-आदर्श शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे अद्याप फरार
-एस.आय.टी. च्या कारवाईनंतर ही तपास योग्य रितीने झाले नाही – कोर्टाची नाराजी
मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- बदलापुर शहरात नुकताच घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवरील बलात्कारीची घटना ह्या विषयी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विषय हाताळत शिंदे सरकारचे ताशेऱे ओढले आहे. एस.आय.टी. च्या टीमने योग्य तो तपास न केल्याने अद्याप आदर्श शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे फरार असल्याचे दिसुन येत आहे म्हणत कोर्टाने पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
मुंबई उच्च न्यायालयाने अश्या प्रकार ची घटना पुन्हा घडु नये या अनुषंयाने महाराष्ट्र सरकारला एक कमिटी नेमण्याचे आदेश दिले होते ज्यामध्ये निवृत्त आईसीएस मिरा बोर्वनकर, तत्कालिन मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमुर्ति साधना जाधव आणि शालिनी फसलकर या सदस्यांना कमिटीत नेमल्याचे समजते. नर्सरी ते सर्व इयत्तेच्या शाळांमध्ये, रुग्णालयात यापुढे जर अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची बाब समोर आली तर त्या घटनेला कशाप्रकारे हाताळले पाहिजे ज्यामुळे पिडीतेला तपासकार्यात अजुन त्रास होणार नाही अश्या प्रकारची व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले.
या पुर्वी झालेल्या सुनावणी नंतर आता मुंबई उच्च न्यायालयाकडे ओळख परेड, फॉरेंसीक ऐनेलिसिस तसेच सी.डी.आर. या तीन विषयी कारवाई केल्याचे समजते. ए.टी.एस. कडून योग्य प्रकारे स्टेशन डायरी मेंटेन करण्यात आले नाही हे मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे स्थानिक बदलापुर पोलिस ठाण्यातील कर्मचारी काय आन् एस.आई.टी. तील अधिकारी काय तपास 100 टक्के योग्य झाले हे दिसुन आलेले नाही.
बदलापुरात ज्याप्रकारे ही घटना घडली त्यानंतर हजारोच्या संख्येत सामान्य नागरिकांमध्ये आक्रोष निर्माण झाले होते ज्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्र आणि देशभरात दिसुन आले. यामुळे शिंदे सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास अपात्र असल्याचे दिसुन आले.
बदलापुर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारचे ताशेरे ओढले
Date:



