हेंद्रेपाड्याच्या ‘त्या’ राजकारण्याला जनता माफ करणार?

Date:

बदलापुरातील आंदोलनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अनेकांचे नाव टाकावे म्हणुन भाजपचे घोरपडे सक्रिय!

बदलापुर (महेश कामत)- कुळगांव बदलापुर शहरात नुकताच सामान्य जनतेने रेल रोको आंदोलन करत सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात जनआक्रोष आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे संपर्क भारतात बदलापुरात चाललय काय हे समजले. भारतातच नव्हे तर जगातील कानाकोपर्यात बदलापुरात घडलेली घटना आणि पोलिस प्रशासनाकडून झालेले कार्य ही माहिती चर्चेला होती. आंदोलनामुळे मिडिया, राजकिय नेते, सत्ताधारी, वरिष्ठ पातळीवर पोलिस प्रशासन आणि मानवाधिकार संघटनेने लक्ष वेधून घेतले त्यामुळे पिडीतेची शेवटी स्थानिक पातळीवर पोलिसांनी दखल घेतली. परंतु सामान्यांच्या हक्कासाठी लढणार्या त्या आंदोलनकर्त्यांना ज्याप्रकारचा त्रास पुढील अनेक दिवस सहन करावा लागला हा बद्दल कोणी विचारत करतंय का? विशेष म्हणजे जखमेवर मिट चोलण्याचं काम काही स्थानिक राजकिय नेत्यांनी केल्याचे दिसुन आले. एका राजकारण्याने थेट स्थानिक पत्रकाराचा शाब्दिक विनयभंग करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तसेच बदलापुर पश्चिम हेंद्रेपाड्यातील त्या राजकिय नेत्याने थेट पोलिसांनाच जास्तीत जास्त शहरातील नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केल्याने अश्या प्रकारचे राजकारण बदलापुरात चालल्याने सामान्य जनता आता विश्वास ठेवायचं तरी कोणावर असे म्हणु लागले आहे.

ज्या दिवशी आंदोलन घडले आणि एका राजकारण्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तेव्हा हेंद्रेपाड्यातील एका राजकिय नेत्याने आपल्या वरिष्ठांच्या राजकिय ताकदीच्या मदतीने आरोपीला अटक करा मी पैसे देतो अश्याप्रकारे बदलापुर पूर्व पोलिसांना सांगण्यात आले. हे करत असतांनाच हेंद्रेपाड्यातील त्या राजकिय नेत्याने अजुन एक प्रकार केला ज्यामुळे सामान्य जनतेला आता सतर्क राहणे फार गरजेचे आहे असे समजते. 

विनयभंग करणार्या त्या आरोपीला अटक करा मी जे लागेल ते देतो असे म्हणणार्या त्या हेंद्रेपाड्यातील राजकिय नेत्याने काही सामान्य नागरिकांचे नाव देखील पोलिसांना सुचवत ह्या लोकांना देखील आंदोलनाच्या गुन्ह्यात अडकवा असे सांगितल्याने बदलापुरातील अनेकांची नावे जे आंदोलनात नव्हे किंवा ज्यांनी कायदा हातात घेतला नाही अश्यांचे नाव देखील पोलिसांना टाकल्याने पोलिस प्रशासन राजकारण्याचं ऐकुन काम करत असल्याचे ह्यावरुन दिसुन आले. 

हेंद्रेपाड्यातील त्या राजकिय नेत्याची ओळख म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बदलापुर पदाधिकारी व कुळगांव बदलापुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे. हे तेच राजकिय नेते आहेत ज्यांच्यावर कुळगांव बदलापुर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या टेंडर घोटाळ्यात गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये त्यांची अटकपुर्व जामिनावर मुक्तता असुन गुन्ह्याचा तपास अद्याप संपलेला नाही.
बदलापुरात राजकारण कशाप्रकारे खालच्या दर्जेपर्यंत गेले आहे हे बदलापुरातील विविध घटनांमुळे आता लोकांना पाहायला मिळत आहे. विनयभंगाच्या आरोपाखाली ज्या वामन बारकु म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला आहे त्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे परंतु ती कारवाई पोलिसांनी प्रामाणिकपणे करणे अपेक्षित असतांना एखाद्या राजकारण्याच्या सांगण्यावरुन जर पोलिस काम करणार असेल तर हे काही साधारण नाही. म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झालं तर येत्या विधानसभा निवडणुकीत आपला मार्ग मोकळा ह्या विचाराने घोरपडे यांनी जर पोलिस प्रशासनाला संपर्क केले असल्यास सामान्य नागरिकांचे नाव अडकवण्याबद्दल बोलणे किती योग्य आहे? म्हणजे सामान्य जनता गुन्ह्यात अडकणार आणि नंतर हिच राजकिय मंडळी सोडवायला येणार आणि क्रेडिट घेणार हे जुनं काळचं राजकारण अजुन किती वर्ष राजकिय नेते रेटणार आहेत?

हळु हळु का होईना बदलापुर शहरातील नागरिक आता जागृक होत आहेत व त्यांना सर्व काही समजत आहे कशाप्रकारे सहल, कार्यक्रम, महोत्सव, पार्ट्या त्यांना दिल्या जातात आणि त्यासाठी जो खर्च होतो तो कुठुन येतो. त्यामुळे राजकिय नेत्यांनी आता तरी सामान्यांची प्रेशंस तपासणे आता बंद केले पाहिजे. याच सोबत पोलिस प्रशासनाने देखील आता आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

ज्या आंदोलनकर्त्यांनी गुन्हा, पोलिस लॉकअप आणि जेल भोगले आहे त्यांचे शहरातील नागरिक कौतुक करत आहेत कारण त्यांनी प्रामाणिकपणे एका अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा म्हणुन प्रयत्न केले आहे. खरंतर अश्यां लोकांमधून भविष्यात लोकप्रतिनिधी निवडायला हवे असे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.

Badlapur vikas media
Badlapur vikas mediahttps://badlapurvikas.in
तमाम महाराष्ट्र आणि भारतातील मराठी वाचकांसाठी निर्भिड आणि रोखठोक बातम्या प्रकाशित करणारे अमेरिकेतील मराठमोळ्यांकडून तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना पुरस्कृत मराठी मिडिया BADLAPUR VIKAS - MAHARASHTRA VIKAS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share post:

Subscribe

spot_imgspot_img
spot_imgspot_img
spot_imgspot_img

Popular

ठळक
महाराष्ट्र विकास

भाजपचे किसन कथोरे व आयटी सेल वाले आता मुरबाड विधानसभा मतदारांची औकात काढणारे पोस्ट व्हायरल

मतदारांची कथोरे व भाजपवर जोरदार नाराजी मतदार ठरवतलील कि भाजप...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संगिता चेंदवणकर यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर

मुरबाड (बदलापुर विकास मिडिया)- आगामी विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक...

किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदार संघातुन भाजपकडून उमेदवारी अधिकृत्तरित्या जाहिर

बदलापुर (बदलापुर विकास मिडिया)- भारतात आणि विशेष करुन महाराष्ट्रात...