बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर शहरात ज्याप्रकारे मागील काही वर्षांपासुन काही ठराविक राजकिय नेत्यांकडून गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराची मालिका सुरु आहे त्यामुळे शहरातील नागरिक पार कंटाळल्याचे दिसुन आले. त्यातच स्थानिक प्रशासन देखील जनतेला न्याय मिळण्यासाठी कार्यरत नसल्यामुळे जनआक्रोश असे आंदोलन पाहायला मिळाले ज्याची चर्चा फक्त बदलापुरातच नसुन राज्य व देशभरात होऊ लागली. त्यामुळे आता या भ्रष्ट राजकारणाची साफसफाई साठी सामान्य घरातील तरुणांनी जनतेचे नेतृत्व करण्याची गरज आहे असे मत युवक कांग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष वैभव सदाफुले यांनी व्यक्त केले आहे.
वैभव सदाफुले हे बदलापुर शहराचे रहिवाशी व कांग्रेस पक्षाचे बदलापुर शहराध्यक्ष म्हणुन समाजकारण करत असुन मागील काही वर्षांपासुन त्यांनी शहरातील नागरिकांना जनजागृती करण्यासाठी सोशल मिडियाद्वारे विविध मुद्द्यांवर आवाहन केले. जाती, धर्माच्या राजकारणाने शहराचा विकास होणार नसुन प्रामाणिक लोकप्रतिनिधीमुळेच शहर सुधारेल आणि शहराची जनता सुरक्षित राहणार. लोकप्रतिनिधी फक्त पाणी प्रश्नापुर्ती मर्यादीत न राहता, शहरातील व प्रभागातील दैयनिय रस्त्याची समस्या, कचर्याची समस्या, त्याचसह विविध विकासकाम, तरुणांना रोजगार, ज्येष्ठांना आधार व प्रत्येक नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षा ह्या अश्या अनेक मुद्दे आज लोकप्रतिनिधी आणि आमदारांकडून अपेक्षित आहेत. त्यामुळे बदलापुर शहराची सामान्य जनतेला होणारा त्रास सामान्य घरातील मंडळीच समजु शकतात त्यामुळे घराणेशाहीला पाठिंबा न देता यंदा बदलापुर शहरातील मतदार काम करणार्या लोकप्रतिनिधीला मतदान करणार असेही सदाफुले यांनी प्रतिक्रिया दिली.
बदलापुर शहरातील राजकारणात ज्याप्रकारे घराणेशाही सुरु आहे व मोजक्याच दलालरुपी ठराविक कार्यकर्त्यांना आजवर मतदारांनी मतदान केल्यामुळे अनेक प्रभागात भ्रष्टाचार दिसुन आले व शहराचे नाव सुद्धा खराब झाले. त्यामुळे आता घराणेशाहि विरोद्ध लोकशाही होणार असुन स्थानिक व नुकताच बदलापुरात स्थलांतरीत झालेल्या सर्वांमधुन सामान्य घरातील तरुणांनी राजकारणात सहभागी झाले पाहिजे असेही मत सदाफुले यांनी व्यक्त केली.
वैभव सदाफुले हे सोशल मिडिया व ग्राऊंड लेवेलवर आपल्या प्रभागातील तसेच शहरातील नागरिकांची समस्या जाणुन घेत ती युवक कांग्रेस पक्षाच्या माध्यमातून कशी सोडवता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसुन येते. कांग्रेस पक्षाच्या वरिष्ठांना आपल्या शहराची समस्येबाबत जाणिव करुन देत राज्य आणि केंद्रात जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी ते काम करत आहेत. विशेष म्हणजे प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर अनेक तरुणांनी सुद्धा सहकार्य व पाठिंबा देत असल्याचे दिसुन येते.



