महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामगारांना न्याय मिळण्यासाठी मुख्याधिकारींची भेट
कु.ब.न.प. च्या घोटाळ्याच्या मालिकेत आता कचरा घोटाळ्याचा समावेश
बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या अनेक समस्यांना वाचा फोडणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा एका ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम केलं आहे. यंदा कुळगांव बदलापुर शहरात साफ सफाई करणार्या कामगारांची होणारी फसवणुक मनसेने जनतेसमोर उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे बदलापुर शहरातील अनेक सफाई कामगारांची मागील 3 वर्षांपासुन आर्थिक फसवणुक होत असुन हे एकप्रकारे कचरा घोटाळा म्हणुन शहरात आता चर्चा सुरु आहे.
बदलापुर शहराच्या साफसफाईचा ठेका मे. पांचाळ कंत्राटदार व अश्या खाजगी कंपन्यांना पालिका प्रशासनाने दिले आहे. ह्या खाजगी कंपन्यांंकडून परिसरातील गोर गरिबांना व गरजवंतांना शहराच्या साफ सफाईची जबाबदारी देण्यात आले व त्या मोबदल्यात पालिकेकडून प्रत्येक कामगारालाअंदाजे 16 हजार 500 रुपये प्रत्येक महिन्याला वेतन नियमाप्रमाणे ठरविण्यात आले परंतु पालिकेकडून 16 हजार 500 रुपये सफाई कामगारांचे वेतन जरी कामगारांच्या बैंक खात्यात जात असले तरी ते पैसे कामगारांऐवजी एक शेठच काढत असल्याने बदलापुर शहरात सफाई कामगारांची पिळवणुक होत असल्याचे दिसुन येते.
मे. पांचाळ या कंत्राटदाराकडून ज्या सफाई कामगारांना नियुक्त करण्यात आले त्या प्रत्येकाकडे स्वतःचे बैंक खाते तर आहे परंतु त्या खात्यांना नियंत्रण मात्र एक शेठ करतो याचा खुलासा खुद्द सफाई कामगारांनीच केला आहे. विशेष म्हणजे बैंक खात्यात पालिकेतून आलेले पैसे पुर्ण रक्कम सफाई कामगाराला न देता फक्त 1000 रुपयांपासुन ते 9000 रुपये दिले जाते व उर्वरीत रक्कम कंत्राटदार स्वतःकडे जमा करुन ठेवतो. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा सफाई कामगार उर्वरीत रक्कमेबाबत प्रश्न विचारले असता त्यांना शेठच्या नावाने धमक्या देत कामावरुन काढुन टाकण्यात येईल अशी धमकी दिली जात असुन बदलापुरात ही कोणत्या प्रकारची मुगलशाही सुरु आहे असा सवाल आता मनसे कडून विचारला जात आहे.
याबाबत जेव्हा मिडियाने पिडीत सफाई कामगारांना विचारणा केली कि नेमका हा शेठ कोण तर सफाई कामगारांनी दबक्या आवाजात मे. पांचाळ कंपनीला चालवणारा बॉसच शेठ आहे पण आम्हाला त्याचं नाव माहित नाही असे ते म्हणाले. दर महिन्याला आम्ही उर्वरीत रक्कम जर मैनेजरकडे जमा केली नाही तर धमक्या मिळतात. शहरात आम्ही मेहनतीने साफसफाईचे काम करतो पण मेहनतीचा मोबदलाच मिळत नसल्याचे अनेक कामगारांनी दुख व्यक्त केले.
कुळगांव बदलापुर नगरपरिषद या प्रशासनाच्या आरोग्य विभागाला स्वच्छतेचा पहिला पुरस्कार शासनातर्फे मिळतो तो पुरस्कार सफाई कामगारांच्या अथक परिश्रमामुळे पण त्याच कामगारांच्या मेहनतीच्या पैश्यावर जेव्हा खाजगी कंत्राटदार व त्याचा शेठ डल्ला मारत असल्याने बदलापुरात भ्रष्टाचार अतिशय खालच्या स्तरावर पोहोचली हे दिसुन येते.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापुर शहराध्यक्षा श्रीमती. संगिता चेंदवणकर, ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उमेश तावडे व इतर मनसे कार्यकर्त्यांनी सफाई कामगारांसह पालिकेच्या मुख्याधिकारी श्री. गोडसे यांची भेट घेत कशाप्रकारे ठेकेदार कामगारांची पिळवणुक करत आहे हे पुराव्यानिशी दाखवुन दिले. मुख्याधिकारी यांनी पुरावे व कामगारांचा जबाब ऐकल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे मुख्याधिकारी यांनी थेट पालिका प्रशासनाचा बैंक स्टेटमेंट दाखवत पालिका दर महिन्याला सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे खात्यात जमा करते मग हे असं कसं काय घडतय याबाबत चिंता व्यक्त केली.
मनसेच्या शहराध्यक्ष संगिता चेंदवणकर व पदाधिकारी उमेश तावडे यांनी माध्यमांशी बोलतांंना प्रतिक्रिया व्यक्त केली कि, बदलापुरात आजकाल दादा, भाई आणि शेठ नावाने अनेकजण जन्माला आलेले आहेत व निवडणुकीला वेळ लागत असल्याने असल्या शेठ आणि भाईंच्या भ्रष्टाचाराचे पैसे त्यांच्या तिजोरीतुन कमी होत असल्याने आता कामगारांची पिळवणुक करुन त्यांच्या पोटावर लाट मारुन त्यांच्या मेहनतीच्या पैश्यांवर डल्ला मारला जात आहे. गरिबांच्या पैश्यांनी हे शेठ विदेशी दौरे आणि मजा मारत आहेत परंतु यांना गरिबांची हाय लागणार यात वादच नाही. तातडीने जर पालिका प्रशासनाने या विषयावर तोडगा काढत कामगारांना न्याय दिले नाही तर मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल. ज्या पालिकेला कामगारांमुळे पुरस्कार मिळतो तेच कामगार आज हक्काच्या पैश्यांसाठी वणवण भटकावे लागत आहे हे लज्जास्पद आहे. मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले असुन कामगारांना जोवर न्याय मिळणार नाही तोवर मनसे शांत बसणार नाही.
एकुणच कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत ज्याप्रकारे रस्त्याच्या कामात घोटाळा, पालिका प्रशासनाच्या इमारतीच्या टेंडर मध्ये घोटाळा, बीएसयुपी कामात घोटाळा, डांबरीकरणापासुन ते कांंक्रीटीकरणात घोटाळा, घंटागाडी योजने घोटाळा या सगळ्यानंतर आता कामगारांच्या पगारांवर डल्ला मारत कचरा घोटाळा ही झाल्याने सुसंस्कृत बदलापुरात अनेक भ्रष्टाचाराचे किस्से पुराव्यासह दिसुन येत आहे.



