जेव्हा भाजपच्या नेत्यांकडून आर.एस.एस.च्या सदस्यांची होते फसवणुक…

Date:

जमिन घोटाळ्यात नितीन गडकरी व इतरांवर कारवाई होणार? – नागपुरच्या जनतेचा सवाल

40 हुन अधिक कोटींचं कर्ज देतांना योग्य चौकशी न केल्याने सारस्वत बैंक वादाच्या भोवर्यात1

नागपुर (बदलापुर विकास मिडिया)- भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात ज्याप्रकारे मतदारांनी भाजप पक्षाला मतदान केले व सत्ता मिळाल्यानंतर मतदारांना महागाई व इतर गोष्टींच्या समस्येला सामोरे जावे लागले त्यात नागरिकांनी आजवर भाजप पक्षावर संताप व्यक्त करतांना दिसले. परंतु मतदार हे एकमेवच नाही ज्यांची फसवणुक झाली आहे, सामान्य मतदारांसारखं आर.एस.एस. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) च्या काही सदस्यांची देखील भाजप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून फसवणुक झाल्याचे दिसुन येते. विशेष म्हणजे हे आजकल भविष्यात देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत असलेले नितीन गडकरी व त्यांच्या मुलांचा या घोटाळ्यात समावेश असल्याने महाराष्ट्रात भाजप पक्षाचं चाललय तरी काय अशी म्हणण्याची आता सामान्य नागरिकांवर वेळ येत आहे.
भारताचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप आहे कि त्यांनी त्यांच्याच मुळ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सदस्यांची फसवणुक करत सहकारी संस्थेची एक जागा बैंकेत गहाण ठेवत आपल्या मुलांना 42.83 कोटी रुपयांचा कर्ज मिळवुन दिलेे. नागपुर एमआयडीसी येथील जे 17 ही जागा पोलिसैक इंडस्ट्रीअल कॉ.ऑप. सोसायटी लि. च्या नावे होती ती जागा गडकरी यांचे दोन्ही मुले निखील आणि सारंग नितीन गडकरी यांच्या नावे असलेल्या जीएमटी माईनिंग एण्ड पावर लि. कंपनीच्या नावे हस्तांतरण करण्यात आले. विशेष म्हणजे या हस्तांतरणाबाबत पीसीएसएल च्या सदस्यांना कोणत्याही प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आली नाही. हस्तांतरणानंतर सारस्वत बैंकेत ती जागा गहाण देखील ठेऊन कर्जातुन मिळालेले करोडो रुपये जीएमटी माइनिंग एण्ड पावर लि. या कंपनीला देण्यात आले. हा घोटाळा तेव्हा उघडकीस आला जेव्हा आर.एस.एस. चे सदस्य व पीसीएसएनचे शेअर होल्डर यांनी नागपुर एमआयडीसीत जागेच्या मालकी हक्काबाबत विचारपुस केली असता सदर जागा कॉ.ऑप. सोसायटीकडून पुर्ती सोलार सिस्टम लि. च्या नावाने हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आले. वाचकांच्या माहितीसाठी पुर्ती सोलार सिस्टम लि. कंपनी ज्याचा संबंध नितीन गडकरी मेहुणे किशोर तोतडे यांच्याशी आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या खालीलायक माहितीनुसार पीसीएलएल जी सहकारी संस्था 1988 साली नोंदणी झाली होती व त्याचे उद्घाटन त्यावेळचे वरिष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी केले. त्यावेळी सदर 4950 स्के. फुटची ती जागा 99 हजार रुपयांच्या प्रिमियम आणि 1 रुपया वार्षिक भाडेतत्वावर एमआयडीसीकडून संस्थेला बहाल करण्यात आले होते. त्याचसोबत महाराष्ट्र सरकारतर्फे 24.77 लाख रुपयांचे अनुदान देखील संस्थेला देण्यात आले होते. याच जमिनीचे हस्तांतर गडकरी यांनी दुसर्या कंपनीच्या नावे करत जीएसटी माइनिंग एण्ड पावर प्रा. लि. कंपनीसाठी बैंकेतून कर्ज मिळविले.
