पोलिसांकडून दुकानदारावर गुन्हा दाखल तसेच 165 प्रमाणे दिली नोटीस
माणगाव (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच माणगाव येथील जोशी वडेवाले एका वादात सापडले आहे. एका गरोदर महिला ग्राहकाने जेव्हा वड्यातत मिठ जास्त असल्याबाबत विचारणा केली असता ग्राहकांशी उद्धट बोलुन दुकानाच्या कर्मचार्यांकडून थेट मारहाणीची घटना घडली. सदर विषय सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर माणगाव परिसरात या दुकानदाराबाबत संताप व्यक्त करण्यात आला. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने थेट जोशी वडेवालेचा दुकानच बंद करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.
परप्रांंतीय जैस्वाल या व्यक्तिकडून महाराष्ट्रातील माणगाव येथे जोशी वडेवाले नावाचे दुकान आहे. या दुकानात यापुर्वीत देखील ग्राहकांशी अतिशय उद्धटपणे बोलत असल्याबाबत अनेकांनी म्हटले होते आणि काल शेवटी एका गरोदर महिला आणि इतर ग्राहकांना दुकानदारांनी दादागिरी करत कामगारांनी मारहाण करण्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे कामगार सेना ने पुढाकार घेत ग्राहकांची बाजु घेत जोशीवडेवाले आजपासुन बंद अशी हाक देत दुकानच बंद करायला लावले अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्ते यांनी आपल्या सोशल मिडियावर पोस्ट टाकुन माहिती दिली.
ग्राहकांना मारहाणीच्या घटनेनंतर माणगाव पोलिसांनी सुद्धा तातडीने कारवाई करत दुकानाचे संचालक शुभम जैस्वाल व हॉटेल मधील कामगार विरोधात गुन्हा रजि क्र. 205/2024 भादवि कलम 118(1), 115 (2), 189(1), 189 (2), 189 (4), 190, 125, 352, 351 (2), 354 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच भविष्यात पुन्हा हॉटेलच्या चालकांकडून अशी घटना होऊ नये म्हणुन कलम 168 प्रमाणे नोटीस सुद्धा दिली आहे. त्यामुळे जर भविष्यात पुन्हा दुकानदाराकडून दादागिरी किंवा चुकीच्या कृतीमुळे, वर्तनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दुकानदाराची समस्येत वाढ होणार यात वाद नाही. ही नोटीस आज दि. 14 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात आली.
एकुणच त्या दिवशी जे काही झाले यात दुकान चालकाने संयम्माने प्रकरण हाताळणे अपेक्षित होते परंतु तसे न होता हॉटेलचे कामगारच जर ग्राहकाला मारहाण करत असल्याचे दिसल्याने अश्या प्रकारचे कृत्य व्हायला नको असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. तसेच दुकानदाराला आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत नोटीस दिल्याने आता पुन्हा राजकिय पक्षाकडून दुकान बंद करुन एखाद्या व्यवसायिकाला आर्थिक अडचण निर्माण करणेही योग्य नाही असे माणगाव येथील सुज्ञ नागरिकांचे मत आहे. एकुणच ग्राहकांप्रमाणे दुकान चालवणार्या मानवाधिकार हक्काचाही विचार करणे गरजेचे आहे. ग्राहकाला मारहाण करणार्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु त्याचवेळी दुकानदारावर अजुन दबावतंत्र करुन काय साध्य होईल असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे जेव्हा घटना घडली व ग्राहकाला दुकानाच्या कर्मचार्याकडून मारहाण होत होते प्रत्यक्षदर्शींमधुन एकानेही पुढाकार घेतला नाही भांडण थांबवण्यासाठी त्यामुळे त्या प्रत्यक्षदर्शींचाही सामान्य नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.



