बदलापुर पश्चिम येथील समर्थ चौकी ठरतेय ‘पोलिसांच्या सेटलमेंटचा अड्डा’

Date:

बदलापुर (महेश कामत)- बदलापुर पश्चिम बैरेज रोड येथील समर्थ चौकी याठिकाणी अनेक अनैतिक धंदे चालत असल्याची बैरेज रोड परिसरातील नागरिकांची तक्रार असल्याने त्याबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट.

समर्थ चौकी ज्याठिकाणी बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी बसतात त्याठिकाणी फक्त पोलिस बसुन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच नाही तर सेंटलमेंटचे प्रश्न देखील सोडवतात अशी शहरात चर्चा आहे. पश्चिम क्षेत्रातील फेरीवाले, रिक्षावाले, नाईट बार चालवणारे, हुक्का पार्लर चालवणारे, जुगार चालवणारे, देशी दारु विकणारे अश्या अनेक धंद्यांवर सुरुवातीला बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याच्या पोलिसांमार्फत छोटीशी कारवाई करण्यात येते व कारवाईदरम्यान प्रत्येकाला समर्थक चौकीत येण्याचा सल्ला दिला जातो. अनैतिक धंदे चालवणारे आपल्यावर भविष्यात पुन्हा कारवाई होऊ नये यासाठी समर्थ चौकीत जातात व तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना लाच देऊन विषय सेटल करतात. हे एक दोन प्रकार नसुन दररोज विविध प्रकार होत असुन बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यावर काय उपाय काढणार असा प्रश्न आता सामान्य बदलापुरकर विचारत आहेत.

बदलापुर पश्चिम पोलिस ठाणे हे शहरापासुन 3-4 किलोमिटर दुर असल्याने बैरेज रोड याठिकाणी समर्थ चौकी उभारण्यात आले होते. या चौकीमुळे लोकांना पोलिसांकडे तक्रार करणेस मदत मिळेल हे त्यामागचे उद्देश होते परंतु चौकी उभारल्यानंतर मात्र काही भ्रष्ट पोलिसांनी त्या चौकीला सेटलमेंडचा अड्डाच करुन ठेवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट दिसत आहे.

एका तरुणाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, सदर समर्थ चौकीत पोलिसांकडून मारहाण करण्यासाठी अनेक प्रकारचे हत्यारे, काठ्या, रॉड ठेवलेले असते, पोलिस एखाद्याला अटक करुन बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात आणण्यापुर्वी समर्थ चौकीत आणुन त्याठिकाणी मारहाण करुन अटक आरोपीला पोलिस जबाबात काय लिहायचे ते सांगितले जाते व त्यानंतर गावातील बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात आणले जाते. त्यामुळे सी.सी.टी.व्ही. मध्ये पोलिसांकडून काय प्रकार केला जातो हे दिसत नाही व अश्या प्रकारे अनेक नागरिकांचे मानवाधिकार पायदळी तुडवले जाते.

एका महिलेने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, समर्थ चौकीत नागरिकांची तक्रार कधीच घेतली जात नाही. एखाद्या टपोरीने जर महिलेची छेड काढली म्हणुन जर त्या चौकीत तक्रार करण्यासाठी गेले असल्यास तेथील पोलिसच घाणेरड्या नजरेने फिर्यादी महिलेला पाहुन मजाक उडवतात त्यामुळे नागरिकांची समस्याच जर समर्थ चौकीत सुटत नसेल तर अश्या चौकीचे काय उपयोग?

एकुणच बदलापुर पश्चिम क्षेत्रात मागील अनेक वर्ष ज्याप्रकारे गुंडगिरी वाढलेली आहे आणि दहशतीचे वातावरण आहे त्यातच स्थानिक पोलिस प्रशासनातील लाचखोर अधिकारी नपुंसका सारखं गुन्हेगारांना वाकुन नमस्कार करत असल्याचे चित्र पाहुन सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे नेमकं काय असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...