नागपुर शहरातील नागरिकांचा पोलिस प्रशासनाला प्रश्न
नागपुर (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या पराक्रमानंतर नागपुरात ही पोलिस प्रशासन कशाप्रकारे तपासकार्य करते हे जनतेने पाहिले. दारुच्या नशेत ऑडी चालवले जाते, गाडीचा अपघात होतो, नेत्याच्या मुलाला अटक तर सोडाच साधं मेडिकल देखील पोलिसांकडून केली जात नाही, गाडी पोलिस ठाण्याला नेण्याऐवजी गैरेजला आधि नेलं जातं पुराव्याची ऐसी तैसी केली जाते या असल्या सगळ्या घटनांना पाहुन महाराष्ट्र खात्यातील पोलिस प्रशासन आज राजकारणांच्या दबावापुढे किती वागुनगेला आहे हे लोकांच्या लक्षात आले. भाजप नेत्याच्या मुलाने आपल्या मित्रांसोबत ज्या लाहोरी हॉटेलमध्ये खाद्यपान आणि मद्यपान केले होते ते देखील बिल पोलिसांना मिळाल्यानंतर सारवासारव करण्यासाठी थेट हॉटेलचा मालकच मिडियासमोर येत असल्याचे पाहुन लाहोरी हॉटेलचा व्यवस्थापक ही आता वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
नागपुर धरमपेठ हाईकोर्ट रोड येथे लाहोरी डिलक्स बार एण्ड रेस्टॉरंट आहे. या बार विरोधात मागील अनेक वर्षांपासुन स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध आणि स्थानिक पोलिस प्रशासनाकडे अनेक तक्रारी सुद्धा केल्या होत्या परंतु पोलिसांकडून कारवाई मात्र तेव्हा सुद्धा झालेले दिसुन आले नाही. विशेष म्हणजे बारचा मालक समिर शर्मा जो आज संकेतच्या ऑडी अपघातात मिडियासमोर प्रतिक्रिया देतांना दिसत आहे तो स्वतःच गंभिर गुन्ह्यात आरोपी आहे. 2016 साली गोळीबाराच्या घटनेत याच समिर शर्मा व इतर साथिदारांना सादर पोलिसांनी अटक केले होते व अटक केल्यानंतर आजार असल्याचे सांगत शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी शर्मा सह श्रीकांत वनवे, शुभम जैस्वाल, राकेश समुद्रवारला अटक केली होती. त्यावेळी पप्पु दागोरच्या मोरक्या चौधरीवर तीन राऊंड गोळीबार शर्मा व साथीदारांनी केले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणुन चौधरीने ही 2 राऊंड फायरिंग केली. मुलीच्या छेड काढण्यावरुन हे भांडत त्यावेळी झाले होते.
विशेष म्हणजे शर्माचा गुन्हेगारी पार्श्वभुमी दुर्लक्षित केले तरी लाहोरी डिलक्स बारवर सुद्धा स्थानिक नागरिकांकडून जोरदार टिका मागील अनेक वर्षांपासुन होतांना दिसत आहे. काहींनी तर थेट गुगलच्या रिव्ह्यु मध्ये कमेंट पोस्ट करत सदर बार रात्री अपरात्री सुरु असते व दारु विक्री केली जाते व स्थानिक पोलिस प्रशासन कारवाई करत नाही हे आरोप लावले असतांनाही स्थानिक पोलिस प्रशासनाने मात्र 2016 सालीच योग्य कारवाई न केल्याने आजही याच बार विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आज नागपुर पोलिस प्रशासनाच्या अब्रुचे ढिंढवणे होण्यास कुठेतरी हे लाहोरी डिलक्स बार सुद्धा तितकेच जबाबदार असल्याचे चित्र दिसुन येते.
सध्या संकेतच्या ऑडी अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा लाहोरी बार चर्चेत असुन बारवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून जोर घेतांना दिसुन येते. बारचे मालक समिर शर्म आज मिडियासमोर सत्ताधार्यांची बाजु घेतांना संकेत ने बीफ खाल्लच नाही असेे म्हणत असतांना नागपुरातील जनता मात्र ‘सत्ताधार्यांच्या वरदहस्ताने चालणार्या बार सत्ताधार्याने मर्डर जरी केलं तरी खरं बोलणार नाही कारण भविष्यात त्याच ठिकाणी धंदा करता येणार नाही’ असे मत व्यक्त केल्याने राजकारण्यांच्या कारस्तानात साक्षिदारांवर आता विश्वास तरी किती ठेवायचा हाच मोठा प्रश्न लोकांसमोर उपस्थि होत आहे.



