बदलापुर (महेश कामत)- काल दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी बदलापुर रेल्वे स्थानकाजवळ पैश्याच्या व्यवहारात वाद उमटल्याने एकाने गोळीबार करत शहरात तणावाचे वातावरण पसरवले. यामुळे पुन्हा एकदा बदलापुरचे नाव चुकीच्या गोष्टीत प्रसारित होत असल्याने आमच्या संसुस्कृत बदलापुर शहराचे नाव कोणीही खराब करु नये असे आवाहन आता राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कॅप्टन. आशिष दामले यांनी मिडियाद्वारे केले आहे.
काल जो काही प्रकार घडला त्यातील दोन व्यक्ति हे अंबरनाथ येथील आणि इतर दोन हे उल्हासनगर येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे ते बदलापुरचे रहिवाशी रेखील नाही फक्त पैश्याच्या व्यवहारासाठी ज्याप्रकारे चारही जण बदलापुरात अड्डा बनवल्यासारखे येऊन किरकोळ वादावरुन गोळीबार करतात अश्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे परंतु त्याचवेळी इतरांनी देखील अंबरनाथ उल्हासनगर व बदलापुर शहराबाहेरील लोकांनी आमच्या शहरात येऊन या शहरात गुन्हेगारीचे काम करु नये जेणेकरुन शहराचे नाव खराब होईल असे दामले यांनी मिडियाशी बोलतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
यापुर्वीही काही दिवसांपुर्वी ज्याप्रकारे बदलापुर शहरात अल्पवयीन बलात्कार प्रकरणी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते त्यामध्ये सामान्य बदलापुर नियमांचे पालन करत आंदोलन करत असतांना बाहेरच्या काही तरुणांनी नियमांचे उल्लंघन करत दंगल होण्यासारखे कृत्य केले त्यावेळी सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींनी व समाजसेवकांनी हे विषय मांडले होते.
सुसंस्कृत बदलापुर शहराचे नाव कोणीही खराब करु नये – कॅप्टन आशिष दामले यांचे आवाहन
Date:



