बदलापुर (महेश कामत)- कुळगांव बदलापुर शहरातील फेरीवाल्यांना नेहमीच कुळगांव बदलापुर नगपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून टार्गेट केला जातो त्याचसोबत ठेकेदार ही दररोज पैसे वसुल करत असल्याने बदलापुरातील गोर गरिब फेरीवाल्यांना ब्लैकमेल करणार्या प्रशासन आणि ठेकेदारावर लगाम कधी बसणार असा सवाल आता फेरीवाला संघटनेतर्फे केला जात आहे.
बदलापुर पश्चिम येथे शासनामार्फत तसेच मुंबई उच्च न्ययालयाच्या निकालाद्वारे ठरविलेल्या जागेवर फेरीवाली आपले व्यवसाय करतात. हे फेरीवाले नियमांचे पालन करुन दिलेल्या जागेवरच ग्रामिण भागातून तसेच शेतीतुन आणलेला माल त्याठिकाणी थाटुन विक्री करुन आपल्या पोटाची खळगी भरतात. विशेष म्हणजे फेरीवाल्यांकडून एक ठराविक ठेकेदार दररोज 10 रुपयांच्या मनमर्जी पावत्या फाडत असुन ते देखील सहन करत आजवर फेरीवाल्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत रोजगार करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा पासुन पालिका प्रशासनावर मुख्याधिकारींचाच नियंत्रण असल्याने लोकप्रतिनिधी यांचा हस्तक्षेप होत नसल्याने फेरीवाल्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी कोणीच वाली राहिलेला नाही हे दिसुन आले. कुळगांव बदलापुर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून नियमांचे पालन करणार्या या फेरीवाल्यांवर अनेकदा कारवाई होतांना दिसुन आले. विशेष म्हणजे ह्या गरिब फेरीवाल्यांचे मालाचे देखील नुकसान होण्याच्या उद्देशाने कर्मचारी व अधिकारी अतिशय गुंडगिरी करत कारवाई करत आहेत.
याबाबत अनेक फेरीवाल्यांनी बदलापुर विकास मिडियाच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले कि, आम्ही गोर गरिबांनी जायचं तरी कुठे, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही नियमांचे पालन करुन धंदा करतो तरी देखील आमच्यावर कारवाई होते आणि आमच्या मालाला फेकुन दिले जाते तसेच जप्त केले जाते. जर कारवाईच होणार आहे मग पालिकेच्या त्या ठेकेदाराने पावतीच का फाडली असा आरोप देखील फेरीवाल्यांककडून होत आहे.
दररोज 5-10 रुपयांची पावती पालिकेच्या ठराविक ठेकेदाराकडून फेरीवाल्यांना दिले जाते व पावतीच्या मोबदल्यात पैसे घेतले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक फेरीवाल्याला एक पावती देण्याऐवजी ठेकेदाराकडून मनमर्जी कारभार सुरु असल्याने एखाद्याला 10 पावत्या एखाद्याला 5 पावत्या अश्या प्रकारे दिवसाढवळ्या लुट सुरु आहे. याबाबत मुख्याधिकारी यांनी गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे अन्यथा नुकसान सहन करणारे गोर गरिब फेरीवाली पालिका प्रशासनावर मोर्चा करण्यास ही मागे पुढे पाहणार नाही. ज्याचं सर्वच काही हातातुन हिरावुन जातो तो फेरीवालाच्या पोटातील आग मस्तकात जायला वेळ लागत नाही हे कुळगांव बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने योग्य वेळी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने देखील बदलापुर शहरातील फेरीवाल्यांची बाजु घेत पालिका प्रशासनाची वेळीवेळी कानउघडणी केल्यानंतर सुद्धा पालिकेतर्फे ज्याप्रकारे कारवाई केली जाते त्यामुळे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
ज्याप्रकारे बदलापुर शहरात गोरगरिब फेरीवाल्यांची प्रशासनाकडून तसेच ठेकेदाराकडून पिळवणुक होत आहे त्यातच स्थानिक पोलिस देखील फुकटचं भाजीपाला घेऊन जाण्यास संकोच करत नाही त्यामुळे बदलापुर शहरात कशाप्रकारची वृत्ती सध्या जन्माला आली आहे याबाबत अनेक चर्चा सुरु आहे.



