बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र राज्यातील बदलापुरात कशाप्रकारे दहशतवादी कृत्य होते आणि पोलीस प्रशासन अश्या कृत्यांना पाठीशी घालते हे नुकताच मुंबई हाईकोर्टाच्या निकालामुळे जनतेसमोर आले आहे. 304 खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात दाखल असलेल्या केस संदर्भात न्यायमुर्ती ए.एस.गडकरी आणि डॉ. निला गोखले यांच्या कोरमने बदलापुर पश्चिम पोलीसांची कानउघडणी केली आहे.
बदलापुर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी सुरज म्हस्कर आणि त्यांच्या आईवर मारहाण झाली होती. या गुन्ह्यात तलवारी आणि रॉड सारख्या हत्यारांचा वापर आरोपींकडून करण्यात आले होते. विशेष म्हणजे पिडीत आईला दवाखान्यात आधि पाठवुन उपचार करण्याऐवजी बदलापुर पश्चिम पोलीसांनी आधि ठाण्यात नेले व त्यानंतर बदलापुर ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यासाठी पत्र दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आली आहे कि, बदलापुर ग्रामिण रुग्णालयात ज्याप्रकारे डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट बनविण्यात आले त्यामध्ये दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे स्थानिक पोलीसांनी या घटनेसंदर्भातली माहिती स्टेशन डायरीट नमुद देखील केलेली नाही.
याबाबत जेव्हा उच्च न्यायालयाने बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव यांना जाब विचारले असता तक्रारदार सुरज यांच्या आईंचा जबाब आणि मेडिकलचा दाखला आजपर्यंत पोलीसांनी जबाब नोंदवुनच घेतलेले नाही. तसेच फिर्यादी आणि आरोपी दोघांमध्ये आपआपसात समझौता झाल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात आलेला नाही असे पोलीसांनी कोणतीही लाज न बाळगता कोर्टात सांगुन दिले, त्यामुळे बदलापुर पश्चिम पोलीस ठाण्याचा नाकारतेपणा न्यायालयात उघडकीस आले आहे.
हत्येचा प्रयत्न करण्यासारखा 307 सारखा गंभिर स्वरुपाचा गुन्हा बदलापुर शहरात घडतो आणि पोलीसांची कार्यपद्धती पाहिल्यावर मुंबई उच्च न्यायालयाला सुद्धा आश्चर्य वाटले त्यामुळे न्यायमुर्तींनी ‘हा विषय खाजगी नसुन समाजाच्या दृष्टीने गंभिर विषय आहे’ अशी पोलीसांनी कानउघडणी करत तातडीने अहवाल सादर करण्याचे पोलीसांना आदेश दिले आहे.
ज्या प्रकारे बदलापुरात एक एक प्रकार सुरु आहे भविष्यात या केससंदर्भात फिर्यादी ने ही सेटलमेंट दबावाखाली केले असल्याचे सांगितल्यास आश्चर्य वाटणार नाही असेही कोर्टाने नमुद केले.
त्यामुळे कोर्टाने सदर विषय ठाणे पोलीस आयुक्त यांच्या निदर्शनास आणुन दिले असुन आता ठाणे पोलीस आयुक्त बदलापुर पश्चिम पोलीसांच्या निष्क्रीयतेवर काय उपाय आणतात यावरच सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.