…यापुर्वी ही पोलिस संरक्षण मिळावे या शुल्लक कारणासाठी स्वतःवरच केला होता गोळीबार

Date:

बदलापुरात शुल्लक कारणावरुन गोळीबारची घटना काय नविन नाही

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच ज्याप्रकारे शुल्लक कारणावरुन गोळीबारची घटना काल 5 सप्टेंबर रोजी झाली त्यामुळे पुन्हा एकदा बदलापुर शहराचे नाव बदनाम होत असुन शुल्लक कारणावरुन यापुर्वी देखील गोळीबारची घटना झाल्याबाबत आता वेगवेगळ्या घटनेची चर्चा सुरु आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बदलापुर उपशहरप्रमुख जगदिश कुडेकर हे वामन बारकु म्हात्रे यांचे जवळचे मानले जातात त्याने वर्ष 2018 साली पोलिसांकडून मोफत संरक्षण मिळण्याच्या हेतुने स्वतःवरच गोळीबार करण्यासाठी अंबरनाथच्या काही तरुणांना सुपारी दिली होती. विशेष म्हणजे सुपारीसह कारतुक आणि पुस्तुल ही पुरवण्या आले होते.
त्यावेळचे शिवसेना माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे ठाणे जिल्हा उपसचिव जगदिश कुडेकर हे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत बदलापुर पश्चिम येथील पोळीभाजी केंद्र याठिकाणी उपस्थित असतांना दोन हेल्मेट घातलेल्या दुचाकी स्वारांनी कुडेकरच्या दिशेने गोळीबार करत तेथून पळ काढला. स्वतःचीच सुपारी असल्याने कुडेकर काही जखमी झाले नाही आणि त्यांनी थेट बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची घटना सांगत आता तरी पोलिस संरक्षण द्या अशी मागणी केली.त्यावेळी पोलिसांनी इतक्या जवळुन गोळीबार केल्यानंतर देखील कुडेकर यास कोणतीच दुखापत न झाल्याच्या कारणाने संशय घेत आरोपींचा कसुन शोध लावला. अज्ञात आरोपींविरोधात आईपीसी सेक्शन 307, तसेच आर्म एक्ट एण्ड एमपी अक्टच्या सेक्शन 3 आणि 25 अन्वर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा कसुन शोध घेत शेवटी अंबरनाथ येथून आरोपीना अटक करण्यात आले. पोलिस कोटठीत असतांना अटक आरोपींनी सुरुवातीला काही तोंड उघडले नाही शेवटी पोलिसी खाकी दाखवल्यानंतर जगदिश कुडेकर यांनीच स्वतःची सुपारी दिल्याचे आरोपींनी कबुल दिली. ही माहिती कळताच पोलिस संरक्षण मागणारे जगदिश कुडेकर बदलापुरही फरार झाले आणि काही दिवसांनी पोलिसांनी त्यास रत्नागिरी येथील त्यांच्या गावातून अटक केली. काही काळानंतर त्यांना या व इतर गुन्ह्यांमुळे पोलिसांकडून तडीमारीच्या आदेशाचा देखील सामना करावा लागला. त्यावेळेस ते सत्ताधारी म्हात्रे गटाचे विरोधक होते, त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून ही तितके सहकार्य मिळत नव्हते.
सध्या जगदिश कुडेकर हे शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी यांचे कार्यकर्ते झाल्याने तसेच लेफ्ट हैंड म्हणुन ओळखले गेल्याने गोळीबारीच्या केसमध्ये जगदिश कुडेकरची जामिनावर सुटका झाली आहे तसेच बदलापुर शहर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख पदावर कार्यरत आहेत. कुडेकरच्या कार्यकर्त्यांप्रमाणे स्थानिक पोलिस ही आता कुडेकर साहेब म्हणुन हाक मारतात त्यामुळे पोलिस प्रशासन सत्तेच्या वार्याप्रमाणे होलत असल्याचे दिसुन येते.
विशेष म्हणजे अश्या प्रकारे गोळीबार सारख्या घटनेला ज्यांनी मजाक बनवुन ठेवला आहे त्यामुळेच जेव्हा एखाद्या प्रामाणिक आरटीआय कार्यकर्ते किंवा सुज्ञ नागरिकावर गोळीबार होतो त्यानंतर सुद्धा पोलिस प्रशासन संरक्षण देण्यास तैय्यारी दाखवत नाही.
मुळात बदलापुर शहरात गोळीबारच्या घटना काय नविन नसुन मागील अनेक वर्षांपासुन सतत होतच आहेत त्यामुळे सर्वप्रथम दोष हे स्थानिक पोलिस प्रशासनाला दिले पाहिजे जे मागील अनेक वर्ष सर्व काही माहित असुन देखील सत्ताधार्यांची लाचारी करण्यात ते व्यस्त असतात आणि शहरात दहशतीला छुपा पाठिंबा देतात. आज शहरात ज्याप्रकारे किरकोळ वादावरुन ही गोळीबार केला जातो त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अश्या किती लोकांकडे अनधिकृत्त पिस्तुल आहेत याची चौकशी आता ठाणे आयुक्तांमार्फत केले पाहिजे.

कोर्टाचा निकाल वाचण्यासाठी क्लिक करा

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

बदलापूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरवरून मनसे बदलापूर पदाधिकार्यांसह नागरिकांचा संताप

जबरदस्ती, धमक्या आणि अभियंत्याची मगरुरीची वागणुक बदलापूर (महाराष्ट्र विकास...

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...