कल्याण समाजसेवक शेख यांच्या संघटनेने केली राष्ट्रीय व महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेकडे मागणी
कल्याण (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच ज्याप्रकारे एका मुस्लिम धर्माच्या 72 वर्षीय ज्येष्ठ भारतीय नागरिकास काही समाजकंटकांनी चुकीच्या संशयावरुन बेदम मारहाण केली व स्थानिक लोहमार्ग पोलिस प्रशासनाने सुरुवातीला योग्य प्रकारे कारवाई केली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कशाप्रकारे धर्माच्या नावाने घाणेरडे राजकारण होत आहे हे दिसुन आले. विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेने ह्या विषयी आवाज उठवला असुन कल्याण येथील सामाजिक संघटनेचे ईर्शाद शेख यांनी पिडीतेला 10 लाख रुपये नुकसान भरपाई महाराष्ट्र मानवाधिकारी संघटनेने जाहिर केले पाहिजे अशी मागणी केली आहे.
सध्या संपुर्ण भारत देशात आणि विशेष म्हणजे या काही वर्षात महाराष्ट्रात सुद्धा मुस्लिम धर्मांवर ज्याप्रकारे जीवे ठार मारण्याच्या दृष्टीने ज्याप्रकारे आक्रमण होत आहेत हे लज्जास्पद आणि गंभीर आहे. यामुळे भारतातील विशेष वर्गातील भारतील नागरिक हे त्यांच्याच देशात सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी दिसुन येत आहे. ही बाब फक्त मुस्लिम धर्मातील लोकांसोबतच नसुन अनेक विविध जाती धर्माच्या सामान्य जनतेवर अश्या प्रकारचा प्रसंग कोसळला आहे. यावरुन पोलिस प्रशासनाची आणि कायद्याची गुंडांना भिती नाही हे दिसुन येते. अश्यात राज्य पाळीवर महाराष्ट्र मानवाधिकारी संघटनेने तसेच देश पातळीवर राष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेने दखल घेणे गरजेचे आहे.
समाजसेवक शेख यांनी याबाबत तक्रारअर्ज राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील मानवाधिकार संघटनेकडे पाठविले असुन पिडीतेस 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच त्या लोहमार्ग पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. विशेष म्हणजे असल्या घटना जेव्हा घडतात तेव्हा महाराष्ट्र मानवाधिकार संघटनेने सुमोटुने दखल घेतली पाहिजे परंतु अद्याप तसे होतांना दिसले नाही.
भारतात ज्याप्रकारे धर्माच्या नावाखाली भारतीयांवर जीवघेणा हल्ला केला जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतातील राजकिय नेत्यांविषयी तसेच कायद्याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. यु.एन. कडून याबाबत अनेकदा भारतातील मानवाधिकारी संघटना आणि पोलिस प्रशासनावर ताषेऱे ओढण्यात आले असल्याचे समजते.