आंबेडकरी समाजाबद्दल स्टैंडर्ड काढणार्या कुंदा शेटे या फ्लैट घेणार्यां महिलेचं संभाषण व्हायरल

Date:

बदलापुरची घटना ; आंबेडकरी जनतेत संतापाची लाट

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली सामान्य जनतेपासुन ते सगळ्या समाजातील नागरिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने कायद्यात तरतुद दिली, महिलां अनेक हक्क व कायद्याची तरतुद घटनेत दिली त्याच आंबेडकरी समाजाबद्दल स्टैंडर्ड काढण्याचा प्रकार नुकताच बदलापुरात घडले आहे. रिअल इस्टेटचे व्यवसाय करणारे अक्षय सोनोवणे यांना कुंदा शेटे या महिलेने फ्लैट खरेदीच्या उद्देशाने फोन करत आंबेडकरी समाजाबद्दल चुकीचे मत व्यक्त केले. सदर ऑडीओ क्लिक सोनावणे यांनी सोशल मिडियावर पोस्ट केल्यानंतर जोरदार खळबळ उडाली आहे. 

ओडीयो क्लिप प्रमाणे एक महिला बदलापुर गणेश नगर येथील फ्लैट खरेदीसाठी इच्छुक असल्याचे सांगत स्वतःचे नाव कुंदा शेटे असे म्हणुन त्या वाणी समाजाचे असल्याते ते म्हणतात. फ्लैट बद्दल अधिक विचारणा करतांना त्या इमारतीत आंबेडकरी समाजाची लोक राहतात का अशी विचारणा करत थेट स्टैंडर्ड काढण्याचा प्रकार सदर महिलेने केला. विशेष म्हणजे रिअल इस्टेट व्यवसायिक सोनोवणे हे स्वतः आंबेडकरी समाजाचे असतांना सुद्धा त्यांनी अश्या वृ्त्तीच्या लोकांना फ्लैट द्यायचेच नाही म्हणुन शेटे यांना जाब विचारणा करत आंबेडकरी समाजाबद्दल चुकीचे शब्द बोलु नका असे सांगितले.

12 मिनिटांच्या या ओडीयो क्लिप मुळे पुन्हा एकदा लक्षात आले कशाप्रकारे बदलापुरात व त्याचप्रमाणे भारत देशात इमारतीत फ्लैट घेतांना सुद्धा जात पात चा विचार केला जातो आणि एखाद्या विशेष समाजाला चुकीचे बोलले जाते. जागतिक दृष्टी अश्या कृत्याला रेसिसम म्हटलं जातं त्यामुळे कुंदा शेटे या महिनेच्या अश्या वागणुकीमुळे आता आंबेडकरी समाज संंताप व्यक्त करत आहेत.

याच सोबत रिअल इस्टेट एजेंस सोनोवणे यांनी ज्याप्रकारे निर्भिडपणे आर्थिक फायदा न बघता चुकीचे कृत्य करणार्या त्या महिलेला फ्लैट द्यायची इच्छाच नाही असे सांगत तिला जाब विचारणा केली त्यामुळे या तरुणाचे देखील शहरात कौतुक होत आहे. सोनावणे सारख्या तरुणांची सध्या बदलापुर व भारतात गरज आहे जे चुक ला चुक आणि बरोबर ला बरोबर निर्भिडपणे म्हणतात.

संपुर्ण क्लिप ऐकण्यासाठी क्लिक करा…

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...