हैराण नागरिकांनी माजी नगरसेवक सोळसेंसह महावितरण कार्यालयात दाखल
बदलापुर (महेश कामत)- कुळगांव बदलापूर शहरात मागील अनेक वर्षांपासुन लोडशेडींगची समस्येवर अद्याप महावितरण विभागाने सोडगा काढले नाही त्यातच आता सणासुद्धीच्या काळात गणेशोत्सवा दरम्यान 5-5 मिनिटांनी लाईट जात असल्याने शहरातील नागरिकांमध्ये महावितरण विषयी संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अनोख्या पद्धतीने भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रमेश सोळसे यांनी रहिवाश्यांसह अधिकार्यांच्या खुर्च्यावर पुष्पगुच्छ आणि शॉल देत निषेध व्यक्त केले.
बदलापुर शहर ज्याला चौथी मुंबई म्हटले जाते त्या शहरात मागील अनेक वर्ष लोडशेडींगची समस्येवर उपाययोजना करण्यात आलेले नाही. त्यात बाप्पांच्या आगमनावेळी घरात आणि सार्वजनिक ठिकाणी लाईट पुन्हा पुन्हा गायब झाल्याने गांधी चौक – शिवाजी चौक येथील संतप्त रहिवाश्यांनी भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवक रमेश सोळसे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात दाखल झाले. विशेष म्हणजे महावितरण कार्यालयील कर्मचारी सुद्धा लाईटीप्रमाणे गायब झाल्याने जाब विचारा तरी कोणाला यामुळे त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध करत महावितरण अधिकार्याची कानउघडणी केली आहे. अधिकारी नसलेल्या खुर्च्यावर शॉल आणि पुष्पगुच्छ ठेवत निषेध व्यक्त करण्यात आले.