आर.एस.एस. चे सदस्य आणि पीसीएसएल चे शेअऱ होल्डर भगवानदास राठी यांनी याबाबत माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली कि, ‘गडकरी यांनी जे काही कारस्थान केले ते 1330 शेअरहोल्डरची मोठ्या प्रमाणात फसवणुक आहे. कोणालाही काहीच कल्पना न देता ज्याप्रकारे जमिनीचे मालकी हक्क गडकरींच्या मेवण्याच्या पुर्ती सोलार सिस्टम प्रा. लि. कंपनीच्या नावे करण्यात आले व त्यानंतर कर्जासाठी त्याच कंपनीच्या अभ्यस्त कंपनी जीएमटी माइनिंग एण्ड पावर प्रा. लि. तर्फे बैंकेत गहाण ठेऊन 43 कोटी कर्ज मिळवले. जागेचे हस्तांतरण होतांना नोंदणी कार्यालयानेही संस्थेतील सदस्यांना अंधारात ठेवले.’ त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील भ्रष्ट संस्था नोंदणी कार्यालयाबाबत ही आता चर्चा आहे.
संस्थेतील इतर सभासदांनी देखील नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांशी प्रतिक्रिया देत म्हणाले कि, हिंगना येथल प्लॉट हस्तांतरणासाठी 2011 साली कोणालाही माहित नसतांना ठराव करण्यात आला ज्यामध्ये प्लॉट गहाण ठेवण्याचा विषय होते.’
विशेष म्हणजे एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयात 2012 ला पीसीएसएल कडून पुर्ती सोलार ला जमिन हस्तांतर करण्याचे निवेदन देण्यात आले त्यामुळे कागदपत्र आणि पुराव्यांकडे पाहिल्यावर घोटाळा झाल्याचे सिद्ध होते. त्यामुळे संस्थेचे शेअर होल्डर राठी व इतरांनी गडकरी व त्यांच्या दोन्ही मुलांविरोधात नागपुर जिल्हा कोर्टात खटला दाखल केले असुन पोलिसांनी एफ.आय.आर नोंदविण्याची त्या खटल्याद्वारे केल्याचे दिसुन येते.
या सगळ्या घोटाळ्यात सारस्वत बैंकेवर ही आरोप होत आहेत. ज्या जमिनीचे मालकी हस्तांतरण जुन 22, 2022 रोजी झाले मग 2011 सालीच्या प्रस्तावीत ठरावावरुन कर्ज कसे काय देण्यात आले. बैंकेने 40 हुन अधिक कोटी कर्ज देतांना कोणत्या प्रकारची चौकशी आणि जनजागृतीसाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती हा संशोधनाचा विषय आहे.
नितीन गडकरी यांच्यावर याआधि सुद्धा गंभीर स्वरुपाच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्दा त्यांच्यावर विविध आरोप केल्या परंतु भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर गडकरी नेहमी म्हणतात भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजकारणात सन्यास घेऊन. त्यामुळे आता नागपुर एमआयडीसी जमिन आणि कर्ज घोटाळ्या प्रकरणात गडकरी काय करतात यावरच महाराष्ट्र आणि देशातील तमाम जनतेचे लक्ष वेधले गेल्याचे समजते.
या घटनेनंतर एक मात्र दिसुन येते कि नागरिक ज्या प्रकारे तक्रारी करतात कि भाजप पक्षाला आम्ही मतदान केल्यानंतर आम्हाला सुगीचे दिवस आलेले नाही आणि आमची फसवणुक झाली आहे पण ज्या आर.एस.एस. च्या मदतीने पक्ष मोठा झाला त्याच संघटनेच्या सदस्यांची जर फसवणुक होत असेल तर सामान्य जनतेचं काय…

सदर वृत्त पत्रकार महेश कामत यांनी लिहिले असुन बातमीची संपुर्ण जबाबदारी त्यांची असेल याची नोंद घ्यावी. – बदलापुर विकास मिडिया

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...