महाराष्ट्र खात्यातील निष्क्रिय पोलिसांचा तपास कार्य पाहता पुजा चव्हाण हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची पुणेकरांची मागणी

Date:

– शिंदे गटातील नेते संजय राठोड पुन्हा वादाच्या भोवर्यात


पुणे (बदलापुर विकास मिडिया)- महाराष्ट्र पोलिस खात्यातील कर्मचारी राज्यातील विविध घटनांमध्ये कशाप्रकारे तपास कार्यात निष्क्रिय असल्याचे अनेकदा दिसुन आले. मग ते पुण्यातील घटना असो, मालवण येथील घटना असो, अंबरनाथ येथील घटना असो किंवा चर्चेत असणार्या बदलापुरची घटना असो, ज्यावेळेस शिंदे गटातील राजकिय नेत्यांचे लोकप्रतिनिधी किंवा जवळचे एखाद्या व्यक्तिचे गुन्ह्यात आरोपी म्हणुन समावेश असल्याचे ऐकायला मिळते त्या सर्वच गुन्ह्यांचा पोलिसांमार्फत योग्य प्रकारे तपास होत नाही. नुकताच मुंबई उच्च न्यायायलयाने अनेक निकालांद्वारे पोलिसांची तपासाविषयी असमानाधानकारक असल्याचे नमुद ही केले. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यातील निष्क्रियता उघड्यावर आले आहे.
काही वर्षांपुर्वी एका टिक टॉक स्टार कै. पुजा चव्हाण हिच्या मृत्युत त्यावेळचे आमदार व पर्यावरण मंत्री संजय राठोड यांचे लिंक असल्याची संपुर्ण राज्यातील नागरिकांना दिसुन आले. त्यामुळे त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेले आमदार राठोड यांच्या हातुन पर्यावरण मंत्रीपद निघुन केले. पुणे पोलिसांमार्फत त्यावेळी सदर मृत्यु प्रकरणाची चौकशी सुरु होती. काही काळानंतर जेव्हा आमदार राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आणि पुण्यातील त्या प्रकरणाची चौकशीची फाईल बंद होण्याची वेळ आली. त्यामुळे राठोड यांचा शिंदे गटात प्रवेश कोणत्या कारणामुळे झालामुळे झाला असा प्रश्न महाराष्ट्रातील जागृक नागरिकांनी केला होता.
विशेष म्हणजे महिलांवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या म्हणुन ओळखले जाणारे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल दाखल करत सदर मयत मुलीला न्याय मिळणेसाठी घटनेची चौकशी उच्च स्तरावर झाली पाहिजे अशी मागणी केली होती. कालांतराने आमदार राठोड यांनी उद्धव ठाकरे गटाला राम राम करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होताच भाजपच्या त्या महिला नेत्यांनी सदर पीआयएन ला मागे घेण्याबाबत त्यांच्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली. त्यावेळी उच्च न्यायालयाने कोर्टात ‘पीआयएल द्वारे राजकारणाचा खेळ’ करण्यात येऊ नये अशी तंबी देखील दिली होती.
महाराष्ट्र राज्यातील पोलिस प्रशासन विविध जिल्ह्यात ज्याप्रकारे फिर्यादीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात, आरोपीला छुपा पाठिंबा देतात, फिर्यादीला दमदाटी करतात, सत्तेच्या दबाबात वाकुन जातात यामुळे पुण्यात ‘त्या’ दिवशी जे घडले ती आत्महत्या कि हत्या? असा प्रश्न आता पुणेकर विचारत आहेत.
गोपनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत पुजा चव्हाण ही मागील अनेक दिवसांपासुन विविध लोकांमुळे मानसिक त्रास सहन करत होती. त्यातल्या त्यात ती गरोदर देखील होती आणि एका रुग्णालयात तिने गर्भपात देखील केले. गर्भपातच्या त्या रिपोर्टवर पुजा चव्हाण असे नाव नाही तर पुजा अरुण राठोड हे नाव दिसुन आले. सदर रिपोर्ट त्यावेळी सोशल मिडियावर व्हायल झाले ही झाले. अरुण राठोड हे नाम जे पुजा सोबत जोडले गेले हा व्यक्ति आमदार संजय राठोड यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समजते. विशेष म्हणजे 22 वर्षीय पुजा चव्हाण आणि आमदार संजय राठोड यांच्यात घटनेच्या 4-5 दिवसाआधि अनेकदा फोनद्वारे संभाषण ही झाले. एक संभाषण तर 90 मिनिटांचे देखील होते.संपुर्ण संभाषण हे बंजारा भाषेत असल्याने पोलिसांनी त्या भाषणाचे ट्रान्सलेशन साठी फोरेंसीक साइन्स लेब मध्ये पाठविले होते. पोलिसांना तपासात अरुण राठोड आणि पुजा या दोघांचे एकत्र फोटो देखील तपासात आढले तसेच 6 फेब्रुवारी रोजीचे यवतमाळ मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ‘ते’ फुटेजही पोलिसांनी मिळविले.
पुण्यातील मोहम्मद वाडी येथील हेवेन पार्क याठिकाणी भाड्याच्या खोलीत पुजा चव्हाण राहत होते त्याठिकाणी आमदार राठोड यांचे जवळचे कार्यकर्ते अरुण राठोड व दुसरा कार्यकर्ता विलास चव्हाण हे दोघेही येऊन जाऊन असतात आणि राहत असल्याचे सी.सी.टी.व्ही. फुटेजमधून दिसून आले. त्यामुळे सदर गुन्ह्यातील विविध पुरावे असल्यानंतर देखील प्रकरणाची चौकशी शेवटी आत्महत्या म्हणुन पोलिसांनी फाईल बंद का केली? हे रहस्यमय आहे.
ज्या इमारतीत पुजा चव्हाण राहत होती त्याच ठिकाणाहुन इमारतीवरुन खाली पडुन तिचा मृत्या झाल्याची घटना दि. 8 फेब्रुवारी रोजी घडली. नागरिकांच्या संतापामुळे दि. 16 फेब्रुवारी रोजी आमदार संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे गटाकडे आपला राजिनामा सुपुर्द केला, परंतु फक्त राजिनामा दिल्याने विषय संपणार?
एका 22 वर्षीय तरुणीचा जीव जातो आणि पोलिसांकडून विविध पुरावे असल्यानंतर देखील तपास कार्य 100 टक्के प्रामाणिकपणे होत नाही अशी प्रतिक्रिया आता पुण्यातील जागृक जनता करत सत्ताधार्यांवर आरोप करत आहे. ज्या ही घटनेत आजवर एखाद्या आरोपीवर एखाद्या राजकिय पुढार्यांचा ‘वरदहस्त’ असतो त्या विरोधात पोलिस प्रशासनाकडून तातडीने कारवाईच होत नाही तर भविष्यात महिलांची सुरक्षा कशाप्रकारे होणार हा चिंतेचा विषय आहे.
मृत पुजा चव्हाण ही देखील त्याच बंजारा समाजातुन आहे ज्या बंजारा समाजाचे नेतृत्व आमदार संजय राठोड करतात त्यामुळे बंजारा समाजातील महिला देखील या राज्यात सुरक्षित नसल्याचे दिसुन आल्याने न्याय पालिकेने तातडीने सदर घटनेची चौकशीचे कार्य़ सीआयडी कडे सुपुर्द करावे अशी मागणी आता पुणेकरांनी केली आहे.
तसेच ज्या राजकिय नेत्यांनी फक्त राजकिय फायद्यासाठी पीआयएलचा राजकिय खेळ खेलण्याचा प्रयत्न केला अश्या संधी साधु राजकारण्यांवरही पुण्यातील सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 22 वर्षीय पुजा चव्हाण हिच्या मृत्युला कारणीभुत असलेल्या आरोपींना आता तरी शिक्षा मिळणार का? यावरच सर्वांचे लक्ष वेधलेले आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...