांचीच गाडी घेऊन तेथे उपस्थित असतात. त्यामुळे हा हप्ता कल्चर महाराष्ट्रातुन कधी संपणार असा सवाल आता जागृक नागरिक विचारत आहेत..
एका ढाबा चालकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, आम्ही काही ढाबा चालक हे प्रामाणिकपणे काम करतो आणि फक्त खाद्यपदार्थ विकतो तरी देखील पोलिस आमच्याकडून सुद्धा हप्ता मागते. जर हप्ता दिले नाही तर विनाकारण पोलिसांकडून कारवाईची धमकी दिली जाते. शेवटी ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणुन आम्ही हप्ते देतो परंतु आता टाईट सेक्शनच्या नावाखाली डिमांड अजुनच वाढल्याने आम्ही देखील हताश आहोत. मद्यविक्री करणारे ढाबे आणि नियमांचे पालन करणारे ढाबे प्रत्येकावर हप्ता कल्चर लागु आहे.
अजुन एका ढाबा चालकाने महाराष्ट्र विकास जवळ सांगितले कि, हप्ता कल्चर फक्त पोलिसांपुर्ती मर्यादीत नसुन पत्रकार, स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते सगळेच एक एक तक्रार अर्ज टाकुन आप आपल्या नावाचा महिना हप्ता बांधुन घेतात.
त्यामुळे आता अंबरनाथ येथील लोकशाहीचा चौथा स्तंभ देखील ढाब्याच्या हप्त्यावर उभा आहे कि काय अशी देखील शहरात चर्चा आहे.
मुळात ढाबा चालकांनी प्रामाणिकपणे काम करत जर नियमांचे पालन केले तर पोलिस व इतर समाजकंटकांकडून कोणीही त्रास देणार नाही परंतु सुरुवातीपासुनच सगळ्या गोष्टी जेव्हा भ्रष्टाचाराच्या बेसवर व्यवसाय उभा राहणार असेल तर पुढे जाऊन हे भ्रष्टाचार आणि लाचखोरी थांबणारच नाही. त्यातच पुढे जाऊन हेच लाचखोरी मोठ्या गुन्हेगारीचे स्वरुप घेत असल्याने तातडीने पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. ज्या ढाबा चालकांना रात्री अपरात्री आपला व्यवसाय सुरु ठेवायचा आहे त्यांनी अश्या प्रकारे लाचखोरांना लाच देण्याऐवजी नियमाप्रमाणे शासनाला महसुल भरुन कोर्टातुन परवाना मिळवुन स्वाभिमानाने नियमाप्रमाणे धंदा करावा त्यामुळे कोणी त्रास ही देणार नाही आणि लाचखोरी ही होणार नाही.
विशेष म्हणजे ढाबा चालकांकडून ज्याप्रकारे मद्यविक्री होते त्यामुळे शासनाचा मदसुल देखील बुडतो आणि याच ढाब्यांवर मद्यपान करुन मग एखाद्या बड्या पक्षाचा नेता मग नशेत ऑडीची धडक देतो आणि मोठी दुर्घटना घडते. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुळालाच जोवर संपविले जात नाही तोवर चांगला समाज घडणार नाही असेही अंबरनाथच्या एका लेखकाने आपले मत व्यक्त केले.