मुंबई (बदलापुर विकास मिडिया)- नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाकडून प्रत्येक महिलेला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण या उपक्रमांतर्गत 1500 रुपये देण्याची योजना सुरु झाली. ह्या योजनेच्या नावाने विविध ठिकाणी सत्ताधार्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाषण दिले विरोधकांनी राज्यातील महिलांना सुरक्षितता आधि द्या अशी मागणी केली. ज्या सगळ्यात ज्या महिलांच्या बैंक खात्यात 1500 रुपये शासनाकडून आले आहे ते काय करतील असा ज्या कोणाला प्रश्न उपस्थित होते अश्यांसाठी बदलापुर विकासचा हा लेख अतिशय महत्वाचा आहे. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातिल एका महिलेने या लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयांच्या योजनेबद्दल बोलतांना पुढील प्रमाणे आपले मतोगत व्यक्त केले.
शासनाकडून 1500 रुपये माझी लाडकी बहिण या योजनेअंतगर्त मिळाल्यानंतर आमच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी सत्ताधारी कार्यक्रम घेत आहेत व विचारत आहेत कार्यक्रमात मटण खालंल का मटण आणि ताई 1500 रुपये मिळाले का आता काय करणार? खरं तर त्याचवेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री यांना मनापासुन सांगण्याची इच्छा होती पण आजकाल स्वातंत्र्य पणे बोलणे तितके सोप्पे राहिलेले नाही.
माझ्या सुशिक्षित मुलाला मागील 5 वर्षांपासुन नोकरी लागत नाही म्हणुन तो बेरोजगार आहे, मुलीला पुढचे शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पाठवतांना भिती वाटते कि कधी हिचा कोणी राजकिय कार्यकर्ता पाठलाग करुन विनयभंग किंवा बलात्कार करायला नको म्हणुन पाठवत नाही. राज्याची आणि देशाची जी.डी.पी. घसरत असल्यामुळे माझे नोकरी देखील खाजगी कंपनीतुन अनेक वर्षांपासुन गेली आहे. घरातील गैस सिलेंडर अतिशय महाग आहे, नवरोबा जे एका पार्टीला फक्त धर्माच्या नावाने डोळे बंद करुन पाठिंबा देतात त्यांना घरात राशन आणुन देण्यासाठी पैसे नाही, त्यांच्या गाडीत जो पेट्रोल लागतो ते देखील सरकारने मागील अनेक वर्ष खुप महाग केले आहे. ताज्या भाज्या आणि खाद्यतेलचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे ते दुकानातुन उधारी घेण्यासाठी दुकानदाराना अनेक विनवण्या करावं लागतं, छोट्या मुलीवर अन्याय झालं होते म्हणुन पोलिसात तक्रार करण्यासाठी गेले तर पोलिस तक्रार घेत नाही, न्याय पालिकेत पैसे दिल्याशिवाय फाईल सुद्धा मिळत नाही त्यामुळे वार्डातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आणि भारत ज्याप्रकारचे दिवस सुरु आहेत त्यात मी ह्या 1500 रुपयांचं काय करणार हेच कळत नाहीये…
सदर महिलेने ज्याप्रकारे खरी परिस्थिती व्यक्त केली आहे ती आज महाराष्ट्र आणि देशातील कोट्यावधी महिलांची आणि कुटुंबियांचे प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राची लाडकी बहिण योजना आणि दीड हजार रुपये काही मोठा बदल घडवेल असे आजिबात वाटत नाही.



