मेडिकल शॉप लाईसेंस देण्यासाठी 25 हजाराची लाच मागणार्या वरिष्ठ एफ.डी.ए. अधिकार्याविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

0
49

ठाणे (बदलापुर विकास मिडिया)- खाद्य आणि औषध प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त दिपक मालपुरे 25 हजाराची लाच मागण्याच्या कारणावरुन ए.सी.बी. ने गुन्हा दाखल केले आहे. ठाण्यातील एका व्यावसायिकाला मेडिकल शॉप लाईन्स देण्यासाठी म्हणुन 50 हजार रुपयांची मागणी दिपक मालपुरे यांनी केली होती, नंतर 25 हजार लाच घेतल्यावरच लाईसेन्स दिले जाईल असे म्हटल्याने फिर्यादीने एसीबी कडे तक्रार करत ठाणे येथील वागळे इस्टेट याठिकाणी सापळा रचला. एसीबी ने दिलेल्या माहितीप्रमाणे अद्याप लाचखोर मालपुरे यांनी अटक करण्यात आले असुन लाचलुचपत प्रबंधक कायद्याअंतगर्त गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
औषधांचे दुकान उघडण्यासाठी ज्याप्रकारे खाद्य आणि औषध प्रशासनातील अधिकारी 25 हजार आणि 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करत आहेत यामुळे व्यवसाय करणारे तसेच वैद्यकिय क्षेत्रातील मंडळींमध्ये संताप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here