आर. के. मध्यानी कंत्राटदारावर एमआयडीसी मेहेरबान 54 कोटींचे जलशुद्धीकरण केंद्राच्या विकासाचे काम

Date:

अंबरनाथ (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्यात फक्त पालिका प्रशासनच नव्हे तर एमआयडीसी विभागात ही अनागोंदी कारभार चालतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे एमआयडीसी कडून 54 कोटी रुपयांचे टेंडर एका वादग्रस्त कंत्राटदाराला देण्यात आले होते. विशेष म्हणजे सध्या शिंदे गटातील समाजसेवक व कार्यकर्ते आता याविरोधात आवाज उठवत असुन वादग्रस्त कंत्राटदाराला कोणत्या कारणाने काम देण्यात आले याबाबत अंबरनाथ एमआयडीसीला विचारता केली जात आहे. 

अंबरनाथ येथील शिंदे गटाचा समाजसेवक रोहित चलवादी या तरुणाने मागील काही वर्षांपासुन एका विषयावर पाठपुरावा करत कशाप्रकारे एका वादग्रस्त ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांचे काम दिले जाते हे जनतेसमोर उघड केले आहे. अंबरनाथ येथील एमआयडीसीच्या अखत्यारीत येणार्या जलशुद्धीकरणाचे विकास कामाचे तब्बल 54 कोटींचे वर्क ऑर्डर देण्यात आले होते. त्याच जलशुद्धीकरणाच्या ठिकाणी नुकताच 3 कामगारांचा शॉक सर्टिटमुळे जीव मगवण्याची वेळ त्यांच्यावर आली परंतु पोलिसांनी मात्र दोषी कंत्राटदारावर योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप समाजसेवक चलवादी यांनी केला आहे. 

आर.के. मध्यानी या कंत्राटदाराने यापुर्वी बृहन्मुंबई महापालिकेकडून रस्ता बनविण्याचा ठेका सुद्धा घेतला होता ज्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा कंत्राटदारावर आरोप करण्यात आले त्यामुळे कंत्राटदाराला ब्लैकलिस्ट करण्याच्या ही प्रक्रिया होत होते. अश्यात नुकताच अंबरनाथच्या जलशुद्धीकरणाच्या कोट्यावधी रुपयांचा काम पुन्हा त्याच ठेकेदाराला कोणत्या बेसेस वर देण्यात आले असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.

याबाबत समाजसेवक रोहित चलवादी या तरुणाने आपल्या सोशल मिडियाद्वारे एमआयडीसी प्रशासनाला उद्देशुन विचारणा केली तसेच कार्यकारी अभियंता अंबरनाथ यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केल्याचे समजते.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...