मुंबई (महाराष्ट्र विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासुन राज्याचा कारभार मुख्यमंत्री म्हणुन सांभाळले आहे तेव्हा पासुन त्यांच्या जीवावर मोठे झालेले नेते व कार्यकर्त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात दहशतीचे आहे. गुंडगिरी, विनयभंग, बलात्कार व अनेक गंभिर स्वरुपाच्या गुन्ह्यात राज्यात सर्वत्र जोरदार वाढत होतांना दिसत असल्याने जनता आता शिंदे गटावर अत्यंत नाराज व त्याचवेळी भयभीत अवस्थेत असल्याचे दिसुन येते.
मुख्यमंत्री शिंदे यांचे गड मानले जाणारे ठाण्यात त्यांचाच कार्यकर्ता साक्षिदाराला कोर्टात जाण्यापुर्वी अपहऱण करतो आणि मारहाण करतो, पोलिस प्रशासन कठोरे कारवाई करत नाही, त्याच शहराजवळील बदलापुरात एक विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष म्हात्रे हा महिला पत्रकाराला जणु तुझाच बलात्कार झालाय असे म्हणत तिचा शाब्दिक विनयभंग करतो परंतु त्याठिकाणी सुद्धा पोलिस प्रशासन दखल घेतांना दिसलेली नाही. आता याच मुख्यमंत्र्यांचा खास चेला म्हणुन ज्या आमदाराची ओळख आहे ते म्हणजे कर्जत विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून भर दिवसा लोखंडी रॉडने एकाला मारहाण होते. याठिकाणी सुद्धा नेरळ कर्जत पोलिस तातडीने कारवाई करत नाही. हे फक्त ठाणे किंवा रायगड जिल्ह्यातच नव्हे तर विविध जिल्ह्यातील अनेक शहरात गुंडगिरी आणि दहशत बघायला मिळत असुन छत्रपती शिवराजांचे सुसंस्कृत महाराष्ट्र सध्या दहशदीचा महाराष्ट्र राज्य बनलाय की काय असा सवाल आता सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे पालक आहेत अश्या वेळी जनतेचे रक्षण करणे हा त्यांचा धर्म असतांना त्यांच्याच गटातील लोकप्रतिनिधी आणि कार्य़कर्त्यांकडून जेव्हा कायदा हातात घेण्याचा प्रकार सुरु असल्यास सामान्य जनतेला सुरक्षा कोण देणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी आणि कांग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळात किमान अश्या प्रकारची खुलमखुल्ला गुंडगिरी तर दिसत नव्हती. ज्याप्रकारे भाजप आणि शिंदे गटातील सत्तेमुळे राज्यात विविध प्रकारची गुंडगिरी आता पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे ह्या घटनेत ही पोलिसांकडून योग्य ती कारवाई न केल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा पोलिस प्रशासनावर दबाव अजुन किती काळ राहुल असाही प्रश्न आता सामान्य जनता विचारत आहेत. एकनाथ शिंदे हे स्वतःच्या सामान्य जनतेचा मुख्यमंत्री म्हणवुन घेतात त्यांची सामान्य जनता आज राज्यात सुरक्षित आहे का याबाबत शिंदे यांनी स्वतःहुनच जाणुन घेणे आता काळाची गरज आहे.