बदलापुरातील वाहन चालक हैराण
बदलापुर (महेश कामत)- कुळगाांव बदलापुर नगरपरिषदेती वाहतुक कोंडी समस्या ही मागील अनेक वर्षांपासुन वाहन चालकांना व नागरिकांना भेडसावत असली तरी त्यावर तोडगा काढण्याऐवजी स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रास देण्यात ट्राफिक पोलिस व्यस्त असल्याचे शहरात दिसुन येते.
बदलापुरात नविन डीपी रोड व इतर ठिकाणी पुर्व भागात वाहतुक शाखेच्या पोलिसांकडुन मानमानी कारवाई करण्यात येत असल्याची अनेक वाहन चालकांची तक्रार आहे. पार्किंग योग्य प्रकारे लावलेले असले तरी त्याठिकाणाहुन वाहतुक शाखेचे खाजगी कंत्राटदार वाहन उचलतात व ते सोडवण्यासाठी वाहतुक शाखेच्या पोलिसांना लाच द्यावे लागले.
एका जागृक वाहन चालकाने बदलापुर विकासशी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले कि, योग्य ठिकाणी गाडी पार्क केली तरी तेथुन गाडी उचलण्यात येते आणि हे फक्त ठराविक पुर्व येथील विविध ठिकाणी होते. पश्चिमेत गाड्या कशाही प्रकारे पार्क केल्यानंतर ही पोलिसांमार्फत कधीही कारवाई होतांना दिसत नाही. वाहन सोडवतांना सुद्धा पैसे दिल्याची कोणतीच पावती मिळत नाही.
अनेकांंनी वाहतुक शाखेच्या पोलिसांच्या कारनाम्यामुळे त्रस्त होत सोशल मिडियावर सुद्धा आपली व्यथा मांडली आहे. विशेष म्हणजे बहुतेकांचे हेच आरोप आहे कि बदलापुर पश्चिम येथील नो पार्किंग झोन मध्ये ज्यांचे वाहन पार्क केल्या जातात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही आणि बदलापुर पुर्व नविन डीपी रोड येथे ज्याठिकाणी नो पार्किंग झोन नसेल तेथे 1 मिनिटांसाठी जरी पार्क केली तर तातडीने खाजगी टो व्हॅन गाडी उचलुन नेतो.
आधिच खराब रस्त्यांमुळे पालिकेपासुन त्रस्त असलेला बदलापुर वाहतुक शाखेच्या भ्रष्ट पोलिस अधिकार्यांच्या चिरीमिरीच्या समयीने अजुन हैराण झाल्याचे दिसुन येते.
याबाबत वाहतुक शाखेने तातडीने तोडगा न काढल्यास बदलापुरातील वाहन चालकांमध्ये ही रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



