सोशल मिडियावर खासदारांचे पत्र व्हायरल ; गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट
मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया) – नुकतेच एक पत्र सोशल मिडियावर वायरल झाले आहे. हे पत्र लोकसभा सांसद श्रीरंग अप्पा बारणे यांच्या लेटरहेडवर आहे. पत्रात त्यांनी मुंबईतील कळा चौकी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निर्देश दिला आहे की, श्री. आदित्य बारणे आणि इतर ९ व्यक्ती यांना १० सप्टेंबर २०२४ रोजी लालबागचा राजा गणपती दर्शनासाठी येणार आहेत, म्हणून त्यांना प्राधान्य व मार्गदर्शन द्यावे.
हे पत्र सोशल मिडियावर वायरल झाल्यानंतर, विशेषतः गणेश भक्तांनी आक्रोश व्यक्त केला आहे. अनेकांंनी राजकारण्यांवर टिका करत, गणपती दर्शनासाठी देखील आता राजकारणी आणि लोकसभा सदस्यांच्या शिफारशीची आवश्यकता आहे, हे लज्जास्पद आहे असे मत व्यक्त केले आहे.
या घटनेने पुन्हा एकदा दाखवले आहे की भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात राजकारण सर्व गोष्टीत गुंतले आहे आणि आता पारंपारिक गणेश पूजन देखील यापासून सुटका नाही हे दिसुन आले.
सामान्य नागरिक जेथे 12 – 12 तास रांगेत उभा राहुन बाप्पांचा दर्शन घेतो तेथे अश्या सांसदेच्या शिफारशीचे पत्र घेऊन अनेकजण बाप्पांचा व्हीआयपी दर्शन घेत असल्याने महाराष्ट्रात आणि भारतात हे कशा प्रकारची भक्ति अजुन किती काळ सुरु राहणार असा प्रश्न आता जागृक जनता विचारत आहेत.
लालबागचा राजा सार्वजनिक मित्र मंडळ तर्फे दर वर्षी लालबाग येथे बाप्पांची स्थापना केली जाते, करोडो लोग या गणेश उत्सवाच्या काळात तासंतास रांगेत उभे राहुन बाप्पांचा दर्शन घेतात. यंदा मंडलाचा हा 91 वा वर्ष असल्याचे समजते.