कारवाई फक्त हप्ता कल्चर वाढवण्यासाठी असल्याचा जनतेचा आरोप
नवी मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- जुलै महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व उपायुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांच्या निदर्शनाखाली नेरुळ, वाशी, कोपर खैरणे, घणसोली, ऐरोली वार्डातील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्यातील अनेक हॉटेलवाले अतिक्रमण करत अनधिकृत्त बांधकामाला सुरुवात करत असल्याने प्रशासनातर्फे कारवाई फक्त हप्ता कल्चर वाढवण्यासाठी होत असल्याचा जनतेकडून आरोप होत आहे.
जुलै महिन्यात सदर कारवाई करण्यात आली त्यावेळी एक घटना घडली होती. एका आलिशान वाहनाने धडक देत दोन लोकांचे मृत्यु झाल्याची घडला त्यावेळी घटली. वाहन चालक हा दारुच्या नशेत असल्याचे त्यावेळी समजते. त्यामुळे तडकाफडकी नवी मुंबई महापालिकेकडून अनेक हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लेडिस बार, पब, लॉज आणि हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्याल आली होती.
अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांनी पत्रकारांशी त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत एकुण 23 अतिक्रमणांवर बेलापुर येथे, नेरुळ येथील 6, वाशी येथील 3 व कोपर खैरणे, घनसोली ऐरोली येथील अनधिकृत्त बांधकाम व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती.
आता पुन्हा एकदा त्याचठिकाणी अतिक्रमण जैसे थे अवस्था होत असल्याने पालिका प्रशासन नेमकं कारवाई कोणत्या कारणासाठी करते हा प्रश्न आता नवी मुंबई शहरातील रहिवाश्यांना पडला आहे.
विशेष म्हणजे या सगळ्या कारवाई मागे हप्ता कल्चर चालत असल्याची देखील शहरात जोरदार चर्चा आहे. या हप्ता कल्चर मध्ये पालिका प्रशासनापासून ते पोलिस प्रशासन, महसुल प्रशासनातील अनेक लाचखोर महिन्याचा हप्ता बांधुन घेतात अशी देखील गोपनिय माहिती सुत्रांकडून मिळत असुन नवी मुंबई महापालिकेत ही हप्ता कल्चर बाबत आता चर्चा होत आहे.