आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी एअरहोस्टेसची काढली होती छेड पण पिडीतेला मिळाले नाही न्याय!

Date:

शिंदे गटातील लोकप्रतिनिधींकडून महिलांचा विनयभंग दशकांचा प्रलंबित मुद्दा

अंबरनाथ (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच ज्याप्रकारे बदलापुर शहरातील महिला पत्रकाराचे अपमान केल्याप्रकरणी अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधी वामन बारकु म्हात्रे याची जामिनावर सुटका झाल्यामुळे बदलापुर शहरासह संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला आर्श्चर्याचा धक्का बसला. एका महिलेचा दिवसाढवळ्या पोलिसांसमोर आणि नागरिकांसमोर अपमान होते आणि आरोपी मोकात फिरतो आणि पैश्याच्या जोरावर कोर्टातुन जामिन ही मिळवतो हे सर्व पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला आता न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतांना दिसत आहे.

वामन म्हात्रेच्या कृत्य आणि जामिनावर सुटकेनंतर आता शिंदे गटातील इतर लोकप्रतिनिधींच्या सारस्तानाची चर्चा होत आहे. ज्याप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील म्हात्रेंनी एका महिला पत्रकाराची छेड काढली होती आणि पोलिस प्रशासनाकडून तातडीने कारवाई मात्र झाली नाही तसाच काहीसा प्रकार अनेक वर्षांपुर्वी मुंबई विमानतळ परिसरातही घडले होते. शिंदे गटातील अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार व व्ययवसायाने डॉक्टर असलेले बालाजी किणीकर यांनी विमानातुन प्रवास करतांना त्याच विमानातील एका एअरहोस्टेस ची छेळ काढली होती. किणीकर यांच्या वागणुकीमुळे संतापुन त्या एअरपोस्टेस ने स्थानिक पोलिसात तक्रार नोंदविली. परंतु सत्तेच्या शक्तिमुळे किणीकर यांच्याविरोधात छोटीशी तक्रार पोलिसात दाखल झाली आणि तेच किणीकर पुन्हा दोनदा विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणुन निवडुन ही आले. आज अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात 4 वर्षापासुन ते 60 वर्षांपर्यंतच्या महिलांची छेड काढली जाते व मतदान हताश होऊ हे कधी थांबेल याबाबत चर्चा करतोय. परंतु हेच मतदार मतदान करतांना एखाद्या गुजरातच्या नेत्याची लाट बघत स्थानिक पाथळीवर आमदाराला मतदान करतो. ज्यामुळे मतदान देखील तितकाच जबाबदार आहे असल्या राजकारण्यांना मजबुत करण्यासाठी असे मत आता सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.

याच प्रमाणे नुकताच कर्जत तालुक्यात ही शिंदे गटातील आमदार थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डने दिवसाढवळ्या लोखंडी रॉडने एका रहिवाश्याला मारहाण केले. हे भर रस्त्यावर मारहाण करतांना आरोपीला आजिबात पोलिसांची भिती वाटली नाही, विशेष म्हणजे गुन्हा घडल्याच्या तीन दिवसांपर्यंत पोलिसांना देखील कारवाई करण्याची इच्छा वाटली नाही, त्यामुळे शिंदे गटातील लोकप्रतिनिधींकडुन आणि कार्यकर्त्यांकडून जेव्हा शहरात आणि ग्रामिण भागात दहशत माजविला जातो त्यावेळी पोलिस प्रशासन नपुंसकाची भुमिका निभावते असे ठाम मत आता महाराष्ट्रातील तमाम जनता व्यक्त करत आहेत. 

महिला पत्रकार असो, सामान्य घरातील महिला असो किंवा विमानातील एअरहोस्टेस असो त्यांचा अपमान करणे, अश्लिल चाळे करणे, चुकीची वागणु देणे यामध्ये सध्या महाराष्ट्रातील काही राजकिय नेते हिरहिरीने पुढाकार घेत असुन हाच का आमच्या महाराजांचा महाराष्ट्र राज्य असा सवाल आता शिवरायांच्या मावळ्यांना सुद्धा पडत आहे. शिवाजी महाराज ज्यांच्या राज्यात महिलांना वर डोळे करुन पाहिल्यास कडेलोट केले जात होते त्याच महाराजांच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...