फिर्यादीच्या जबाबाने काय गुंड राजकारण्यांची इमेज सुधारणार?

Date:

आधि गुंडगिरी नंतर सारवासारव – शिंदे गटातील लोकप्रतिनिधींची किमयाच न्यारी

कर्जत (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील एकाने सोशल मिडियावर व्हिडीओ पोस्ट केले ज्यामध्ये एक गावगुंड नेरळ येथे भर रस्त्यावर एका निष्पापाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत असतांना दिसुन आले. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी याचे नाव शिवा असल्याचे समजते व सदर आरोपी हा कर्जत विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड आणि जवळचा कार्यकर्ता असल्याचे हजारोंनी सोशल मिडियावर मत व्यक्त केले. त्यानंतर शिंदे गटातील आमदाराकडून होणार्या गुंडगिरीबाबत मिडियाने बातमी प्रकाशित केल्यानंतर तातडीने आमदार महेंद्र थोरवे यांनी मी तो नव्हे म्हणत दोन्ही आपलीच माणसं हे देखील त्याच व्हिडीओ ते म्हणताना दिसले.

विशेष म्हणजे आरोप करणार्या गुंडाविरोधात नेरळ पोलिस ठाणे 3 दिवस तक्रार सुद्धा दाखल करुन घेत नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा पोलिसांवर दबावसत्र सुरु झाले तेव्हा मात्र आपली पोलिसी अब्रु वाचवण्यासाठी पोलिसांनी आरोपीला अटक केले आणि पोलिस लॉकअप मध्ये शिवाला बेदम मारहाण सुद्धा केली. आरोपी हा चुकीचा आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे परंतु त्याला शिक्षा देण्याचं पोलिसांना कोणता अधिकार आहे? शिक्षा न्यायपालिका देणार कि चमड्याच्या बेल्टने मारहाण करणारे नेरळ पोलिस ठाणे देणार ? पोलिसच गुंडांसारखे वागणार तर आरोपी सुधरणार कसं? असे अनेक प्रश्न कर्जत तालुक्यात सुज्ञ नागरिक विचारत आहेत.

नेरळ शहरात भरदिवसा ज्याप्रकारे आरोपी कडून एखाद्याला मारहाण होते व दहशत पसरवण्याचे काम होते ते काही अचानक घडल्याची घटना नाही, तर सत्ताधार्यांच्या कार्यकर्त्यांकडून अश्या प्रकारे अनेकदा कर्जत, नेरळ शहरात व ग्रामिण भागात मारहाण, जिवघेणा हल्लाच्या घटना घडतच असतात, ही घटना सोशल मिडियावर आल्याने सर्वत्र उघड्यावर आल्यानंतर आता शिंदे गटातील आमदार व त्यांचे कार्यकर्ते घटनेची सारवासरव करतांना दिसुन आले.

विशेष म्हणजे नुकताच ज्या व्यक्तिला मारहाण झाली आता त्याला देखील जबाब देण्यास भाग पाडले. पिडीत आपल्या जबाबात आमदार थोरवे यांचा यामध्ये काही संबंध नाही असे म्हणत असुन व्हिडीओ मध्ये आपला जबाब देणार्या पिडीतेला पाहिल्यावर एखाद्याच्या भितीमुळे सदर व्यक्ति जे काही समोरच्याने लिहिले आहे ते वाचुन जबाब देत आहे हे स्पष्टपणे दिसत असुन ह्यामुळे आता साक्षिदार आणि फिर्यादीला महाराष्ट्र राज्यात कशाप्रकारे राजकिय नेते आणि गुंड हाताळतात हे पुन्हा एकदा दिसुन आले.

फिर्यादीचा जबाबाचा व्हिडीओ पाहिल्यावर सामान्य नागरिक आता दबक्या आवाजात ‘वाटेवर गेलेली मान आता परत मिळवता येणार नाही’ असा राजकारण्यांना टोला लगावत असल्याने शिंदे गटातील लोकप्रतिनिधींनी आता तरी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

यापुर्वी देखील साक्षीदाराचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्याची घटना याच महाराष्ट्रातील अंबरनाथ शहरात शिंदे गटातील एका कार्यकर्त्याकडून घडली होती. मुळात स्थानिक पोलिस प्रशासनच प्रामाणिकपणे काम करत नसल्याने शेवटी फिर्यादीची देखील आरोपी विरोधात साक्ष देण्याची हिम्मत होत नसल्याने महाराष्ट्रात कशा प्रकारच्या दहशतीचे वातावरण सध्या पसरलेले आहे याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...