मुरबाड – बदलापुरची जनता गुन्हेगारांना आमदार करणार?
मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत विविध नेते निवडणुकीच्या तिकीटाच्या रेस मध्ये घमासान युद्ध सारखे चित्र दिसत असतांनाच आता विनयभंगाचा आरोपी देखील मुरबाड विधानसभा क्षेत्रातुन शिवसेना शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे आमदार होण्याची इच्छा पुन्हा एकदा दाखवत आहे. विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही पक्षातील उमेदवार मुरबाड विधानसभेवर आपला हक्क दाखवुन वरिष्ठांकडून तिकीट मागत असल्याने महाराष्ट्रात इतर ठिकाणी ज्याप्रकारे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात अंतगर्त वाद दिसुन आले तेच मुरबाड विधानसभा क्षेत्रात ही दिसुन येते.
139 मुरबाड विधानसभा क्षेत्रात वर्तमान आमदार किसन कथोरे व ज्येष्ठ नेते सुभाष पवार असा सामना यावेळी दिसणार आहे. त्यात विनयभंगाचा आरोपी असलेले शिंदे गटातील वामन म्हात्रे याने सुद्धा निवडणुकीत उभे राहण्याासठी तिकीट मागत असल्याने म्हात्रे आमदार होण्यासाठी तिकीट मागत आहे कि मत फोडण्यासाठी म्हणुन उभा राहणार अशी देखील चर्चा होत आहे. आधिच बदलापुर शहरात ज्याप्रकारे दहशतवादी वातावरण व गुंडशाही वामन बारकु म्हात्रे व त्याच्या कार्यकर्त्यांकडून माजवण्यात आली त्यामुळे म्हात्रे मागील अनेक वर्षांपासुन बदलापूर शहरात बदनाम आहे. नुकताच मागास्वर्गीय महिला पत्रकाराला अश्लिल भाष्य केल्याप्रकरणी त्याच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल झाले असुन नुकताच उच्च न्यायलयाने त्याचा अटकपुर्व जामिन मंजुर केले होते. म्हात्रे विरोधात यापुर्वी देखील अपहरण व इतर गंभिर स्वरुपाचे गुन्हे केल्याचा आरोप आणि पोलिसात तक्रार दाखल आहे. त्यामुळे अश्या गुन्हेगारी पाश्वभुमीचा नेता नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद भुषवुन आता आमदार ही होणार तर मुरबाड विधानसभा क्षेत्रात गुंडशाही कोणत्या थराला जाणार याबाबत न बोललेलच बरं असे मत सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच बदलापुरातील महिला ज्याप्रकारे म्हात्रेच्या वर्तवणुकीमुळे अत्यंत संतापलेली आहे त्यात म्हात्रेला आमदार होण्यासाठी मत देणार तरी कोण अशीही शहरात चर्चा आहे.
यापुर्वी गावगुंड म्हात्रे याने शिवसेना तर्फे आमदारकीच्या निवडणुकीत उभा राहण्यासाठी तिकीटाचा दावा केला होता परंतु त्यावेळी ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे यांनी म्हात्रेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संधीसाधु म्हात्रेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिन चिन्ह घेत निवडणुक लढवली परंतु यश मात्र त्यांना मिळाले नाही व त्यांचा पराभुत झाला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकप्रियता मुरबाड विधानसभेत असल्याने ठाकरेंच्या लोकप्रियतेमुळे म्हात्रेंना हजारो मत मिळाली होती. परंतु सध्या परिस्थिती खुप वेगळी आहे. वामन म्हात्रे हे शिंदे गटातील शिवसेनेचे नेतृत्व करतात आणि अनेक गंभिर स्वरुपाच्या गुन्ह्यात ते प्रथम आरोपी असल्याने शहरातील नागरिक आपल्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन म्हात्रेंना आमदार होण्यासाठी मतदान करणार याची खात्री देता येणार नाही. त्यामुळे म्हात्रे तिकीटाचा दावा नेमकं कोणत्या कारणाने करत आहे असा सवाल आता सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
नुकताच कुळगांव बदलापुर शहरात एका ठेकेदाराकडून सफाई कामगारांची पिळवणुक करण्याचा किस्सा देखील उघडकीस आल्याने सदर ठेकेदाराचा शेठ हा वामन म्हात्रे असल्याची देखील शहरात जोरदार चर्चा असुन पालिका प्रशासनातच जर मोठमोठे भ्रष्टाचार होत असेल तर म्हात्रे विधानसभेत गेल्यात तिचे काय दिवे लावतील यावरच ही जोरदार चर्चा सुरु आहे.



