नेरळ (महाराष्ट्र विकास मिडिया)- नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला ज्यामध्ये एक व्यक्ति नेरळ येथे हातात रॉड घेऊन कार मधील व्यक्तिला भर रस्त्यावर मारहाण करत आहे. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर असे लक्षात येते कि, मारहाण करणारा सदर व्यक्ति हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र् थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार व त्यांचे कार्य़कर्ते कशाप्रकारे गुंडगिरी करतात याचे उदाहरण जनतेसमोर आले आहे.
कर्जत विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र थोरवे जे मुख्यमंत्री शिंदे गटातील कर्जतचे नेते आहेत त्यांच्या कार्य़कर्त्याकडून ज्याप्रकारे भर रस्त्यावर नेरळमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न झाले आहे त्यामुळे सर्वच स्तरातुन या गुंडगिरीची निंदा होत आहे. नेरळ येथे ज्याप्रकारे जीवघेणा हल्ल्यात मागील काही वर्षात जोरदार वाढ होतांना पाहुन जनता हतभल झालेली आहे. विशेष म्हणजे एवढं होऊन सुद्धा पोलिस प्रशासन मात्र आरोपींवर तातडीने कारवाई करतांना दिसत नसल्याने नेरळ पोलिस ठाण्याला सत्ताधारी चालवतात कि काय असा प्रश्न आता कर्जत तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांची ज्याप्रकारे कर्जत विधानसभा क्षेत्रात एक नेता याच सह एक गावगुंड म्हणुन ही ओळख आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत जिंकणारे थोरवे यांच्यावर 3 गंभिर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल आहेत ज्याचा निकाल लावण्यास कोर्ट अद्याप अकार्यक्षम आहे. कर्जत विधानसभा क्षेत्रात होणार्या अनेक भ्रष्टाचार यावर जेव्हा कधी एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याने किंवा समाजसेवकाने आवाज उठवले असता त्यांना दाबवण्यासाठी थोरवे यांची माणसं नेहमीच पुढाकार घेत असल्याने कर्जत मध्ये गुंडशाहीचे वातावरण आहे.
ज्याप्रकारे नेरळ याठिकाणी नुकताच झालेल्या घटनेला पासुन सत्ताधार्यांचे कार्यकर्ते आणि बॉडीगार्ड यांना आजिबात कायद्याची भिती नाही हे पुन्हा एकदा दिसुन आले आहे.
याबाबत जेव्हा माध्यमांनी व पत्रकारांनी बातमी प्रकाशित केल्यानंतर आमदार थोरवे यांनी घटनेची सारवासारव करत सदर मारहाण करणारा आणि मारहाण झालेली दोन्ही व्यक्ति यांचेच कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाना दिसुन आले. विशेष म्हणजे अश्या प्रकारची गुंडगिरी होऊ नये याबाबत आपली प्रतिक्रिया देण्याऐवजी ह्या घटनेतही शिवसेना उद्धव गट त्यांना बदनाम करत असल्याचे रडगाणे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारे दिल्याने कर्जत विधानसभा क्षेत्रात होणारे गुंडशाही थांबणार कधी असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहेत.
सत्तेत गुंग असलेल्या गुंडांना आज रस्त्यावर मारहाण करतांना पोलिसांची भिती वाटत नाही, पोलिस प्रशासनाला प्रामाणिकपणे प्रोटोकॉलप्रमाणे काम करत गुन्हेगारांवर कारवाई करण्याची इच्छा वाटत नाही ह्या असल्या माहोल मध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या गुंडशाही माजली असल्याचेच दिसुन येते.



